Agripedia

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे.

Updated on 11 January, 2022 1:29 PM IST

राज्याच्या भूमि अभिलेख विभागाने सर्व्हे नंबरनिहाय गाव नकाशा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे संबंधित गावामध्ये जमीन कुठे आहे, जमिनीच्या चतु:सिमा, आजबाजूचे गटनंबर आणि मालक कोण आहेत, याची माहिती घरबसल्या एका क्‍लिकवर उपलब्ध होत आहे.

ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी गाव नकाशाची माहिती गाव तलाठ्याच्या कार्यालयात जाऊन घ्यावी लागत होती. त्याची आता गरज लागणार नाही. 

सातबारा उतारा गाव नकाशाशी लिंक केल्यामुळे राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्‍यातील अथवा गावातील जमिनींची अक्षांक्ष-रेखांक्षसह (जीपीएस) सर्व माहिती नागरिकांना सहजरित्या उपलब्ध होणे शक्‍य झाले आहे.

सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामुळे जमिनीचे स्थान निश्‍चितीसाठी ही माहिती उपयुक्‍त ठरणार आहे. त्याच बरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

त्याच बरोबर संबंधित सर्व्हे नंबरवर मालकी कोणाची आहे हे समजणार आहे. राज्यात एकूण 44 हजार 278 गावे असून त्यापैकी 36 हजार 500 गावचे नकाशे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित गावांचे नकाशा लवकरच ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती ई-फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.ऑनलाइन सातबारा उतारा, आठ “अ’, फेरफार आदी सुविधांबरोबरच सर्व्हे नंबरनिहाय गावाचा नकाशा महाभूनकाशा या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.

असा शोधा नकाशा

- सर्व्हे नंबरनुसार गाव नकाशा संकेतस्थळावर उपलब्ध

- या संकेतस्थळावर गेल्यावर पहिल्यांदा जिल्हा निवडा, तालुका आणि त्यानंतर गाव निवडा

- यानंतर गाव नकाशा हा पर्याय निवडा

- गाव नकाशा उपलब्ध होईल

- संबंधित सर्व्हे नंबर टाकल्यावर त्या क्षेत्राचा नकाशा पीडीएफमध्ये उपलब्ध 

English Summary: See village map online
Published on: 11 January 2022, 01:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)