बीज अंकुरण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे शुक्राणुजन्य वनस्पतींच्या बियांमध्ये असलेले गर्भ नवीन वनस्पतीस जन्म देण्यास विकसित होते. शुक्राणुजन्य वनस्पती हा "उच्च वनस्पती" म्हणून ओळखल्या जाणार्या वनस्पतींचा समूह आहे, "शुक्राणू " ग्रीक भाषेत याचा अर्थ बीज आहे.बीज अंकुरण म्हणजे बीज (बी) रुजून त्यातून अंकुर बाहेर येण्याची प्रक्रिया होय. अंकुरण हा वनस्पतींच्या वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गर्भ ही बीजांची मूलभूत रचना असते. वनस्पतींचे सपुष्प (फुले येणार्या) वनस्पती व अपुष्प (फुले न येणार्या) वनस्पती असे गट पडतात.
सपुष्प वनस्पतींच्या बीजामध्ये वनस्पतीचा पूर्ण वाढ झालेला गर्भ सुप्तावस्थेत असतो. त्यात बीजाच्या अंकुरणासाठी आवश्यक असलेल्या अन्नघटकांचा साठा असतो.अनुकूल परिस्थितीत बीजे रुजतात व त्यांपासून नवीन रोपे तयार होतात. भिजत घातलेल्या कडधान्याला येणारे मोड हे अंकुरणाचे नेहमीच्या पाहण्यातील एक उत्तम उदाहरण आहे. बुरशी, शैवाल, कवक इ. अपुष्प वनस्पतींमध्ये सपुष्प वनस्पतीप्रमाणे बीज तयार होत नाही. त्यांचे प्रजनन पेशींपासून होते. या पेशींना बीजुके म्हणतात. ही बीजुके रुजून त्यातून अंकुरनलिका बाहेर येते. यालाही अंकुरण असे म्हणतात.काही वनस्पतींच्या शाकीय अवयवांपासूनही नवीन वनस्पती निर्माण होतात. उदा., बटाटा, हळद, अळू इ.
बीज अंकुरण म्हणजे बीज (बी) रुजून त्यातून अंकुर बाहेर येण्याची प्रक्रिया होय. अंकुरण हा वनस्पतींच्या वाढीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गर्भ ही बीजांची मूलभूत रचना असते. वनस्पतींचे सपुष्प (फुले येणार्या) वनस्पती व अपुष्प (फुले न येणार्या) वनस्पती असे गट पडतात. सपुष्प वनस्पतींच्या बीजामध्ये वनस्पतीचा पूर्ण वाढ झालेला गर्भ सुप्तावस्थेत असतो. त्यात बीजाच्या अंकुरणासाठी आवश्यक असलेल्या अन्नघटकांचा साठा असतो.अनुकूल परिस्थितीत बीजे रुजतात व त्यांपासून नवीन रोपे तयार होतात. भिजत घातलेल्या कडधान्याला येणारे मोड हे अंकुरणाचे नेहमीच्या पाहण्यातील एक उत्तम उदाहरण आहे.
बीजांची, बीजुकांची किंवा काही शाकीय अवयवांची सुप्तावस्था गरजेप्रमाणे कृत्रिमरीत्या कमी करणे किंवा त्यास विलंब लावणे हे कृषिव्यवसायात महत्त्वाचे आहे.अंकुरणाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत : अधिभूमिक व अधोभूमिक.अधिभूमिक प्रकारामध्ये बीजामधून बीजपत्र बीजावरणातून बाहेर पडते, तर अधोभूमिक प्रकारामध्ये बीजपत्र बीजावरणातच राहते. खारफुटी वनस्पतीत बीज फळामध्ये असताना व झाडाला चिकटलेले असतानाच त्याचे अंकुरण होते. यास उद्भेदन म्हणतात.
अन्नदाता सुखीभव
Mr.SATISH BHOSALE
Published on: 11 June 2022, 05:19 IST