Agripedia

जमीनीचा प्रकार व वातावरण बदल परिपक्वतेचा कालावधी वाण विविधतेची गरज

Updated on 02 June, 2022 4:11 PM IST

वाण निवड करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी  वाण निवड बाबत असलेले गैरसमज फुले संगम फुले किमया गैरसमज.सोयाबीन हे पीक महाराष्ट्रात खूप मोठ्या क्षेत्रावर घेतले जाते, गेली दोन वर्षे चांगला भाव मिळतो आहे, त्यामुळे लागवडी खालील क्षेत्रामध्ये मोठ्याप्रमाणावर वाढ झालेली दिसून येते, नवीन तंत्रज्ञान व नवीन संशोधन शेतकरी आत्मसात करू लागले आहेत, नवीन वाणांचा वापर वाढला आहे, परंतू वाण निवड करताना शेतकरी संभ्रमात आहेत, कारण नवीन वाण निवड करावी की नाही करावी यामुळे शेतकरी वाण निवड करण्यात चुकतात व एक वर्ष त्याठिकाणी जाते व त्याने उत्पादनात वाढ होत नाही.प्रामुख्याने वातावरण बदलामुळे शेती व पीक यांवर अनिष्ट परिणाम झाले आहेत, व येणाऱ्या काळात होतील, त्यामुळे बदलत्या हवामानाचा पिकावर परिणाम कमी कसा होईल, व आपले पीक यातून कसे वाचेल, त्यासाठी वातावरण बदलाला प्रतिकारक वाण निवड करणे आवश्यक आहे तसेच आपल्या शेती पद्धतीत बदल व सुधारणा करणे आवश्यक आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारची जमीन आपल्याला आढळते, जमीनीचा प्रकार व वाण यांचे महत्वाचे संबंध आहेत, आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला वाण निवड करणे आवश्यक आहे.तसेच विद्यापीठ किंवा संशोधन संस्था यांनी शिफारशीत केलेले वाण हे प्रामुख्याने विभागानुसार शिफारशीत केलेले असतात, त्यानुसार आपल्या विभागासाठी शिफारशीत केलेला वाण निवड करणे आवश्यक आहे. जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड करणेआपल्याकडे हलकी - मध्यम जमीन असेल तर लवकर येणारे वाण निवडावेत, उदा. JS-९३०५, PKV- अंबा (AMS-१००३९), RVS-१८, ( ८५-९० किंवा मध्यम जमीन असेल तर ९५ दिवसांत तयार होणारे वाण निवडावेत )आपल्याकडे भारी जमीन असेल तर त्याठिकाणी आपण मध्यम ते उशिरा येणारे वाण निवड करू शकतो:फुले किमया, फुले संगम, MAUS-७१, MAUS- ६१२, फुले कल्याणी, MAUS १५८, JS-३३५, तसेच PKV अंबा ( AMS -१००३९), जर आपल्याकडे भारी जमीन व पाण्याची देण्याची व्यवस्था असेल तरच उशिरा येणारे वाण निवडावेत, पाणी देणे शक्य नसेल तर मध्यम कालावधीत येणारे वाण निवडावेत.

