Agripedia

बटाटा लागवड करायचे असेल तर बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी जमिनीच्या निवडीप्रमाणे योग्य वेळी लागवड अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे लागवड तर गादी वाफ्यावर केली तर पाण्याचा निचरा होण्याची समस्या दूर होते. बटाटा पिकाची वाढ आणि विकास जमिनीच्या आत होत असतो.

Updated on 27 October, 2021 12:28 PM IST

बटाटा लागवड करायचे असेल तर बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी जमिनीच्या निवडीप्रमाणे योग्य वेळी लागवड अत्यंत महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे लागवड तर गादी वाफ्यावर केली तर पाण्याचा निचरा होण्याची समस्या दूर होते. बटाटा पिकाची वाढ आणि विकास जमिनीच्या आत होत असतो.

त्यामुळे बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी जमिनीची निवड अत्यंत महत्त्वाची ठरते. तसेच जमिनीच्या निवडी सोबतच बटाटा पीक यशस्वी होण्यासाठी बटाट्याची बेण्याची निवड खूप महत्वाचे आहे.या लेखात आपण बटाटा लागवडीसाठी बियाण्याची निवड कशी करावीवबेणे प्रक्रिया याबद्दल माहिती घेणार आहोत.

बटाटा लागवड आधीबेणे निवड

  • बटाटा लागवड करण्याआधी,कंदाची सुप्तावस्था पुर्ण झालेल्या कंदाची निवड करावी.
  • बटाट्याची काढणी केल्याबरोबर ताबडतोब लागवडीसाठी बेण्याची निवड करू नये.
  • बटाट्यामध्ये सुप्तावस्था असल्यामुळे काही काळ साठवणूक केल्यानंतर ज्या बेण्यावर  कार्यक्षम डोळ्यांचे संख्या जास्त असते.अशा बेण्याची निवड करावी.
  • साधारणतः एक हेक्‍टर लागवडीसाठी 15 ते 20 क्विंटल बेणे आवश्यक असते.
  • जर बेणेतीस ते पस्तीस ग्रॅम वजनापेक्षा जास्त असल्यास अशा बेण्याची दोन चार भागांमध्ये कापणी करावी. परंतु कापणी करत असतांना कार्यक्षम डोळ्यांना इजाहोणार नाही याची काळजी घ्यावी. कापणी केल्यानंतर बेण्याचे वजन देखील साधारणता तीस पस्तीस ग्रॅम असावे.

लागवडीआधी बेणेप्रक्रिया

  • बटाटा पिकामध्ये उशिरा येणारा व लवकर येणारा करपा रोगाच्या प्रामुख्याने प्रादुर्भाव असतो.
  • तो टाळण्यासाठी बटाटा बेणे लागवडीपूर्वी मॅन्कोझेब तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात किमान अर्धा तास बुडवावीत. वीस क्विंटल बियाण्यासाठी सुमारे शंभर लिटर पुरेसे होते.
  • त्यानंतर बटाटा बेण्याच्या वाढीसाठी नत्रयुक्त घटकांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने अडीच किलो ऍझेटोबॅक्‍टर अधिक 500 मिली द्रवरूप ऍसिटोबॅक्‍टर प्रति 100 लिटर पाणी या द्रावणात बटाटेकिमान अर्धा तास बुडवून ठेवावेत. हे द्रावण वीस क्विंटल बटाटा बेण्यासाठी पुरेसा आहे.
English Summary: selection of potato seed and important seed process for cultivation
Published on: 27 October 2021, 12:28 IST