भारतीय बाजारात भाजीपाल्याची मागणी ही वर्षभर बनलेली असते. वांगे देखील अशा भाजीपालापैकी एक आहे. भारतात वांग्याची लागवड ही साधारणतः पावसाळ्यात केली जाते. खरीप हंगामात वांग्याचे उत्पादन हे अधिक मिळते त्यामुळे ह्याची लागवड ही पावसाळ्यात केली जाते. परंतु आजच्या ह्या मॉडर्न शेतीच्या युगात अनेक शोध लागत आहेत.
पिकांच्या अनेक नवीन जाती विकसित केल्या जात आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा खुप फायदा होत आहे आणि शेतकरी लाखों रुपयांची कमाई करत आहेत. वांग्याच्या नवीन जात देशात विकसित झाली आहे त्यामुळे वांग्याची लागवड देखील आता संपूर्ण वर्षभर करता येणार आहे. चला तर मग शेतकरी मित्रांनो वांग्याच्या ह्या जातीची माहिती जाणुन घेऊया.
'ह्या' विद्यापीठाणे केली नवीन वाण विकसित
बिहार कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वांग्याची ही एक नवीन वाण विकसित केली आहे. हि वाण हिवाळ्यात तसेच उन्हाळ्यात देखील लावता येऊ शकते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या जातीचे वांग्याची झाडे 42 अंश तापमान पर्यंत तापमान देखील सहन करू शकतात म्हणजे गरम हवामानात ह्या वांग्याचे उत्पादन घेतले जाऊ शकते. वांग्याच्या या नवीन जातीला "सदाबहार" म्हणजे मराठीत सदाहरीत असे नाव देण्यात आले आहे.
ह्यामुळे बिहारच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि बिहारमध्ये ह्याची लागवड बारामाही केली जाऊ शकते. तसेच ह्याचा फायदा हा देशातील इतर भागातील शेतकऱ्यांना होईल अशी अपेक्षा आहे.
"सदाबहार" ह्या जातीची विशेषता
सदाबहार ह्या जातीची वांगे हे हिरव्या रंगाची असतात. ह्या जातीच्या वांग्याचे सरासरी वजन 85 ते 88 ग्रॅम असते, तर एक वांग्याच्या झाडाला 23 ते 26 वांगे लागतात. या जातीचे एकूण उत्पादन सध्याच्या इतर वाणांपेक्षा खूप जास्त असेल असे सांगितलं जात आहे.
जर आपण ह्या जातीच्या उन्हाळी हंगामातील उत्पादन बाबत विचार केला तर उन्हाळ्यात ह्या जातीपासून हेक्टरी 70 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळेल. हिवाळ्याच्या हंगामाबद्दल बोलायचे झाले तर वांग्याच्या ह्या जातींचे उत्पादन हे उन्हाळ्यापेक्षा दुप्पट असेल म्हणजे 440 ते 480 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळेल. त्यामुळे ह्या जातींची लागवड शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे आणि त्यांचे उत्पन्न हे वाढणार आहे.
Published on: 23 October 2021, 01:03 IST