Agripedia

कृषी क्षेत्रात कृषी निविष्ठांचा वाढता वापर बघता कृषी निविष्ठाना

Updated on 03 August, 2022 3:56 PM IST

कृषी क्षेत्रात कृषी निविष्ठांचा वाढता वापर बघता कृषी निविष्ठाना सुगीचे दिवस आलेत! एके काळी ठराविक कृषी निविष्ठां उत्पादकांचीच मक्तेदारी ह्या क्षेत्रात होती परंतु कृषी क्षेत्राचा विकास व प्रगती होत असतानाच अनेक कृषी निविष्ठा उत्पादक ह्या व्यवसायाकडे आकर्षित झाले आणि मोठी स्पर्धा ह्या व्यवसायात

सुरू झाली मोठं मोठी प्रलोभने ,कोटी च्या कोटी उड्डाणे ह्या कृषी क्षेत्रात होऊ लागली! अस काय इंगित ह्या क्षेत्रात होत की, गेल्या १० ते १५ वर्षात कृषी निविष्ठा उत्पादकांनी मोठी क्रांती केली!दर्जेदार माल बाजारात दाखल झाल्याबरोबर त्याचे गुण कळताच बनावट उत्पादन बाजारात दाखल होऊ

लागलं आणि ह्याच बनावट उत्पादनांनी कृषी क्षेत्राची पुरती वाट लावलीIt took and these same fake products made the agriculture sector waitबळीराजा आपल्या चिल्या पिलांना हाताशी घेऊन शेतीत राबत राहिला पण ह्याच बनावट कृषी निविष्ठांच्या वापरामुळे त्याच्या पदरी निराशाच पडली सदर बनावट कृषी औषधीमुळे अपेक्षित परिणाम मिळाले नाही आणि मेहनतीने कमावलेलं पीक

हातातून गेलं,! ढोर मेहनत करूनही तेल गेलं!! तूप गेलं!! हाती धुपाटन आलं!अस म्हणण्याची नामुष्की बळीराजावर आली! फक्त जगाचा पोशिंदा म्हणून ज्या बळीराजाला फक्त शाब्दिक सन्मान मिळाला पण अर्थनीतीच्या राजकारणात हाच बळीराजा धाराशाही झाला!

English Summary: Scattered fake agricultural inputs! So the bottom of Baliraja!
Published on: 03 August 2022, 03:56 IST