Agripedia

शेतकरी बंधुनो, पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली आहे अशा परिस्थितीत कमी पाण्यावर येणारे वाण पेरणीसाठी निवडणे जरुरीचे ठरेल. रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे.

Updated on 29 July, 2019 1:20 PM IST


शेतकरी बंधुनो, पावसाने ओढ दिल्यामुळे रब्बी हंगामातील पेरणी लांबली आहे अशा परिस्थितीत कमी पाण्यावर येणारे वाण पेरणीसाठी निवडणे जरुरीचे ठरेल. रब्बी हंगामाच्या दृष्टीने आपणाकडे उपलब्ध असलेली जमिन, तिचा प्रकार, जमिनीची खोली, शेतीसाठी आवश्यक औजारे, त्यांची देखभाल दुरुस्ती, रासायनिक खते, जैविक खते, कीटकनाशके, बी-बियाणे यांची खरेदी करणे आवश्यक आहे. त्याकरिता आवश्यक त्या पिकास लागणाऱ्या बियाणे, खते, औषधे यांची थोडक्यात माहिती दिली आहे.

ज्वारी लागवड तंत्रज्ञान

  • हलकी जमिन (30-45 से.मी.): फुले अनुराधा, फुले माऊली
  • मध्यम खोल जमिन (45-60 से.मी): फुले सुचित्रा, फुले चित्रा, फुले माऊली, मालदांडी 35-1, परभणी मोती
  • खोल जमिन (60 पेक्षा जास्त):
    सुधारित वाण: फुले वसुधा, फुले यशोदा, सीएसव्ही 22, पीकेव्ही-क्रांती.
    संकरीत वाण: सीएसएच 15, सीएसएच 19.
  • बियाणे: 10 ते 12 किलो/हेक्टरी
  • पेरणीची योग्य वेळ: 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर
  • पेरणीचे अंतर: 45 x 20 से.मी.
  • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. 50:25:25 नत्र:स्फुरद:पालाश किलो/प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.
  • बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधक चोळावे.त्यानंतर 25 ग्रॅम प्रत्येकी एझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.

करडई लागवड तंत्रज्ञान

  • वाण: भीमा, फुले कुसुमा, एसएसएफ 658, एसएसएफ 708, फुले करडई, फुले चंद्रभागा नारी-6, नारी एन एच-1 (बिगर काटेरी वाण)
  • बियाणे: 10 ते 12 किलो/हेक्टरी
  • पेरणीची योग्य वेळ: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
  • पेरणीचे अंतर: 45 x 20 से.मी.
  • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे 50:25:00 नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया व तीन गोण्या एसएसपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.
  • बीजप्रक्रिया:प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा बाविस्टीन चोळावे. त्यानंतर २५ ग्रॅम प्रत्येकी एझोटोबॅक्टर व पीएसबी या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.

सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान

  • वाण: सुधारित: भानू, फुले भास्कर, संकरित: एमएसएफएच-17, एलएसएफएच-171
  • बियाणे: 8 ते 10 किलो/हेक्टरी
  • पेरणीची योग्य वेळ: 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
  • पेरणीचे अंतर: मध्यम खोल जमीन: 45 x 30 से.मी, भारी जमिन: 60 x 30 से.मी.
  • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. 50:25:25 नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे दोन गोणी युरिया, तीन गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.
  • बीजप्रक्रिया: मर रोगाच्या प्रतिबंधासाठी 2-2.5 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. केवडा रोग टाळण्यासाठी 6 ग्रॅम एप्रॉन 35 एस डी प्रति किलो बियाण्यास चोळावे. नॅक्रासिस रोगाच्या प्रतिबंधासाठी इमिडॅक्लोप्रिड 70 डब्लू, ए गाऊचा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर 25 ग्रॅम प्रत्येकी एझोटोबॅक्टर या जैविक खतांची बीजप्रक्रिया करावी.

हरभरा लागवड तंत्रज्ञान

  • वाण: विजय, दिग्विजय
  • बियाणे: 70 ते 100 किलो /हेक्टरी
  • पेरणीची योग्य वेळ :(हस्त चरणानंतर) 25 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर
  • पेरणीचे अंतर: 30 x 10 से.मी.
  • खते: शेवटच्या वखरणीच्या वेळी 5 टन शेणखत जमिनीत मिसळावे. 25:50:30 नत्र:स्फुरद:पालाश प्रति हेक्टरी म्हणजे अंदाजे एक गोणी युरिया, सहा गोण्या एसएसपी व एक गोणी एमओपी पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने दयावे.
  • बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम थायरम+2 ग्रॅम बाविस्टीन किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. त्यानंतर 25 ग्रॅम प्रत्येकी रायझोबियम व पीएसबी या जैविक खतांची गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून बीजप्रक्रिया करावी.

जिरायती गहू लागवड तंत्रज्ञान

  • पेरणीची योग्य वेळ: ऑक्टोबरचा दुसरा आठवडा
  • पेरणीचे अंतर: 22.5 से.मी.
  • बियाणे: 75 ते 100 किलो प्रति हेक्टरी
  • बीजप्रक्रिया: प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा+1.25 ग्रॅम, कार्बेन्डॅझिम (75 डब्लूपी) व 25 ग्रॅम प्रत्येकी अॅझोटोबॅक्टर व पीएसबी जीवाणूंची बीजप्रक्रिया करावी.
  • खते: 40 किलो नत्र (87 कि. युरिया) आणि 20 किलो स्फुरद (125 कि. एसएसपी)
  • जिरायती वाण: पंचवटी (एनआयडीडब्लू-15), शरद (एनआयएडब्लू-2997-16)
  • जिरायती व मर्यादित सिंचनाची व्यवस्था: नेत्रावती (एनआयएडब्लू-1415)
डॉ. आदिनाथ ताकटे
प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
9404032389

English Summary: Seed Selection for rabbi crops
Published on: 16 October 2018, 09:02 IST