अतिपर्जन्य मानामध्ये खरिपात भात हे महत्त्वाचे पीक असले तरी त्याच्या लागवड, उगवण क्षमतेवर परिणाम होत आहे. पूर्व विदर्भात भातासाठी आवत्या या पद्धतीचा अवलंब केला जातो. त्यातही पारंपरिक आवत्या व पेरीव आवत्या असे २ प्रकार आहेत.
पारंपरिक आवत्या पद्धतीत पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीची मशागत करून जमीन वाफसा स्थितीत आल्यावर प्रति एकरी ३० ते ३५ किलो बियाणे विखरून फेकले जाते. त्यानंतर वखरणीने बियाणे झाकले जाते. एका महिन्यानंतर उगवलेल्या भात रोपांमध्ये हलकी नांगरण करतात. त्यामुळे फुटवे फुटून तण नियंत्रणासाठी मदत होते.
वैनगंगेच्या खोऱ्यात प्रचलित या पद्धतीला स्थानिक भाषेत बासी म्हणतात. मात्र कमी उगवण क्षमता, रोपातील असमान अंतर, आंतरमशागत, खत, पाणी व्यवस्थापनाचा अभाव यामुळे उत्पादकता कमी राहते.
हळद 15 हजार पार, आवक झाली कमी..
एकूण उत्पादनाच्या २२ ते २८ % खर्च मजुरांसाठी होतो, मजुरांची वेळेवर उपलब्धता न झाल्यास रोवणीला उशीर होऊन पिकावर कीड व रोगाचे प्रमाण वाढते. उत्पादनात २० ते ३०% घट येऊ शकते.
पावसाळ्यात लम्पी पुन्हा वाढला! कोल्हापूरमध्ये अनेक गाईंमध्ये झाला प्रसार...
भाताची पेरणी शक्यतो तिफण किंवा ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राने करावी दोन ओळींतील अंतर २० सें.मी. व दोन रोपातील अंतर हे १० ते १५ सें.मी. ठेवावे. बियाणे २ ते ४ सें.मी. खोल पडेल, असे पाहावे. जातीनुसार जाड़ भातासाठी ७५ किलो, तर बारीक भात ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.
राज्यभर पावसाचा जोर वाढतच राहणार, हवामान खात्याने सांगितलं कारण...
शेतकऱ्यांनो पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन, जाणून घ्या..
कांद्याचे सरसकट अनुदान 15 ऑगस्टपर्यंत मिळणार, राज्य सरकारची माहिती...
Published on: 25 July 2023, 10:24 IST