Agripedia

महाराष्ट्रातील अनेक शेतकरी कोरडवाहू कपाशी लागवड करत असततात.

Updated on 03 June, 2022 12:34 PM IST

परंतु पाण्याअभावी त्या शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची पदरी निराशाच पडते त्यामुळे आज आपण कोरडवाहू कपाशी चे व्यवस्थापन जाणून घेणार आहोत.जमिनीची निवड - पाण्याचा निचरा होणाऱ्या व जलसंधारणशक्ती उत्तम असणाऱ्या मध्यम ते भारी जमिनीवर लागवड करावी. (जमिनीचा सामू ६ ते ८.५ पर्यंत)उथळ/कमी खोली असणाऱ्या व हलक्या जमिनीवर कपाशीची लागवड करू नये.पाणी धरून ठेवणारी व पाणथळ जमीनही कपाशीला हानिकारक ठरते.हवामान - कपाशी हे साधारण ६० ते ७५ सेंमी पावसाच्या प्रदेशात चांगले येते. बियाणांची उगवण होण्यासाठी किमान १५ अंश सें तापमान,पिकाच्या अपेक्षित वाढीसाठी २१ ते २७ अंश सें. तापमान, फुलपाती फळधारणा चांगली होण्यासाठी २७ ते ३३ अंश सें. तापमान आवश्यक असते.

जमिनीची मशागत - कोरडवाहू लागवडीसाठी भारी व काळ्या जमिनीमध्ये दोनतीन वर्षांनी एक वेळा खोल नांगरणी करावी. नांगरणीनंतर मोगडणी करून घेतल्याने मातीची ढेकळे फुटतात. मोगडणीनंतर दोन-तीन वखराच्या पाळ्या देऊन ३० सें.मी. रुंदीच्या सऱ्या पाडाव्यात.शेवटची वखरणीपूर्वी कोरडवाहू कपाशीसाठी ५ टन (१०-१२ गाड्या) व बागायती लागवडीसाठी १० टन (२०-२५ गाड्या) चांगले कुजलेले शेणखत/कंपोस्ट खत शेतात मिसळून द्यावे. परिणामी मॅग्नेशिअम, झिंक इ. सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण वाढते.वाणांची निवड- बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे.महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रासाठी आयसीएआर-केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने प्रसारित केलेले वाण - आयसीएआर-सीआयसीआर पीकेव्ही ०८१ बीटी, आयसीएआर-सीआयसीआर रजत बीटी, आयसीएआर-सीआयसीआर सुरज बीटी, आयसीएआर-सीआयसीआर जीजेएचव्ही ३७४ बीटी.

पेरणीची वेळ - बागायती कापूस पिकाची लागवड मे महिन्याच्या शेवटचा आठवडा ते जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली असेल. मात्र, कोरडवाहू कापूस पिकाची लागवड मॉन्सूनचा तीन-चार इंच पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणी योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे. १५ जुलैनंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. पेरणीस एक आठवडा उशीर झाल्यास उत्पादनात एकरी क्विंटलपर्यंत घट होऊ शकते.धूळपेरणी - मध्यम ते भारी जमिनीत मॉन्सून पाऊस येण्याचा अंदाज घेऊन ७ ते ८ दिवस अगोदर पेरणी करावी.पेरणीचे अंतर - बी टी कपाशीमध्ये वाढणाऱ्या बोंडाकडे उपलब्ध अन्नद्रव्यांचे वहन होते. त्यामुळे झाडाची जमिनीस समांतर (आडवी) वाढ कमी होऊन फळफांद्याची लांबी कमी झाल्याचे आढळून येत आहे. बीटी कपाशीची लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी झाडांची संख्या वाढविणे शक्य झाले असले तरी पेरणीचे अंतर खालीलप्रमाणे योग्य असावे.

बीटी कापूस कोरडवाहू लागवड : १२० x ४५ सें.मी. (४ x १.५ फूट)बीटी कापूस बागायती लागवड : १५o x ३० सें.मी. (५ x १ फूट) किंवा १८o x ३० सें.मी. (६ x १ फूट)आय सी ए आर-केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने विकसित केलेल्या वाणांची ९० x ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.आश्रयात्मक (रेफ्युजी) ओळी - बोंडअळ्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये बी टी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होण्याचे टाळण्यासाठी बीटी कपाशीसोबत बीटी विरहीत बियाणे लावणे नितांत आवश्यक आहे.बीजप्रक्रिया - थायरम किंवा कॅप्टन किंवा सुडोमोनास या बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. यामुळे मर, करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.पिकाच्या वाढीसाठी नत्र स्थिरीकरण करण्यासाठी ॲझेटोबॅक्टर/ॲझोस्पिरीलम व स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणू संवर्धकाची २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे गुळाच्या पाण्यात घट्ट मिश्रण तयार करून बियाण्यास चोळावे व सावलीत वाळवावे.

English Summary: See also dryland cotton planting planning
Published on: 03 June 2022, 12:34 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)