Agripedia

सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे तण नाशके उपलब्ध आहेत,

Updated on 10 July, 2022 7:31 PM IST

सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे तण नाशके उपलब्ध आहेत, परंतु सद्य परिस्थितीत अनेक शेतकरी मित्रांच्या तक्रारी येत आहे : तण नाशक फवारले आणि स्कॉर्चिंग आले, किंवा सोयाबीन वाळत आहे किंवा पिवळे पडले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .याचे नेमके कारण काय ?अयोग्य तण नशकांचा वापर व अयोग्य प्रमाणात वापर केल्यास तण नाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी केल्यास तण नाशक आणि खत किंवा टॉनिक एकत्रित फवारणी केल्यास फवारणी साठी कमी -जास्त प्रमाणात प्रमाणात पाण्याचा वापर २ किंवा ३ तण नाशके एकत्रित फवारणी केल्यास 

आपले सोयाबीन पीक हे सुध्दा वाळू शकते किंवा पिवळे पडतेतण नाशक फवारणी मुळे स्कॉर्चींग आल्यास किंवा सोयाबीन पिवळे पडल्यास खालील प्रमाणे नियोजन करावेशेतकरी मित्रांनी घाबरून न जाता सर्व प्रथम जर जास्त प्रमाणात स्कॉर्चींग आले असेल तर पिकाला पाळी देणे व त्यानंतर DAP + Urea असे खत देणे.जर सोयाबीन पिवळे पडून वाळत असेल तर जमिनीतून युरिया + DAP खत द्यावे किंवा २०:२०:००:१३ सोबत Zinc sulphate द्यावेफवारणी करणे शक्य असेल तर : १९:१९:१९ १०० gmAmino acid / Cytokinine २५-३० mlआणि अणि micronutrients 25 gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी

किंवा १९:१९:१९ ५० gm , Urea ५० gm, Amino acid / Cytokinine २५-३० ml आणि,Zinc oxide २५ ml प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावीतण नाशक वापरताना कोणतेही एकच किंवा शिफारशीत २ एकत्र करून फवारणी करावी त्यापेक्षा जास्त एकत्र करू नयेत. तण नाशक व कीटक नाशक किंवा बुरशी नाशक यांची एकत्र करून फवारणी करू नये तण नाशक व टॉनिक किंवा खत एकत्र मिसळून फवारणी करू नये . शिफाशीप्रमाणे जे तण नाशक एकत्र फवारणी करण्याची शिफारस आहे तेच एकत्र करावेततण नाशक फवारणी साठी वापरलेला पंप व्यवस्थित २ वेळा धुवून घ्यावा तसेच फवारणी झाली की धुवून ठेवावा 

कोणतेही औषध शिफाशींनुसार प्रमाण दिलेले असेल त्याच प्रमाणात वापरावे. शक्यतो सकाळी फवारणी करावी जास्त उन्ह असेल तर फवारणी टाळावी. बरेच शेतकरी मित्रांचे सोयाबीन पीक तण नाशक फवारले गेले किंवा प्रमाण अयोग्य वापरले म्हणून पिवळे पडले आहे किंवा वाळत आहे त्यांनी सर्व शेतकरी मित्रांनी वरील प्रमाणे नियोजन केल्यास नक्की फरक पडेल व त्यावर जास्त खर्च करण्याची गरज नाही अतिशय साधे उपाय आहेत तेच करा व जास्त खर्च वाढवू नका सर्व शेतकरी मित्रांना सूचना आहे २५-२७ दिवसांनंतर तण नाशक फवारणी करणे शक्यतो टाळा व पाळी द्या पाळी सुध्दा ३०-३२ दिवसानंतर देऊ नका.

 

Dr. Anant Ingle 

Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri

सदैव शेतकरी हितार्थ 

श्री देव कृपा fpc ltd कृषी सेवा केंद्र आजेगावंtq सेनगांव

English Summary: Scorching or yellowing due to improper use of soybean weed killer
Published on: 10 July 2022, 07:31 IST