पिकांची लागवड करण्यापूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण यामुळे पिक उगवल्यानंतर होणारे बऱ्याच प्रकारचे रोग आणि किडींचा प्रादुर्भावटाळण्यास मदत होते. तसे पाहायला गेले तर बीजप्रक्रिया चे विविध पद्धती आणि कृती आहेत. या सगळ्या पद्धतींची आपण या लेखात माहिती घेऊ.
या आहेत बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती
1- बुरशीनाशकांचा उपयोग- जे बियाणे पेरायचे असते त्या बियाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी बुरशीनाशक भुकटी स्वरूपात बाजारांमध्ये उपलब्ध असतात. या पद्धतीत प्रक्रिया करताना बियाण्यावर पातळ थर तयार होईल अशा पद्धतीने प्रक्रिया करावी. बुरशीनाशकाच्या कार्यानुसार त्याचे दोन गटात वर्गीकरण केले जाते.
यातील पहिला म्हणजे रोग नाशक रसायन किंवा बुरशीनाशक यांचा यामध्ये समावेश होतो.- हे रसायन बीजप्रक्रिया नंतर रोगकारक बुरशीचा नाश करतात आणि बियाण्याची बुरशीपासून रक्षण करतात. परंतु हे रसायन बियाणे जमिनीत पेरल्यानंतर जास्त कालावधीपर्यंत सक्रिय राहत नाही. यातील दुसरे म्हणजे रोग रक्षक रसायन किंवा बुरशीनाशक हे होय. या प्रकारांमध्ये रसायने बियाण्याच्या पृष्ठभागाला चिकटून राहतात. एवढेच नाही तर त्यांनी उगवणीनंतर काही ठराविक काळापर्यंत पिकांचे रक्षण करतात.
2- कीडनाशकांचा उपयोग करून बीजप्रक्रिया- मातीमध्ये सूक्ष्म जीव तसेच अनेक पिकास अपायकारक असणारे कीटक आढळून येतात. त्यांच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस वीस ई सी किंवा पिकानुसार वेगवेगळी कीटकनाशक पाण्यामध्ये मिसळून त्याचे द्रावण तयार करून ते द्रावण बियाण्यावर शिंपडून द्यावे व बियाणे सुकवून त्याचा पेरणीसाठी वापर करावा.
जिवाणू खताची बीजप्रक्रिया करण्याच्या पद्धती
1- रायझोबियम जिवाणू - हे जीवाणू द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठीत राहुन सहजीवन पद्धतीने नत्र स्थिर करण्याचे काम करतो. हे जिवाणू झाडातील अन्नरस मिळवतात आणि त्याबदल्यात झाडांना नत्राचा पुरवठा करतात. रायझोबियम जिवाणू साधारणपणे 100 ते 200 किलोग्रॅम प्रति हेक्टर नत्र स्थिर करू शकतात.
2-आझाटोबेक्टर जिवाणू- हे जिवाणू एकदल पिकांच्या मुळांवर राहून अन्न मिळतात तसेच 20 ते 30 किलो ग्रॅम प्रति हेक्टरी नत्र स्थिर करतात.
3- पीएसबी जिवाणू-हे जिवाणू मातीमधील न विरघळणाऱ्या, स्थिर तसेच उपलब्ध न होणाऱ्याफॉस्फरसचे विघटन करून तो पिकास उपलब्ध करतात. यासाठी उपयोगी मात्र ही 250 ग्रॅम पाकीट प्रति 10 किलो बियाण्यासाठी प्रती जिवाणूसंवर्धककासाठी
मिठाच्या द्रावणाचा बीजप्रक्रियेसाठी वापर
यामध्ये पाण्याचा वापर करून मिठाचे 2% चे द्रावण तयार करावे.त्यासाठी 20 ग्रॅम मीठ एक लिटर पाण्यात पूर्णपणे विरघळून घ्यावी. जे बियाणे पेरणीसाठी वापरायचे आहे त्या बियाण्याच्या प्रमाणानुसार मीठ आणि पाणी यांचे प्रमाण कमी-अधिक करावे.
या द्रावणात पेरणीसाठी वापरायचे बियाणे पूर्णपणे बुडवून ढवळून घ्यावे. हलके आणि रोगयुक्त बियाणे पाण्यावरची तरंगू लागतात.ते बियाणे चाळणीने वेगळे करून काढून टाकावेत आणि जे बियाणे तळाशी आहे त्या बियाण्याचा पेरणीसाठी वापर करावा.
महत्त्वपूर्ण बातम्या
नक्की वाचा:माहिती गरजेची! गावठाण विस्तार म्हणजे नेमके काय? वाचा आणि जाणून घ्या
नक्की वाचा:असे करा कारली व दोडका लागवड आणि व्यवस्थापन, नियोजन
Published on: 16 May 2022, 11:04 IST