आपल्या कडे भारी जमीन असेल तर उशिरा व मध्यम कालावधीत येणारे दोन - तीन वाण आपण निवड करू शकतो, कोणत्याही एकाच वाणाची निवड करू नये, वाण विविधता अतिशय महत्वाची आहे, वातावरण बदलाच्या परिणामावर मात करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या वेळी परिपक्व होणाऱ्या वाणाची निवड करणे आवश्यक आहे , उदा. आपल्याकडे. १० एकर जमीन असेल तर #भारी जमीन : ४ एकर उशिरा येणारे ( फुले संगम ),  मध्यम जमीन : ३ एकर : मध्यम कालावधीत येणारे ( फुले किमया, JS -३३५, किंवा AMS-१००३९, MAUS-७१ असे), हलकी व मध्यम : ३ एकर लवकर येणारे वाण ( JS-९३०५, RVS-१८, AMS-१००३९ असे), अशाप्रकारे आपण नियोजन केल्यास नैसर्गिक आपत्ती पासून आपले कमीत कमी नुकसान होईल, ( म्हणजे पाऊस कमी किंवा जास्त प्रमाणात झाला तर सर्वच सोयाबीन च नुकसान होणार नाही, तसेच काढणीला वेगवेगळ्या वेळी येणार असल्यामुळे त्याचा सुध्दा फायदा होईल, मागील वर्षी बरेच ठिकाणी सोयाबीन काढणीला आली असताना म्हणजे जे १०० दिवसांत परिपक्व होणारे वाण होते त्यांचे अतोनात नुकसान झाले परंतु याच पावसातून उशिरा व लवकर येणारे वाण सुटले म्हणजे त्यांचे अजिबात नुकसान झाले नाही) 

एकंदरीत सांगायचं यवढेच की एकाच वेळी पक्व होणाऱ्या वाणाची निवड टाळावी .फुले संगम चे उत्पादन गेली २-३ वर्षे आपण बघत आहोत, प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारशीत आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय चांगले उत्पादन मिळालेले आहे, त्यामुळे सर्वच शेतकरी या वर्षी फुले संगम बियाण्याची मागणी करत आहेत, संगम खालील क्षेत्र मोठ्ाप्रमाणावर वाढेल असा अंदाज आहे, परंतु त्याचे उलट परिणाम सुद्धा होऊ शकतात कारण विदर्भ आणि मराठवाडा या भागात पाऊस लवकर उघडतो म्हणजे ऑगस्ट नंतर पाऊस बंद होतो, परंतु गेली दोन वर्षे पाऊस ऑक्टबरपर्यंत झालेला आहे, त्यामुळे फुले संगम चे उत्पादन चांगले मिळाले, परंतु जर पावसाने लवकर दडी मारली तर आपल्याकडे पाणी देण्याची व्यवस्था नसेल तर संगम चे उत्पादन कमी होऊ शकते. त्यामुळे फुले संगम ची निवड करताना याचा विचार करावा .दुसरा मुद्दा - फुले संगम हे वाण उंच वाढणारे आहे तसेच जास्त प्रमाणात वाढ होणारे वाण आहे पेरणी करताना लागवडीचे अंतर महत्वाचे आहे जर दाट पेरणी केली तर उत्पादन मिळत नाही,तिसरा मुद्दा : गेल्या वर्षी शेतकरी अनुभव व माझा वयक्तिक अनुभव यानुसार फुले संगम हे उभट वाण आहे व अतशिय लवचिक , व पांनाचा रंग थोडा पिवळसर असल्याने रस शोषक किडींचा प्रादुर्भाव तसेच चक्री भुंगा, खोड आळी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला त्यामुळे फक्त फुले संगम हे वाण निवड करताना या गोष्टींचा विचार सुद्धा करावा

( उद्देश असा आहे की एकच वाण निवड करू नये) काही क्षेत्रावर फुले संगम आणि काही क्षेत्रावर फुले किमया अशी निवड करावी)फूले संगम हे वाण प्रतिसाद देणारे ( responsive ) वाण म्हणजे तुम्ही चांगले नियोजन केले तरच तुम्हाला उत्पादन मिळेल, तुम्हाला सर्व गोष्टी वेळेत व अतिशय काटेकोर पणे करणे शक्य असेल तर हे वाण अतिशय चांगले उत्पादन देते, परंतू तुम्ही जर पेरून दिले की काढायला जाणार असाल तर तुम्ही फुले संगम चा विचार करू नये.हे मी माझे मागील दोन वर्षांपासून आलेल्या अनुभवानुसार फुले संगम विषय लिहिले आहे, कारण या वर्षी शेतकरी फक्त फुले संगम ची मागणी करत आहेत आणि त्यासाठी महागडे बियाणे घेत आहेत, माझे मत असे आहे की फक्त फुले संगम च्या मागे न जाता, फुले किमया, आहे ते तर १०० दिवसात परिपक्व होते, १००३९ (PKV अंबा), MAUS-७१, MAUS-६१२, MACS-११८८, MACS- १४०७, MACS-१४६० असे वेगवेगळे वाण सुध्दा उपलब्ध आहेत, यांचे सुद्धा उत्पादन चांगले आहेत, त्यांचा सुद्धा शेतकरी मित्रांनी विचार करावा.

