Agripedia

शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत आहे. नांगरणी आणि इतर च्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो.

Updated on 06 February, 2022 11:25 AM IST

शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत आहे. नांगरणी आणि इतर च्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने आपल्या खिशाला कात्री बसत असते. ट्रॅक्टर म्हणा किंवा इतर वाहने यांच्या इंधनावरती मोठा पैसा खर्च करावा लागतो. परंतु शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टर नाही वापरला तर आपली कामे पडून राहतील. आता बाजारात असे ट्रॅक्टर येणार आहे जे आपला पैसा आणि वेळ वाचणार आहे. या आधी इलेक्ट्रिक बस, कार विषयी ऐकलं वाचला असेल. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे आपल्या इंधनावर होणारा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत. 

काय फरक आहे डिझेल ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये

 या दोन्ही ट्रॅक्टर मधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या ऑपरेटिंग किंमत. ई ट्रॅक्टरचा ऑपरेटिंग खर्च एका तासामध्ये सुमारे 25 ते 30 रुपये असेल. तर सामान्य ट्रॅक्टर चालवण्यास तर तासाला सुमारे दीडशे रुपये खर्च येतो. ती ट्रॅक्टर प्रति तासाला शेतकऱ्यांचे सुमारे 120 रुपयांची बचत करेल. जर प्रत्येक तासाला तुमच्या 120 रुपये वाचत असतील तर तुमच्या मुबलक पैसा वाचणार आहे. ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर शून्य उत्सर्जन करेल अशा पद्धतीने बनविण्यात आले आहे. 

ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर शून्य उत्सर्जन करेल अशा पद्धतीने बनविण्यात आले आहे. यामुळे हे पर्यावरणासाठी अनुकूल आहे. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मधील बॅटरी आपण बदलू शकतो आणि त्याला परत चार्ज ही करू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टर च्या किमती च्या तुलनेत स्वस्त आहे.

 

 या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये

1-ई ट्रॅक्टर्स मुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे कारण इलेक्ट्रिक ट्रॅक्टर चे इंजिन 300 भागात येत नाही. साधारण ट्रॅक्टर चे इंजिन 300 पार्ट मध्ये येत असते.

2-आपण या ट्रॅक्टरची बॅटरी बदलू शकतो किंवा त्याला परत चार्ज करू शकतो.

3- ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर ची पावर ही सहा एचपी आहे पण ही पावर साधारण ट्रॅक्टरच्या 21 एचपी च्या बरोबरीची आहे.

4- एकदा चार्जिंग केल्यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 75 किलोमीटर धावू शकते.

5- ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर वीस किमी प्रति तास वेगाने धाऊ शकते.

6- औद्योगिक ट्रॅक्टर मध्ये निवासी वातावरणात बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी सहा तासांत पर्यंतचा कालावधी लागतो. जेथे औद्योगिक ऊर्जा सॉकेट मधील बॅटरी दोन तासात वेगवान चार्ज होऊ शकते.

English Summary: See different between noraml tractor and electric tractor
Published on: 06 February 2022, 11:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)