चिखली-तालूक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेत मोजणीसाठी भुमि अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करूण पैसे भरणा केला आहे.परंतू वर्ष उलटुनही उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पावित्रा घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,भगवानराव मोरे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना भेडसावनाऱ्या समस्या घेवुन उप अधिक्षक यांच्या चिखली येथील कार्यालयात दि१०/०६/२०२२ ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिखली भुमि अभिलेख कार्यालयाकडे शेतरस्ते मोकळे करण्यासाठी,हिस्से वाटे झालेली जमीन सातबारा नुसार क्षेत्रफळ निश्चित करणेसाठी अर्ज केले आहेत.यामधे काहिंनी साधी मोजणी,तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणीसाठी भुमि अभिलेख कार्यालयाकडे अर्ज करुण नियमा प्रमाणे पैसाचा भरणा देखील केला आहे.
परंतु पैसे भरलेल्यांचा शेत मोजणीचा विहित कालावधी उलटुन देखील प्रकरणे निकाली निघाले नसल्याने अनेकांना दुबार पैसे भरणा करावा लागला असल्याने आर्थीक भुर्दड सोसावा लागत आहे. अनेकांची मोजणी झाली परंतु आजपर्यत हद्दकायम (खुना) निश्चीत केलेल्या नसल्याचे व शेतात गेल्या नंतर मोजणी मशीन नादुरुस्त होणे,व विविध कारणे दाखवुन अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याने व पैसे घेवुन काम होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.तर दुसरीकडे मात्र कर्मचारी कमी असल्याचे सांगुन वेळकाढु धोरण अवलंबले जात असल्याने पावसाळा तोंडावर आला असल्याने मोजणी होणार तरी कधी?असा सवाल शेतकरी उपस्थीत करीत असुन याबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतरही उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने स्वाभिमानीसह शेतकऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत उप अधिक्षक
यांच्या दालनात ठिय्या आंदोलनास सुरुवात केली होती तर एक प्रकारे कार्यालयाचा ताबाच शेतकर्यानी घेतला होता.दरम्याण तालुक्यातील प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात यावे,विहीत वेळेत मोजणी न करणे हि कार्यालयाची चुक असुन दुबार पैसे भरणा केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम परत करण्यात यावी,साधी मोजणी,तातडीची मोजणी व अति तातडीची मोजणीसाठी पैसे भरणा करुनही प्रकरणे प्रलंबीत का राहली या संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी,रीक्त असलेली पद भरण्यात यावे व भुमि अभिलेख कार्यालयातील प्रभारी पदावर कायमस्वरूपी उप अधिक्षकाची नेमणुक करण्यात यावी,यासह आदि मागण्या करण्यात आल्या असुन या आंदोलनामुळे अनेकांची मोजणीची तारीख निश्चित करण्यात आली असुन अनेकांच्या समस्या देखील आंदोलनामुळे मार्गी लागल्या आहेत.तर मागण्यांची पुर्तता करण्याचे अश्वासन वरीष्ठांकडुन देण्यात आल्याने चार तासानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले आहे.
Published on: 02 June 2022, 07:38 IST