Agripedia

रॉक फॉस्फेट बागेत कशासाठी वापरले जाते. रॉक फॉस्फेट (RP) हा फॉस्फेटचा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. आणि रासायनिक खतामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. (Reddy et al 2002) रॉक फॉस्फेटचा थेट वापर, आम्ली मातीसाठी योग्य असल्याचे आढळले आहे. कारण कमी Ph वर विरघळण्यास मदत करते व वनस्पतींना फॉस्फेट चे उपलब्ध स्वरुप वाढवते.

Updated on 12 December, 2022 11:32 AM IST

रॉक फॉस्फेट बागेत कशासाठी वापरले जाते. रॉक फॉस्फेट (RP) हा फॉस्फेटचा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. आणि रासायनिक खतामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो. (Reddy et al 2002) रॉक फॉस्फेटचा थेट वापर, आम्ली मातीसाठी योग्य असल्याचे आढळले आहे. कारण कमी Ph वर विरघळण्यास मदत करते व वनस्पतींना फॉस्फेट चे उपलब्ध स्वरुप वाढवते.

ट्रिपल सुपर फॉस्फेट (४५ टक्के P) हे प्रामुख्याने मोरोक्को येथील खाणीतून आयात करावे लागते. हे खत प्रदेशातील आम्लधर्मी, लोहयुक्त जमीनीमध्ये चांगल्या प्रकारे विरघळते. मात्र त्याची अधिक किंमत अडचणीची ठरते. तसेच अधिक लोह असलेल्या जमीनीमध्ये कमी सामू असताना त्यातील स्फुरद बांधले जाते. ते पिकांना वापरता येत नाही.

फॉस्फेट रॉक या खतामध्ये ८ ते १२ टक्के स्फुरद असून ते तुलनेने स्वस्त आहे. आम्लधर्मी जमीनीमध्ये वापरण्यास योग्य आहे. रॉक फॉस्फेट हे आपल्या दातांमध्ये किंवा हाडामध्ये आढळणाऱ्या कॅलशियम फॉस्फेटप्रमाणे आहे ते कमी PH असलेल्या मातीमध्ये उपयुक्त करु शकते.

मका आणि वाटाणा या पिकांमध्ये रॉक फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट आणि खतांचा अजिबात न वापरता प्रयोग करण्यात आले.
TSP आणि रॉक फॉस्फेट या दोन्हीही पिेकातील उपलब्धता सारखीच आहे. मात्र TSP खतांच्या शेतामध्ये लोहामुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक स्फुरद बांधले गेल्याने पिकांना उपलब्ध होत नसल्याचे आढळले.

रॉक फॉस्फेटच्या शेतामध्ये २९९ टक्के अधिक स्फुरद हा सुक्ष्मजीवांच्या कार्यामुळे अधिक उपलब्ध् होत असल्याचे आढळले. रॉक फॉस्फेट हे सावकाश उपलब्ध होणारे खत असून TSP वेगाने मिळते.

एकाच वेळी अधिक वापर केल्यास सुक्ष्मजीव आणि पिकांना उचलता येत नाही. पर्यायाने ते मातीमध्ये बध्द होते. मात्र रॉक फॉस्फेट मुळे काही प्रमाणात आम्लता कमी होऊन मॅग्नेशिअम आणि कॅल्शियम सारखे अन्य पोषक घटक उपलब्ध होण्यास मदत होते. त्यांचा पिकांना फायदा होतो.

स्फुरद हा महत्त्वाचा घटक असणाऱ्या खनिज साठयांमधुन रॉक फॉस्फेट काढले जाते. यापासून सेंद्रिय स्फुरदयुक्त खत तयार होते. याच्या वापराने वाढणाऱ्या पिकास आवश्यक अन्नद्रव्यांचा दिर्घकाळापर्यंत नियमित पुरवठा होतो.

स्फुरद पिकवाढीसाठी अतिशय महत्त्वाचा अन्नघटक असुन प्रकाश संश्लेषण ऊर्जा वहनामुळे स्फुरदाची महत्त्वाची भुमिका आहे. पिकांना स्फुरदाची गरज अधिक प्रमाणात असुन चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार स्फुरदयुक्त खते वापरणे गरजेचे आहे. रॉक फॉस्फेट स्फुरदाचा एक उत्कृष्ट स्त्रोत असुन कॅलशियम व इतर सुक्ष्म अन्नद्रव्य सुध्दा रॉक फॉस्फेटमधून मिळतात.

दिपाली प्रेमकुमार उपरे
मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक,
चंद्रपूर- 442401

English Summary: Rock phosphate is a great choice for the garden
Published on: 12 December 2022, 11:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)