Agripedia

आज काल विदेशी भाज्यांना भारतात खूप मागणी आहे. या विदेशी भाज्यांपैकी एक म्हणजे रोमन लेट्यूस ही होय. एक नगदी पीक असून भारतीय बाजारपेठेत चांगल्या किमतीत विकली जाते. सॅलड, बर्गर आणि पिझ्झा सारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या भाजीची पाने हिरवीगार असतात व या भाजीला सूर्यफूल कुटुंबातील एक मानले जाते.

Updated on 19 July, 2022 6:41 PM IST

 आज काल विदेशी भाज्यांना भारतात खूप मागणी आहे.  या विदेशी भाज्यांपैकी एक म्हणजे रोमन लेट्यूस ही होय. एक नगदी पीक असून भारतीय बाजारपेठेत चांगल्या किमतीत विकली जाते. सॅलड, बर्गर आणि पिझ्झा सारखे अनेक पदार्थ बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. या भाजीची पाने हिरवीगार असतात व या भाजीला सूर्यफूल कुटुंबातील एक मानले जाते.

या भाजीची लागवड करणे खूप सोपे आहे. या भाजीची लागवड पारंपारिक पद्धतीने आणि हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने केली जाऊ शकते. या लेखात आपण रोमन लेट्युस लागवडीबद्दल माहिती घेऊ.

 रोमन लेट्युस लागवड कशी करावी?

भरपूर सूर्यप्रकाश आणि पाणी असलेल्या थंड हवामान यासाठी सर्वोत्तम मानले जाते.आजकाल बरेच शेतकरी बाजाराच्या मागणीनुसार पॉलिहाऊस पद्धतीने रोमन लेट्यूसची लागवड करत आहेत.

नक्की वाचा:ऑइल मिल व्यवसाय: अशाप्रकारे तेल व्यवसाय सुरु करा आणि कमवा बक्कळ नफा

 रोमन लेट्यूसची थेट पेरणी केली जात नाही अगोदर त्याची रोपवाटिका तयार केली जाते आणि नंतर शेतामध्ये त्यांची पुनर्लागवड केली जाते.वालुकामय चिकन माती त्याच्या लागवडीसाठी योग्य आहे.या पिकाला जास्त तण सहन होत नाही. त्यामुळे पीक खराब व्हायला लागते. त्यामुळे वेळोवेळी तण  काढल्यास या पालेभाजीचे चांगले उत्पादन मिळते.

नक्की वाचा:Cow Dung Processing!शेणापासून लाकूड आणि कागद अशा पद्धतीने बनवा आणि कमवा लाखो रुपये

सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर

 रोमन लेट्यूस एक पालेभाजी असल्यामुळे त्यावर किडींचा प्रादुर्भाव होतो आणि पाने कुजण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळोवेळी सेंद्रिय कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्‍यक ठरते. हे पिक अगदी कमी वेळेत काढण्यासाठी तयार होते. जास्तीत जास्त हे पीक तयार होण्यासाठी चाळीस दिवस लागतात.

 पीक काढणीनंतर विक्रीस उशीर करू नये

 रोमन लेट्यूसची काढणी केल्यानंतर सात दिवसाच्या आत बाजारपेठेत पाठवणे गरजेचे आहे.

नाहीतर ती खराब व्हायला लागते. याची लागवड मोठ्या शहरांजवळ केली तर खूप फायद्याचे ठरू शकते कारण पंचतारांकित हॉटेल्स आणि श्रीमंत कुटुंबांमध्ये या भाजीला खूप जास्त मागणी आहे.

नक्की वाचा:पारंपारिक शेतीला पर्याय! सुगंधित औषधी वनस्पती लागवड जिरेनियम, पामारोजा, दवणा, पचोली

English Summary: roman latus cultivation is so profitable and give more profit to farmer
Published on: 19 July 2022, 06:41 IST