Agripedia

चांडोळ - अतिवृष्टीची मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता परस्पर पीक कर्ज खात्यात वळती करून

Updated on 15 January, 2022 11:01 AM IST

चांडोळ - अतिवृष्टीची मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना न देता परस्पर पीक कर्ज खात्यात वळती करून किंवा त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चांडोळ येथील बँक व्यवस्थापकास आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या खात्याला लावलेला होल्ड काढण्यास भाग पाडल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे .

        चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापका यांच्या विरुध्द अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मनमानी व उद्धट वागणूकी बद्दल तक्रारी केलेल्या आहे.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळालेली मदत आणि पीक विम्याचे आलेले पैसे न देता त्यांचे पैसे शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे परस्पर कर्ज खात्यात जमा केल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरत चालला होता . सदर बँक व्यवस्थापकास अनेकदा फोन करून समज दिली . त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या . जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना सांगून ही सदर बँक व्यवस्थापकाचा कारभार सुधारला नसल्याने आ सौ श्वेताताई महाले पाटील यांनी दि 13 / 1/2022 रोजी सदर बँक व्यवस्थापकास घेराव घालून जाब विचारला .

घेराव घालताच होल्ड काढला

      आ सौ श्वेताताई महाले

     आ सौ श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांसह घेराव घालताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशाला लावलेला होल्ड काढण्यात आला .त्यामुळे आज जे शेतकरी बँकेत गेले त्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली होती.

भविष्यात पुन्हा असे घडल्यास FIR दाखल करा 

आ सौ श्वेताताई महाले पाटील

शेतकऱ्यांना मिळालेले शासकीय अनुदान , अतिवृष्टी , नैसर्गिक किंवा इतर आपत्तीची आर्थिक मदत किंवा पीक विम्याची मिळालेली नुकसान भरपाई कोणत्याही परिस्थितीत होल्ड न करता शेतकऱ्यांकडे कर्ज थकबाकी असली तरी कर्ज खात्यात जमा करू नये असे शासनाचे नियम आहे . सदर मदत कर्जखात्यात जमा करणे किंवा त्या रकमेला होल्ड करणे हे बेकायदेशीर असल्याने भविष्यात कोणत्याही बँक व्यवस्थापनाकडून अशी बेकायदेशीर कृती झाल्यास त्यांच्यावर FIR दाखल करण्यात यावा अशी मागणी आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना केली .

 

यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाउपाध्यक्ष श्री.देवीदास पाटील जाधव, श्री.प्रकाश पडोळ पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनीलभाऊ देशमुख, पंचायत समिती सदस्य श्री.संदीप पाटील उगले, श्री.समाधान आघाव, श्री.समाधान इप्पर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.योगेश राजपूत,किरण सरोदे तालुका कोषाध्यक्ष भाजप,

योगेश राजपूत तालुका अध्यक्ष युवा मोर्चा ,अरुण पाटील ,जयेश पडोळ, अर्जुन लांडे जिल्हा सचिव युवा मोर्चा , जितेंद्र जैन सरचिटणीस, मंगेश जाधव , ,सरपंच सौ सावित्रीबाई बोर्डे ,अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष श्री.सूर्यदेव काकडे गावचे ,उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष श्री.किरण पाटील धंदर,डॉ विजय काटोले वैदेकीय आघाडी ता. अध्यक्ष शरद देहमुख ज्ञानेश्वर गुळवे, अर्जुन उत्तम लांडे युवा मोर्चा जिल्हा सचिव संजूबाप्पू देशमुख रामेश्वर आल्हाट तुळशीराम आल्हाट बबन आल्हाट बाबुराव आल्हाट रमेश आल्हाट समाधान सिनकर रमेश नरवाडे अरुण बोडखे अनिल गुळवे ज्ञानेश्वर पवार शुभम नरवाडे शिवराम नरवाडे तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव शिंदे देविदास काटोले नारायण सावले अंकुश सावळे गणेश बोडखे संतोष भगत दिलीप पाखरे बाबुराव पवार शालिकराम आसवलं हिरालाल सिनकर सुरेश आस्वाल

, श्री.विलास पालकर, श्री.समाधान पालकर, श्री.शैलेश राजपूत, श्री.शामदादा शिंबरे, कल्याणराव कानडजे , शालीकराव कानडजे, विठ्ठल मोरे सरपंच , राजेंद्र कानडजे, शेषराव कानडजे, गजानन देशमुख ,गजानन जाधव , राजू चांदा ,गजानन सपकळ , सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English Summary: Sau swetatai mahalle bank of maharashtra manager speak for farmer
Published on: 15 January 2022, 10:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)