Agripedia

" माती व पाणी परिक्षण करा व एकेरी हजारो रुपयेची बचत करा"

Updated on 25 April, 2022 7:35 PM IST

 " माती व पाणी परिक्षण करा व एकेरी हजारो रुपयेची बचत करा" 

 माती परीक्षणाचे फायदे 

आपण ज्या शेतीतून जमिनीतून पिके घेतो. त्या जमिनीचा प्रकार कोणता व त्या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत, या सर्व गोष्टींची माहिती करून घ्यायची असेल तर किमान 1 वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे गरजेचे असते.  माती परीक्षण ही शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात घेण्यात येणारे पीक नक्की करता येते व कमी खर्चात उत्पादनवाढ होते. तसेच याने पीकांना द्यावयाच्या खताची मात्रा पण निश्चित करता येते. यामध्ये नत्र पालाश व स्फुरद या पोषक द्रव्यांचा दिलेल्या मातीच्या नमून्यात किती प्रमाण आहे हे बघितल्या जाते तसेच जमिनीतील विद्राव्य क्षार व जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक याचीही तपासणी केली जाते.

पिकांच्या वाढीसाठी अठरा अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. सामू PH ,विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3, सेंद्रिय कर्ब Organic Carbon, नत्र N, स्फुरद P, पालश K , फेरस(आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, सल्फर S, Boron B त्यापैकी एखादे जरी मातीत कमी किंवा जास्त झाले तर त्याचा परिणाम लगेचच झाडावर दिसून येतो जसे पाने पिवळी पडणे, पान गळणे शिरा सोडून इतर पीकांची वाढ पूर्ण होत नाही. 

हे ही वाचा शेती ला समजून घेणे महत्त्वाचे आहे

ती अन्नद्रव्ये मिळता आपोआपच खुंटलेली वाढ परत सुधारते. 

विशेषत: या अन्नघटकांचा वनस्पती वाढीच्या एखाद्या जैविक कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे माती परिक्षण करणे आवश्यक असते. त्याद्वारे शेतक-यांना समजते की मातीत कोणत्या अन्नद्रव्याचे प्रमान कमी आहे किंवा जास्त आहे.

 मातीपरीक्षणामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता व उत्पादकता किती आहे व कोणती अन्नद्रव्य किती प्रमाणात घालावे याची माहिती मिळते. माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते. त्याने गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते. याद्वारे शेतातील पिकाचे योग्य नियोजनाने सुमारे दोनपटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ प्राप्त करता येतो. पीक पेरणीपूर्वी जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाविषयी पूर्ण माहिती होते. त्यानुसार पिकांच्या लागवडीचे नियोजन करता येते.

अन्नद्रव्यांच्या संतुलित मात्रा देऊन अनावश्‍यक खर्च टाळता येतो.जमिनीचा सामू नियंत्रित (6.5 ते 7.5) ठेवून पिकांची अन्नद्रव्यांची शोषणक्षमता वाढवता येते.माती परीक्षणामुळे पिकांच्या वाढीस आवश्‍यक असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल कायम राखता येतो.जमीन पीक वाढीसाठी चांगली आहे किंवा नाही ते कळले.  

मातीच्या नमून्याचे प्रयोगशाळेत सामू PH , विदयुत वाहकता EC, चुनखड़ी CaCO3 , सेंद्रिय कर्ब OC, नत्र N, स्फुरद P, पालश K, फेरस (आयर्न) Fe, झिंक Zn, मॅगनीज् Mn, सल्फर S, बोरान B यासाठी परीक्षण केले जाते.

English Summary: Save soil then after grow diamonds
Published on: 25 April 2022, 07:26 IST