तिसरा मुद्दा - फुले संगम हे भारी जमीन असेल तरच निवड करावे, मध्यम जमीन असेल तर फुले किमया किंवा इतर मध्यम कालावधीत येणारे वाण निवड करावेत.सोयाबीन चे विविध वाण व त्यांची माहितीफुले संगम : (KDS-७२६) १०५-११० दिवसांत परिपक्व होणारे, जाड दाणा, भारी जमीन व चांगले व्यवस्थापन असेल तर अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण. लागवडी साठी ४५ x ८-१० सेमी असे अंतर ठेवावे.फुले किमया : (KDS-७५३ )१०० दिवसांत परिपक्व होणारे वाण, जाड दाणा, अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, ४५ x ७-१० सेमी वर लागवड करावी, पी.के. व्ही. अंबा (AMS १००३९), ९५ दिवसांत परिपक्व होणारे, मध्यम जमीनीत अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, ३८-४५ x ५-८ सेमी वर लागवड करावी.JS-९३०५: ८५-९० दिवसांत परिपक्व होणारे वाण, हलकी व मध्यम जमीन, तसेच ३०-३८ सेमी x ६-८ सेमी अशी लागवड करावी RVS-१८- ८५ दिवसांत परिपक्व होणारे, हलकी व मध्यम जमीन, तसेच ३०-३८ x ६-८ सेमी अशी लागवड करावी.JS-३३५ - १०० दिवसांत परिपक्व होणारे वाण, ३८ x १० सेमी मध्यम ते भारी जमीनीत लागवडी साठी योग्य.MAUS-७१: ९५-१०० दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, मध्यम ते भारी जमीनीत लागवडी साठी योग्य.MAUS-१५८: ९३-९८ दिवसांत परिपक्व होणारे, हलकी व मध्यम जमीन.

MAUS-६१२ : ९४-९८ दिवसांत परिपक्व होणारे अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, उंच वाढ तसेच वातावरण बदलामध्ये तग धरून उत्पादन देणारे वाण.MACS-1460: ९५ दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण,असे काही वेगवेळ्या वेळी परिपक्व होणारे सोयाबीन चे वाण उपलब्ध आहेत, कोणत्याही एकाच वाणाची निवड न करता किंवा जास्त महाग बियाणे खरेदी करून एकाच वाणाच्या मागे न जाता सोयाबीन पिकामध्ये आपण वाणाची विविधता आणली तर नक्कीच आपल्याला चांगले व खात्रीशीर उत्पादन मिळेल कारण वातावरण बदलाचा परिणाम हा सर्वच पिकांवर होत आहे त्यामुळे आपण त्याला रोखण्यासाठी हे करणे आवश्यक आहे तरच, आपण वातावरण बदलाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करू शकतो.हे सर्व शेतकरी हितार्थ लिहिले आहे, शेतकरी व माझा वयक्तिक अनुभव यानुसार लीहले आहे उद्देश असा आहे की शेतकरी मित्रांचा वाण निवड करताना असलेले गैरसमज दूर होतील व योग्य तो वाण निवड करून येणाऱ्या हंगामात चांगले उत्पादन घेतील अशी अपेक्षा.

 

डॉ. अनंत उत्तमराव इंगळे

(Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri)

विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा.

English Summary: Selection and management of soybean varieties
Published on: 02 June 2022, 04:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)