- आर्थिक महत्व :-
तीळास किन ऑफ ऑईल सीड्स ( तेलबियांची राणी ) असे संबोधतात. तिळाच्या लागवडीखालील एकूण क्षेत्रात भारताचा प्रथम क्रमांक लागतो. तर उत्पादनात द्वितीय क्रमांक लागतो. सर्वात जास्त उत्पादन चीनमध्ये आहे.
याचा मुख्य उपयोग खाद्य तेल तयार करण्यासाठी होतो तिळामध्ये 45 ते 50 टक्के तेलाचे प्रमाण असते. तिळाचासाबण,रंग, वनस्पती तूप,औषधी तेले व सुगंधी तेले तयार करण्यासाठी होतो. त्यापासून चटणी व तिळगुळ ही तयार होतात.महाराष्ट्रात संक्रांतीला तिळाचे खूप महत्त्व आहे. त्याचा हलवा, लाडू, चिक्की, वड्या,पोळी इत्यादी खाद्यपदार्थ तयार करतात.
- जमीन व हवामान :-
त्याच्या लागवडीसाठी सुपीक मध्यम ते भारी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. बियांची चांगली उगवण होण्यासाठी 15 ते 18 अंश सेल्सिअस तापमान लागते. काही वाढीसाठी 21 ते 26 अंश से.तापमान व फळ धारणेसाठी 26 ते 32 अंश से. तापमान लागते. जास्त ओलावा व हवेतील दमटपणा तिळाच्या वाढीकरता प्रतिकूल असतो. उष्ण व कोरड्या हवामानात तिळाचे पीक चांगले येते.
3) पूर्वमशागत:
तिळाचेमूळ हे सोटमूळया प्रकारचेअसल्यामुळे जमिनीची खोल नांगरट करावी तिळीसाठी भुसभुशीत परंतु वरील थोडा भाग ठणक असावा कुळवाच्या दोन पाळ्या घ्याव्यात पेरणीसाठी पोळी फिरवावी. त्यामुळे जमिनीचा वरचा भाग थोडा थानक बनतो.
4) पेरणीचा हंगाम ववेळ:
तेल या तेलवर्गीय पिकाची पेरणी खरीप हंगामात जूनचा दुसरा ते ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी.
5)बिजप्रक्रिया:
पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो तीन ग्रॅम या प्रमाणात चोळावे.
6) हेक्टरी बियाणे व पेरणीचे अंतर:
तिळीच्याएक हेक्टर लागवडीसाठी 2.5 ते3 किलो बियाणे लागते. तिळाची पेरणी 45×10सें.मी.किंवा 30×15सें.मी. अंतरावरतीन 3ते 4 सें.मी. खोलीपर्यंत करावी. पेरणी करताना बियाण्यात बारीक वाळू,भाजलेली बाजरी किंवा बारीक केलेले शेणखत मिसळावे म्हणजे बीएक सारख्या अंतरावर पडेल.
7) वाण :-
1) फुले तीळ – 1 :- कालावधी – 94 ते 95 दिवस.
उत्पादन- हेक्टरी 5 ते 6 क्विंटल वैशिष्ट्ये – महाराष्ट्रातील सर्व जिल्हे(चंद्रपूर वर्धा नागपूर सोडून)
- तापी (जे. एल. टी. 7) :- कालावधी – 810 ते 85 दिवस.
उत्पादन – हेक्टरी 6 ते 7 क्विंटल वैशिष्ट्ये :- जळगाव, धुळे,औरंगाबाद, बुलढाणा व जालना जिल्ह्यात तिळाचे क्षेत्र
3)एकेटी -64 :- कालावधी – 90 ते 95 दिवस
उत्पादन - हेक्टरी 5 ते 6 क्विंटलवैशिष्ट्ये :- करपा व फायलोडी रोगास प्रतिकारक.
4)पद्मा(जी.एल.टी.26) :-कालावधी -72 ते 75 दिवस
उत्पादन – हेक्टरी 7 ते 8 क्विंटल वैशिष्ट्ये– जळगाव धुळे जिल्ह्यासाठी
5)एकेटी -101 :- कालावधी - 90 ते 95 दिवस
उत्पादन – हेक्टरी 7 ते 8 क्विंटल वैशिष्ट्ये – करपाव फायलोडीरोगास प्रतिकारक
8) खत व पाणी व्यवस्थापन :-
जमीन तयार करते वेळी हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. रासायनिक खतामध्ये 50 किलो नत्र द्यावे. उशिरा येणाऱ्या वानांना पेरणीवेळी 25 किलो नत्र तीन आठवड्यांनी द्यावे तर लवकर येणाऱ्या वानांना पहिल्या नत्राचा हप्ता पंचवीस किलो पेरणीनंतर 3 आठवड्यांनी व उर्वरित 25 किलो नत्र आठवड्यांनी द्यावी.
तीळ हे क्वचित बागायती पीक म्हणून लावली जाते. परंतु पीक फुलोऱ्यात येण्याची व्यवस्था ही पाण्यात अतिसंवेदनशील आहे. मात्र अति पाणीपुरवठा हा वजनात तेल उताऱ्यात घट व विविध बुरशीजन्य रोगाला कारणीभूत ठरतो.
9) आंतरमशागत :-
त्या वर मावा, तुडतुडे, पाने खाणारी आळी,पाने गुंडाळणारी आळी व गांध माशी या प्रामुख्याने आढळणाऱ्या किडी आहेत.
यांच्या नियंत्रणासाठी एन्डोसल्फान 35 इसी 700 मिली किंवा क्विनालफॉस 25 ईसी 1000 इसी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
10) काढणी:-
काढणीस तयार झालेल्या तिळाची खालची 25% पाने गळालेले असतात. खोडाचा रंग पिवळा पडलेला असतो. बोंडाचा रंग मधले लांबीपर्यंत पिवळा पडलेला असतो. झाडाच्या तळाकडील बोंडे तपकिरी होण्यापूर्वी झाडाची कापणी करावी. कापणीस उशीर झाल्यास झाडावरील बोंडे फुटून बी गळण्याची शक्यता असते. कापणी केल्यावर तिळाच्या पेंड्या खळ्यात उभ्या करून ठेवाव्यात. तीन दिवस वाळू दिल्यानंतर जमिनीवर ताडपत्रीअंथरून वाढलेली झाडे उलटी करून काठीने बडवून मळणी करावी.
11) उत्पादन :- 6 ते 8 क्विंटल हेक्टरी.
Published on: 06 March 2022, 03:15 IST