नमस्कार शेतकरी बंधुनो, कापूस खत नियोजची पोस्ट सर्व ग्रुप वर टाकल्यानंतर बऱ्याच शेतकरी बंधूनी वॉटर सोल्युबल खते कशी ,कधी ,व किती सोडावीत/द्यावीत याविषयी विचारणा केली.मित्रानो वॉटर सोल्युबल खते देताना काही शेतकरी अगोदर पाणी देतात व नंतर खते सोडतात ते चुकीचे आहे, विद्राव्य खते देताना वाफसा स्थितीतच दिली पाहिजे, म्हणजे जमिनीत 25% पाणी आणि 25% हवा हा रेशिवो मेंटेन झाला पाहजे, तरच पीक दिलेले खत/अन्न द्रव्ये शोषून घेतात.विद्राव्ये खते हि सलाईन सारखे काम करतात, आपल्या जमिनीत पाणी दिल्यानंतर जितक्या दिवसात वापसा स्थिती येते तितके किलो विद्राव्ये खते दिली पाहिजे.
त्याच प्रमाणे आपल्या पाण्याचा पीएच 6 ते 6.5 असला पाहिजे पाण्याचा पीएच 6 पेक्षा कमी आणि 6.5 पेक्षा जास्त असेल तर खते शोषण्याला वेळ लागतो.आपण फवारणीतून जी अन्न द्रव्ये फवारतो ति पाण्याचा पीएच 6 ते 6.5 असला तरच 24 तासाच्या आत शोषली जातात.शेतकरी पाण्याचा पीएच हि काय भानगड आहे काहीच पाहत नाहीत, कमी असो की जास्त असो .मित्रानो पाण्याचा पीएच मेंटेन करणारी द्रव्ये बाजारात उपलब्ध आहेत त्यांचा वापर फवारणी करताना व विद्रव्ये खते देताना करावा, त्यात स्टिक फास्ट,दिकोर्स अपसा 80, आणि अग्री 82 सारखे द्रव्ये वापरली तर त्यांचा पाण्याचा पीएच मेंटेन करण्यासाठी,स्प्रेडर,आणि स्टिकर म्हणूनही चांगला उपयोग होतो तसेच खतांची परिणामकारकता वाढविण्यासाठीआणि उत्पादन वाढीसाठी निश्चितच चांगला उपयोग होतो.
विद्रव्ये खते देण्याचा कालावधी1) 10ते 22 दिवस (2 वेळा विभागून )1 ) 12/ 61 / 00 8 किलो2 ) 19 / 19 / 19 20 किलो3 ) युरीया 15 किलो4) मोनोसिल 1 किलो( हाय कार्ब) 1 लि.5) अमोनियम पॉली फॉस्फेट (लिक्विड) 4 किलो2) 23 ते 60 दिवस् ( 2 वेळा विभागुन )1) युरीया 30 किलो आणि कॅल्शिय मनायट्रेट 5 किलो.2) 12/ 61 / 00 15 किलो.3 ) पांढरा पोटॅश 10 किलो.4) सल्फर ( गंधक ) 3कीलो.5 ) फेरस सल्फेट 1 किलो.6) पोत्यासीयम पॉली फॉस्फेट (लिक्विड) 4 किलो3) 70 व्या दिवशी1) युरीया 25 किलो2 ) पांढरा पोटॅश 5 किलो3) मॅग्नेशिअम सल्फेट 10 किलो4 ) 1 किलो झिक व 1.5 किलो बोरॉन.5) के50 (लिक्विड) 4 किलो4) 105 व्या दिवशी1) पांढरा पोटॅश 5किलो.2 ) अमोनियम सल्फेट 10किलो.3) के50 (लिक्विड)4किलो
वरील प्रमाणे खते कापुस पीकास ड्रीप द्वारे द्यावीत.लाल्या हा रोग नाही ती विकृती आहे कापुस पीकावर लाल्या येवु नये म्हणून 50दिवसांनी 1% मॅग्नेशियम सल्फेट 60 ग्रॅम फवारावे.कापसाची पाने 60 दिवसांनी पिवळसर दिसल्यास 0.5% (अर्धा टक्का ) फेरस सल्फेट किवा मॅगनीज सल्फेट यापैकी एकाची 60 ग्रॅम फवारणी करावी.कापुस पिकास 45 ते90 दिवसाच्या दरम्यान सर्वात जास्त अन्नद्रव्ये लागतात त्यासाठी कापुस पीकास पाण्याचा ताण पडू देवु नये ,तसेच अन्नद्रव्यांचा योव्य पुरवठा करावा ,या कालावधीत योग्य अन्नद्रव्य व पाणी यांचा पुरवठा न झाल्यास उत्पादनावर मोठा विपरीत परीनाम होतो( उत्पादन कमी येते ) यासाठी या कालावधीत विषेश लक्ष दयावे.वरील प्रमाणे विद्राव्ये खताचे नियोजन करावे व आपल्या उत्पादनात भरघोस वाढ करावी.
भगवती सिड्स चोपडा
प्रा.श्री दिलीप शिंदे सर
9822308252
Published on: 06 July 2022, 01:20 IST