Agripedia

शेवगा पिकांमध्ये उत्तम शेंगा उत्पादनासाठी संजीवकांचा वापरछ आणि वेळेवर रोग व कीडनियंत्रण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Updated on 29 October, 2021 7:24 PM IST

पीक संजीवकाची फवारणी

पीक फुलोऱ्यात असताना फूलगळ टाळण्यासाठी व भरपूर शेंगा लागण्यासाठी नॅप्थील ॲसेटिक ॲसिड (एन.ए.ए.) ४ मि.लि. प्रति १० लिटर (१० पीपीएम ) याप्रमाणे फवारावे.

पीक संरक्षण

१) पाने खाणारी अळी:

शा. नाव - स्पोडोप्टेरा लिट्यूरा

सुरवातीस कोवळ्या पानांवर प्रादुर्भावास सुरवात होते. हळूहळू ८ ते १० दिवसांत संपूर्ण पाने, कोवळे शेंडे व झाडाची कोवळी साल खाऊन टाकते ही अळी खादाड असल्याने थोड्याच दिवसात संपूर्ण झाडाचे नुकसान करते. पानाच्या शिरावरील हरित द्रव्य खाते व पानाची जाळी तयार होते.

नियंत्रण : 

फवारणी प्रति लिटर पाणी

क्लोरपायरीफॉस (५०%) अधिक सायपरमेथ्रीन (५%) संयुक्त कीटकनाशक १ ते १.५ मिलि

किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन १ ते १.५ मिली किंवा मोनोक्रोटोफॉस १ ते १.५ मिली

 

२) फळमाशी:

शा.नाव ः Gitona distiema

ही माशी कोवळ्या व तयार शेंगावर अंडी सोडते. ३ ते ४ दिवसांत अंड्यातून अळ्या बाहेर येतात. त्या शेंगात शिरून आतील गर खातात. शेंगातून डिंक व फेस बाहेर पडतो, शेंगा वाळून जातात व सडतात. याला अनेक शेतकरी डिंक्या म्हणून ओळखतात.

नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी

स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३ ते ०.४ मिली.

रोग

१. करपा:

पानावर काळपट ठिपके येतात. फांद्या करपतात. पाने पिवळी पडून गळतात. करपा रोगामुळे झाडे पिवळे पडून करपल्यासारखे दिसते.

नियंत्रण: 

फवारणी प्रति लिटर पाणी

कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा

मॅन्कोझेब १ ग्रॅम

२. मररोग (मुळकुज)

पाण्याचा निचरा न होणारी जमीन, पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणे यामुळे झाडांच्या मुळा पाण्यात राहिल्यामुळे सुरवातीला झाडे पिवळे पडतात व नंतर ४ ते ५ दिवसांनी झाड वरून पूर्ण वाळत जाते व पिवळे पडून मरतात. याला आपण मररोग किंवा मुळकुज म्हणतो. उताराची व उत्तम निचरा होणाऱ्या जमिनात मररोग होत नाही.

उपाययोजना :

आळवणी (ड्रेंचिंग) प्रति लिटर पाणी

कार्बेन्डाझीम किंवा कॉपर ऑंक्सिक्लोराईड १ ते १.५ ग्रॅम.

 

काढणी व उत्पादन

शेवग्याच्या शेंगा जातीनुसार लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांत तोडायला येतात व पुढे ३ ते ४ महिने तोडणी चालते. शेंगा मांसल व मध्यम अवस्थेत तोडाव्यात. एक वर्षांनंतर चांगल्या झाडापास

English Summary: Shevaga crop protection
Published on: 29 October 2021, 07:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)