Agripedia

एका इंजिनिअरचा प्रवास…एका गावासाठी, एका ध्येयासाठी... मी विक्री करू शकतो, पण का नाही माझ्या मातीतून, माझ्या माणसांसाठी?" हा प्रश्न होता संदीप कापसे यांच्यासमोर- माढा तालुक्यातील कापसेवाडी या छोट्याशा गावातील एक प्रतिभावान मेकॅनिकल इंजिनिअर. पुण्यातील प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीत दहा-पंधरा लाखांच्या कार विकणारा टॉप सेल्समन. पण आत्मा मात्र शुध्दतेच्या शोधात...!

Updated on 04 August, 2025 4:34 PM IST

एका इंजिनिअरचा प्रवास…एका गावासाठी, एका ध्येयासाठी...

मी विक्री करू शकतो, पण का नाही माझ्या मातीतून, माझ्या माणसांसाठी?" हा प्रश्न होता संदीप कापसे यांच्यासमोर- माढा तालुक्यातील कापसेवाडी या छोट्याशा गावातील एक प्रतिभावान मेकॅनिकल इंजिनिअर. पुण्यातील प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीत दहा-पंधरा लाखांच्या कार विकणारा टॉप सेल्समन. पण आत्मा मात्र शुध्दतेच्या शोधात...!

लॉकडाऊन एक वळण…एक क्रांती-

कोरोनाने देश थांबला…आणि संदीप परत आले गावाकडे. शहराच्या चकाकीतून थेट माढ्याच्या मातीत…आणि सुरू झाली एक वैचारिक क्रांती- लाकडी घाण्याच्या माध्यमातून शुद्ध तेल निर्मितीची!

"रिफाइंड नव्हे, परंपरेचा परीघ- लाकडी घाणा म्हणजेच खरं ‘रहस्य’!"

‘रहस्य’- नावातच आरोग्याचं उत्तर

कुटुंबाच्या पाठबळावर उभारलेलं हे स्वप्न –

▪ वडील -शिक्षक

▪ आई - शिक्षिका

▪ बहीण Dr. BAMS- आयुर्वेद सल्लागार

▪ पत्नी- खंबीर साथ

"शेतीची माती + शिक्षणाची नजर + नोकरीचा अनुभव = ‘रहस्य’!"

तालुका माढा- तिथेच उगम, तिथेच उद्योग!

▪ सुरुवात- १० लाखांच्या भांडवलातून

▪ प्रकल्प- थेट माढा गावात

▪ २ लाकडी घाणा- एक घाणा व्यवसायासाठी, एक घाणा माफक दरात तेल निर्मिती ...शेतकऱ्यांसाठी

▪ आजची यंत्रणा- २४ लाखांची, अत्याधुनिक आणि परंपरेशी नातं जपणारी!

तेलनिर्मिती- परंपरा आणि विज्ञानाचा संगम-

▪ ९ प्रकारचे तेल- शेंगदाणा, करडई, मोहरी, तीळ, सूर्यफूल, खोबरेल, बदाम, जवस, एरंडी

▪ १२ किलो शेंगदाण्यांपासून मिळते ४.५ लिटर शुद्ध तेल

▪ संपूर्ण प्रक्रिया- ४५-५० मिनिटांत पारदर्शक आणि हळुवार

तेल उत्पादनानंतरही- “पेंड”द्वारे पशुखाद्य मूल्यवर्धन

🧠 ब्रँडिंग,- रहस्य म्हणजे शुद्धता, आरोग्य आणि निसर्गाशी नातं!

▪ ISO 9001:2015 आणि फूड सेफ्टी प्रमाणित

▪ सर्व तेल NABL लॅब प्रमाणित

▪ पॅकिंग- २०० मि.ली. ते ५ लिटर

▪ स्लोगन- “रहस्य सुखी जीवनाचे”

विक्रीचा विस्तार- ग्राहकांचा विश्वास!

▪ विक्री केंद्र- कुर्डुवाडी, वैराग, सोलापूर, पुणे व ऑनलाईन

▪ मासिक विक्री- १५००-१६०० लिटर

▪ मागणी सर्वाधिक – शेंगदाणा, करडई, खोबरेल तेलांना!

▪ हेल्थ प्रदर्शनं, मॉर्निंग वॉक स्टॉल्स, परिसंवाद…जिथे आरोग्य, तिथे रहस्य’! "तेल फक्त बघू नका… चव घ्या, अनुभव घ्या… मगच ठरवा!"

शेतकऱ्यांसाठी- ‘रहस्य’ म्हणजे नवसंजीवनी

▪ सेंद्रिय मालाचं मूल्यवर्धन.

▪ रास्त दरात गाळप सेवा उपलब्ध.

▪ दर्जेदार बियाणे उपलब्ध.

▪ तेलानंतर उरलेली पेंड- पशुखाद्य उत्पन्नाचा आणखी एक स्त्रोत.

ग्रामीण स्टार्टअप…पण जागतिक दृष्टिकोन!

जेव्हा एक अभियंता गावासाठी स्वतःच्या हाताने उद्योग घडवतो, तेव्हा तो फक्त उत्पादक राहत नाही, तर समाजपरिवर्तनाचा शिल्पकार ठरतो!*

“‘रहस्य’ हा फक्त ब्रँड नाही… ही जिद्द, मूल्य आणि मातीतून उगम पावलेली प्रेरणा आहे!

उद्योजक- श्री. संदीप कापसे

मो.बा- 7843022333

ब्रँड- रहस्य: लाकडी घाण्याचे शुद्ध तेल

मु.पो. माढा, ता. माढा, जि. सोलापूर

वेबसाईट- https://www.rahasyaoils.com

खरेदीसाठी थेट WhatsApp Catalog:

https://wa.me/c/917843022333

लेखक- नितीन रा. पिसाळ

पशुसंवर्धन सल्लागार व कृषी अभ्यासक

फार्मर द जर्नलिस्ट- कृषी जागरण

English Summary: Secret - A brand of pure edible oil originating from wood waste!
Published on: 04 August 2025, 04:34 IST