Agripedia

प्रत्येक सजीव प्राण्याला जगण्यासाठी अन्न आणि पाणी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत.

Updated on 05 July, 2022 1:26 PM IST

प्रत्येक सजीव प्राण्याला जगण्यासाठी अन्न आणि पाणी ह्या गरजेच्या गोष्टी आहेत. त्यात प्रामुख्याने अन्न हि दैनंदिन जीवनातील खूप महत्वाची गरज आहे. मनुष्य, प्राणी, पक्षी हि गरज भागवण्यासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात. आपली हि गरज फळ, फुल, पाने हे पूर्ण करतात. काही वन्यजीव प्राणी सुद्धा फक्त वनस्पती वर अवलंबून असतात.ह्या सृष्टी मध्ये एक प्रकार ची अन्न साखळी निर्मित केलेली आहे. उदा. हरीण गवत खाते व त्या हरिणाला वाघ खातो. म्ह्णून अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष प्रत्येक सजीव वनस्पती वर अवलंबून आहे. सजीवाला अन्नाची गरज असते. अन्नसाखळीत अन्न मिळविणे आणि दुसर्‍याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते. यामध्ये उत्पादकांपासून ते सर्वोच्च उपभोक्त्यांपर्यंत अन्नऊजेंचे क्रमवार ऊर्जांतरण होत असते. परिसंस्थेत अनेक अन्नसाखळ्या आढळतात.परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव एकत्र राहतात. प्रत्येक परिसंस्थेतील जैविक समाजाचे उत्पादक, भक्षक व अपघटक असे मुख्य तीन गट असतात.

या प्रत्येक गटाचे आपापले विशिष्ट कार्य असते. ह्यातील वनस्पती हि उत्पादक असते. वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करतात. हि प्रक्रिया प्रकाश संश्लेषण या द्वारे पूर्ण होते. ह्यात पाने, मुळे आणि देठ महत्वाचे मदतगार ठरतात. प्रकाश संश्लेषण या क्रियेत वनस्पती सूर्यप्रकाश शोषून ती उर्जा रासायनीक उर्जेत परिवर्तीत करतात.वनस्पती ला जगण्यासाठी व अन्न तयार करण्यासाठी मुख्यत्वे सूर्य प्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साइड ह्यांची गरज असते. पानांमध्ये लहान मोठ्या शिरा असतात. जे पानामध्ये सर्वत्र पाणी पोहचवतात. तसेच पानांमध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो ज्यामुळे पानाला हिरवा रंग प्राप्त होतो. हाच घटक ह्या क्रियेला कारणीभूत असतो. पानांवर छोटे छोटे छिद्र असतात ज्यातून ते कार्बन डायऑक्साइड हवेतून शोषून घेतात.झाडांची मुळे जमिनीतून पाणी व मिनरल्स शोषून घेतात व देठाद्वारे पानांपर्यंत पोहचवतात. पानातील क्लोरोफिल सूर्याची किरणे शोषून घेतात. कार्बन डायऑक्साइड हवेच्या माध्यमातून पानांच्या छिद्रांद्वारे प्रवेश करतात. 

किरणांच्या मदतीने कार्बन व पाणी एकत्रित मिळून (संश्लेषण) अन्न तयार करतात. म्हणजेच ह्या प्रक्रियेतून कार्बोहैड्रेट (ग्लुकोज, सुक्रोज व स्टार्च) आणि ऑक्सीजन, पाणी हे घटक तयार होतात. पाणी कोशिका द्वारे पुन्हा शोषून जैव-रासायनिक प्रक्रियेत सहभागी होतात. ऑक्सीजन छिद्र द्वारे हवेत बाहेर फेकले जातात व ग्लुकोज शिरा व देठाद्वारे वनस्पती च्या इतर भागात पोहचवतात. ह्या प्रक्रिये मधून तयार झालेले अन्न वनस्पती स्वतः च्या विकासासाठी वापर करतात आणि उरलेले अन्न (स्टार्च) मध्ये परिवर्तित करतात आणि ते फळे, फुले, खोड ह्या मध्ये साठवतात आणि पुढे हेच घटक इतर सजीव आपले अन्न म्हणून वापरतात.पाणी, कार्बनडाइऑक्साइड, सूर्यप्रकाश व क्लोरोफिल (हरितलवक) हे प्रकाश संश्लेषण चे प्रमुख घटक आहेत.प्रकाश संश्लेषणाचे महत्व :हिरव्या वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषणाची कृती वनस्पती आणि अन्य जिवंत प्राण्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची क्रिया आहे. या क्रियापटात, वनस्पती सूर्यप्रकाशाची प्रकाशीय ऊर्जेला रासायनिक ऊर्जा मध्ये रुपांतरीत करतात आणि कार्बन आणि पाणी या सामान्य पदार्थांपासून कार्बोहायड्रेट्स तयार करतात हेच कार्बोहायड्रेट्स मानवांना आणि प्राण्यांना अन्न पुरवतात. 

अशाप्रकारे, वनस्पती प्रकाशसंश्लेषणाच्या कृतीतून संपूर्ण जगासाठी अन्नाची व्यवस्था करतात. कार्बोहायड्रेट प्रथिने आणि जीवनसत्वे इत्यादी प्राप्त करण्यासाठी विविध पिके घेतली जातात आणि हे सर्व पदार्थ प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार केले जातात. रबर, प्लास्टिक, तेल आणि विविध प्रकारची औषधे प्रकाशसंश्लेषणाद्वारे तयार होतात. आपल्या शेतातील पिके प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड गोळा करतात आणि ऑक्सिजन काढून टाकतात, त्यामुळे वातावरण स्वच्छ करतात. सर्व प्राण्यांना श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्त्वाचे आहे. ही कृती पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप महत्त्वपूर्ण कामगिरी पार पडते. प्रकाशसंश्लेषण हे मासेमारीसाठी देखील अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा प्रकाश संश्लेषणाची कृती मंद होते, तेव्हा पाण्यात वाढणारी कार्बन डायऑक्साइडची संख्या वाढते.प्रकाशसंश्लेषण आणि श्वसन क्रिया एकमेकांच्या पूरक आणि उलट आहेत. प्रकाशसंश्लेषणात, कार्बन डायॉक्साईड आणि पाणी यांच्यातील रासायनिक क्रियामुळे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचे उत्पादन होते. मानव शरीर श्वसना द्वारे ऑक्सिजन आत घेतो व कार्बन डायॉक्साईड बाहेर फेकतो जे पुन्हा प्रकाशसंश्लेषणासाठी उपयुक्त ठरते.

 

अधिक माहितीसाठी संपर्क: ऍग्रो मार्ट

श्री.समर्थ ऍग्रो एजन्सी, 

हॉटेल जानवी(आयडीबीआय बँकेसमोर) करवंद नाका शिरपूर, 9028195176, 8485078780

English Summary: See crop and photosynthesis action
Published on: 05 July 2022, 01:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)