भारतात तसेच राज्यात तेलबियांची शेती मोठ्या प्रमाणात केले जाते अशा तेलबिया पिकापैकी तीळ एक प्रमुख पीक आहे. तिळीची लागवड भारतात तसेच राज्यात लक्षणीय बघायला मिळते. याच्या शेतीतुन शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई देखील करत आहेत. तिळीत अनेक औषधीय घटक असतात, तिळीचे तेल खाण्याव्यतिरिक्त अनेक आजारात देखील वापरले जाते, त्यामुळे तिळीची मागणी ही दिवसेंदिवस लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे तिळीची लागवड कधी करावी, कशी करावी याविषयी आज आपण जाणुन घेणार आहोत जेणेकरून तिळीची लागवड फायद्याचा सौदा सिद्ध होईल. कृषी वैज्ञानिकांनी तीळ शेतीविषयी सांगितलेली माहिती जाणुन घेऊया.
तीळ हे एक प्रमुख तेलबियाचे पिक आहे याची लागवड ही शेतकरी बांधव खरीप हंगामात तसेच उन्हाळी हंगामात करू शकतात. तिळीची लागवड ही दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते याची लागवड उन्हाळी हंगामात केल्यास तिळीचे पिक काढणीसाठी तीन महिने आणि दहा दिवसात तयार होते. आणि जर खरीप हंगामात तिळीची शेती केली तर पिक हे तीन महिन्यात तयार होते. तिळी लागवड दोन्ही हंगामात करता येत असली तरी उन्हाळी हंगामात याची लागवड करण्याचा सल्ला वैज्ञानिक देतात याचे कारण असे की उन्हाळ्यात या पिकावर रोग कमी प्रमाणात अटॅक करतात त्यामुळे उत्पादन चांगले दर्जेदार मिळते.
तिळीच्या लागवडीसाठी उपयुक्त जमीन आणि हवामान
तिळीच्या लागवडीसाठी भुसभूशीत सुपीक चिकन माती असलेली जमीन चांगली असल्याचे सांगितले जाते. याच्या यशस्वी उत्पादणासाठी तापमान हे 20 ते 25 डिग्री सेल्शिअस दरम्यान असायला पाहिजे.
खत व्यवस्थापन
तिळीची लागवड करताना पूर्वमशागत करताना चांगल्या क्वालिटीचे कुजलेले शेणखत टाकावे जेणेकरून उत्पादन चांगले दर्जेदार प्राप्त होईल. शिवाय जमिनीत ट्रायकोडर्मा टाकण्याचा सल्ला दिला जातो.
कधी करावी लागवड
जर आपणांसही तिळीची लागवड करायची असेल तर याची पेरणी ही मध्य फेब्रुवारी मध्ये केली गेली पाहिजे या काळात पेरणी केली तर उत्पादन चांगले मिळते.
पाणी व्यवस्थापन
तीळ लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापन महत्वाचे ठरते. जर आपल्या शेतात पाण्याची योग्य व्यवस्था असेल तर आपण या पिकाला गरजेनुसार दिवसातून दोनदा पाणी देऊ शकता. खरीप हंगामात या पिकाला पाणी देण्याची गरज भासत नाही या पिकाला खरीप हंगामात पावसाचे पाणी पुरेसे असते. तसेच शेतात पावसाचे पाणी साचणार नाही याची व्यवस्था करणे आवश्यक असते. पाण्याच्या जास्त ओव्हरफिलिंगमुळे तीळ पिकाची नासाडी होऊ शकते. आपण ह्या गोष्टीची काळजी घेऊन आगामी काळात तीळीची लागवड करून चांगला नफा कमवू शकता.
Published on: 19 December 2021, 04:52 IST