Agripedia

भारत देशात सध्या कमी दिवसात जास्त उत्पादन मिळवण्यासाठी केमिकल खतांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे आता जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे आणि जमिनीमधून उत्पादन कमी मिळत आहे.

Updated on 04 December, 2021 7:53 PM IST

त्यामुळे बरेच शेतकरी आता सेंद्रिय शेती कडे वाटचाल करताना दिसत आहे. तर त्यातलाच एक भाग म्हणजे गांडूळ खत. तर आज आपण गांडूळ निर्मिती प्रक्रिया आणि त्याचे फायदे पाहणार आहे. गांडूळ खतापासून झाडांच्या वाढीसाठी लागणारे अन्यद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू मिळतात.

गांडूळाचे तीन प्रकार आहेत :- 

एपिजीक :- हे गांडूळे साधारणपणे जमिनीच्या खालच्या भागात राहत आणि हे 80 टक्के अन्न हे सेंद्रिय अन्न खातात व 20 टक्के माती व इतर पदार्थ खातात. त्याचा आकार लहान अजून त्याचा प्रजननाचा काळ अधिक असतो.

ऑनेसीक :- हे गांडूळे साधारणपणे जमिनीच्या 1 मीटर अंतरावर असतात. हे सेंद्रिय पदार्थ आणि माती खातात. या गांडूळाचा आकार मध्यम असतो.

 एण्डोजिक :- हे गांडूळ जमिनीत तीन मीटर किंवा त्या पेक्षा अधिक खोली वर राहतात. याचा आकार लांब असतो आणि प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. या मध्ये आईसेनिया फेटीडा, पेरीऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती जास्त उपयुक्त मानल्या जातात.

गांडूळखतासाठी गांडूळाच्या जाती :-

गांडूळाच्या एकूण 300 पेक्षा ही अधिक जाती आपल्याला पाहण्यास मिळतात पण ईसिना फोइटीमा, युट्रीलस युजेनिया, पेरिनोक्सी , एक्सोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या जाती गांडुळखतासाठी चांगल्या मानल्या जातात. हे गांडूळ 40 ते 45 दिवसा मध्ये गांडूळ खत निमिर्ती प्रक्रिया सुरू करतात

 गांडूळखत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ :- 

पिकांचे अवशेष :- धसकटे, पेंढी, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत.

जनावरांपासून मिळणारे उप उत्पादीते :- शेण, मूत्र, शेळ्यांच लेंडी खत, कोंबड खत इ.

हिरवळीचे खते :- ताग, धैंचा, गिरीपुष्य, शेतातील तण इ.

घरातील केरकचरा :- भाज्यांचे उरलेले अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इ.

 

गांडूळखत प्रक्रिया :-

गांडूळखत तयार करतांना ते ढीग किंवा खड्डा या दोन्ही प्रकारे बनवता येते. पण या दोन्ही प्रकारामध्ये त्यांना ऊन व पावसापासून स्वरक्षण करण्यासाठी छप्पराची सावली करावी कारण या प्रक्रियेत त्यांना कृत्रिम सावलीची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थपासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7000 मोठे गांडुळ खत सोडावे. आणि दुसऱ्या थरावर आपण वरती पाहिले त्या पदार्थाचा उपयोग करावा. सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून टाकले तर ते अधिक प्रभावी असतात. त्यातील कर्बःगुणोत्तर चे प्रमाण 30 ते 40 टक्के असते. सगळ्या ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची काळजी घ्यावी. या ढिगांवर गोणपाटाचे आच्छादन घालून त्यावर रोज पाणी फवारावे.

गांडूळखत तयार करण्यासाठी उपयुक्त गोष्टी :- 

गांडूळखत प्रकल्प हा सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.

शेणखत आणि शेतातील पिकांचे अवशेष याचे प्रमाण 3:1 असावे. आणि गांडूळ सोडण्यापूर्वी ते 15 ते 20 दिवस कुजून घ्यावे. 

 खड्याच्या तळाशी पहिल्यादा 15 ते 20 सेंमी बारीक वाळलेला पाला पाचोळा टाकून घ्यावा. 

 गांडूळ वाफ्यात सोडण्यापूर्वी त्या वाफ्यावर 1 दिवस आधी पाणी मारावे. 

 गांडूळ वाफ्यात टाकल्यानंतर वातावरणातील उष्णता पाहून पाणी फवारावे.

गांडूळापासून व्हर्मीवॉश मिळवण्यासाठी एक विशिष्ट जाळी असते ती जाळी त्या खड्यावर लावून व्हर्मीवॉश गोळा करावे.

 

 गांडूळ खताचे फायदे :-

पिकांच्या वाढीसाठी लागणारे मुख्य व सुक्ष्मअन्नद्रव्ये यामध्ये उपलब्ध असतात आणि या खतामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते.

 या खतांमध्ये अन्नद्रव्ये असे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात त्यामुळे झाडांच्या मुळाची वाढ लवकर होते.

गांडूळखत हे अनेक प्रकारचे जिवाणू आणि बुरशी तयार करते. त्यामुळे पिकांवर रोग आणि कीड पडत नाही. 

 

गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत होते त्यामुळे जमिनीत हवा आणि पाणी खेळते राहते व पिकाच्या वाढीसाठी ते चांगले असते.

या खतामुळे जमिनीत पाण्याचा चांगल्या प्रकारे निचरा होतो त्यामुळे जमिनीची जलधारण पातळी वाढते.

 पाऊस जरी योग्य वेळी झाला नाही तरी जलधारणा पातळी वाढली असल्याने त्याचा पिकांवर परिणाम होत नाही.

 यामुळे पाणी जमिनीला देण्याचा आणि सिंचनाचा खर्च वाचतो.

 गांडूळाची रचना कणीकदार असते त्यामुळे ते जमिनीच्या मातीची वाऱ्यापासून आणि पावसापासून धूप होण्यास मदत करते.

प्रत्येक शेतकरीमित्रांनी त्याच्या गरजेनुसार आणि गरजेपुरते गांडूळखत तयार करू शकतो. त्यामुळे उत्पादन वाढते आणि खर्च कमी होतो.

जैविक शेतकरी

शरद केशवराव बोंडे. 

bondes841@gmail.com 

9404075626

English Summary: See the complete process of making vermicompost at home and the benefits of fertilizer in detail
Published on: 22 November 2021, 08:30 IST