बऱ्याच वेळा रासायनिक बुरशीनाशके वापरून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा पीक लागवडीपासूनच ट्रायकोडर्माचा वापर करणे फायदेशीर ठरते. ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आळवणी, शेणखत, तसेच ठिबक सिंचनाद्वारे करता येतो पिकावरील रोगनियंत्रणासाठी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. जमिनीद्वारे, बियांमार्फत पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी जमिनीत बियाण्याच्या, रोपांच्या मुळांच्या सान्निध्यात रासायनिक
बुरशीनाशकांचा वापर करावा लागतो. परंतु जमिनीत रासायनिक बुरशीनाशकांची कार्यक्षमता जास्त काळ टिकून राहत नाही,But the effectiveness of chemical fungicides in the soil does not last long, तसेच त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजिवांच्या कार्यक्षमतेवर देखील विपरीत परिणाम होतो.
रासायनिक खतांची निवड करतांना खालील बाबींचा आवश्य विचार करावा
सेंद्रिय पीकपद्धतीमध्ये ट्रायकोडर्मा ही बुरशी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. निसर्गतः ट्रायकोडर्मा जमिनीत उपलब्ध असते. नैसर्गिकरीत्या रोग- किडींचे नियंत्रण होत असते. परंतु बदलत्या हवामानामुळे, पीकपद्धतीमुळे, वाढत्या सिंचनामुळे जमिनीतील रोगकारक बुरशींची संख्या दिवसेंदिवस
वाढत आहे. बऱ्याच वेळा रासायनिक बुरशीनाशके वापरून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाही. तेव्हा पहिल्यापासून ट्रायकोडर्माचा वापर करणे आवश्यक आहे. ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर आळवणी (ड्रेंचिंग), शेणखतात आणि ठिबक सिंचनाद्वारे करता येतो.उपयोग - 1) जमिनीत असणाऱ्या हानिकारक, रोगकारक बुरशी - जसे फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, पिथिअम, मॅक्रोफोमिना, स्क्लेरोशिअम, रायझोक्टोनिया इत्यादींचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायकोडर्माचा वापर करणे फायद्याचे ठरते. या
रोगकारक बुरशींमुळे टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा यामध्ये मूळकूज, कॉलर रॉट, डाळिंबामध्ये मर रोग इत्यादी रोग होतात, त्यामुळे पिकाचे नुकसान होते.2) ट्रायकोडर्मा जमिनीत मंद गतीने वाढत असल्या कारणाने दुसऱ्या अपायकारक बुरशींवर उपजीविका करून त्यांची वाढ नियंत्रणात ठेवते.3) ट्रायकोडर्मा दुसऱ्या बुरशींवर उपजीविका करताना ट्रायकोडर्मिन, ग्लियोटॉक्सिन, व्हिरीडीन यासारखी
प्रतिजैविके म्हणजे हानिकारक बुरशींसाठी विषकारक घटक निर्माण करते. तसेच, या बुरशीमुळे सेंद्रिय पदार्थ देखील कुजवून सेंद्रिय खत निर्मितीत ट्रायकोडर्मा मदत करते.4) या बुरशीचा वापर शेडनेट, पॉलिहाऊसमधील भाजीपाला लावताना, फुलपिके लावताना, बेड भरताना, शेणखतात, मातीमध्ये मिसळून, नर्सरीत रोपे टाकण्यापूर्वी आळवणीकरिता करता येऊ शकतो. त्यामुळे मूळकूज, कंदकूज, मर रोग, खोड
सडणे, कॉलर रॉट, बियाणेकूज इत्यादी रोगांचा बंदोबस्त होतो. ट्रायकोडर्माचा वापर सुडोमोनॉस फ्लुरोसन्स, पॅसिलोमायसिस यांच्याबरोबर प्रभावीपणे सूत्रकृमी नियंत्रणासाठी केला जाऊ शकतो. 5) डाळिंब बागेत मर रोग व सूत्रकृमी नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ट्रायकोडर्मा वनस्पतीच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात वाढताना थोड्याफार प्रमाणात अन्नद्रव्ये देखील उपलब्ध करून देते, तसेच रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त स्राव देखील सोडते, त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते.
Published on: 19 October 2022, 02:39 IST