Agripedia

राज्यातील शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतानाही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोगजालना जिल्ह्यातील शेतकरी एकनाथ मुळे यांनी केला आहे. आपणास जांभळ्या रंगाची जांभळं माहीत आहेत. मात्र, एकनाथ मुळे यांनी आपल्या शेतात चक्क पांढऱ्या रंगाची जांभळं पिकवले आहेत. एकनाथ यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे.

Updated on 30 April, 2023 1:48 PM IST

जालना : राज्यातील शेतकरी अनेक संकटांना तोंड देत असतानाही शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. असाच एक प्रयोगजालना जिल्ह्यातील शेतकरी एकनाथ मुळे यांनी केला आहे. आपणास जांभळ्या रंगाची जांभळं माहीत आहेत. मात्र, एकनाथ मुळे यांनी आपल्या शेतात चक्क पांढऱ्या रंगाची जांभळं पिकवले आहेत. एकनाथ यांचा हा प्रयोग यशस्वी देखील झाला आहे.

कसं केलं नियोजन?

शेतकरी एकनाथ मुळे यांचे गाव जालना जिल्ह्यातील सिंधी काळेगाव आहे. एकनाथ मुळे यांच्याकडे 25 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. यामध्ये ते वेगवेगळे प्रयोग करत असतात. इंटरनेटवर सर्च करुन त्यांनी पांढऱ्या रंगाच्या जांभळा विषयी माहिती मिळवली.

यांनतर या रोपांची पश्चिम बंगाल राज्यातून खरेदी केली. 300 रुपये प्रति रोप प्रमाणे त्यांनी 200 रोपे खरेदी करून 2019 मध्ये एक एकर क्षेत्रावर 12 बाय 10 फुटावर त्याची लागवड केली. या जांभळाचे संगोपन करण्यासाठी कोणतेही रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जात नाहीत.

शेतमाल तारण कर्ज योजना; शेतकऱ्यांना ठरतेय वरदान

तीन ते चार लाखांचे उत्पन्न

सध्या एकनाथ मुळे यांच्या शेतमधील जांभळाची झाडे तीन वर्षांची झाली असून झाडांना मोठ्या प्रमाणावर जांभळे लागली आहेत. प्रत्येक झाडावर 12 ते 15 किलोच्या आसपास माल आहे. येत्या आठ ते दहा दिवसात या फळ तोडणी सुरू होईल. बाजारात या जांभळांना 200 ते 400 रुपये प्रतिकीलो एव्हढा दर मिळतो. एक एकर क्षेत्रात या वर्षी तीन ते चार लाखांचे उत्पन्न होईल, असं एकनाथ मुळे यांनी सांगितले.

आनंदाची बातमी! अण्णासाहेब महामंडळाची ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू; कर्जमर्यादा १५ लाखांपर्यंत वाढवली

English Summary: Ripe pretty white purple
Published on: 30 April 2023, 01:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)