Agripedia

बरेच वेळा गावी जागा असते आणि व्यक्ती नोकरीसाठी किंवा अन्य कारणाने शहरात जातो.

Updated on 01 February, 2022 7:46 PM IST

बरेच वेळा गावी जागा असते आणि व्यक्ती नोकरीसाठी किंवा अन्य कारणाने शहरात जातो. नंतर १५ ते २० वर्षाने त्याला आपल्या जागेवर इतर लोकांचे अतिक्रमण दिसते अशा प्रसंगी तो ग्रामपंचायत, तहसील, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी दाद मागतो. परंतु बरेच वेळा असे अतिक्रमणे काढली जात नाही. यातून तो व्यक्ती वरील सर्वच कार्यालयाच्या बाबत गैरसमज करतो कि, यासर्वांनी आपल्यावर अन्याय केला आहे. परंतु या ठिकाणी हे समजून घेतले पाहिजे कि, जर एखाद्या जागेवर १५ वर्षा पेक्षा जास्तीचे अतिक्रमण आहे.

आणि संबंधित जागेच्या मालकाने एकदाही त्यासंबंधी तक्रार केली नसेल तर अतिक्रमण करणारी व्यक्तीचा वाहवाटीचा हक्क लागण्यासाठी सदर परिस्थतीती पोषक ठरते. जागेचे वाढलेले भाव त्यातून आपली जागा अतिक्रमणात गेली आहे. यासाठी काही तरी केले पाहिजे अशी भावना बळावते.

१. नवीन शेत किंवा प्लॉट घेते वेळी मोजणी करून घ्यावा. 

२. प्लॉटच्या बाबत विकत घेतल्या नंतर लगेचच त्याला तारेचे किंवा पक्के कपाऊंड करावे म्हणजे लगेचच प्लॉट धारक अतिक्रमण करणार नाहीत. 

३. शक्य असल्यास शेतीच्या बांध व हद्दीच्या खुणा बळकट कराव्यात. 

 ४. जर व्यक्ती शहरात राहत असेल व गावी प्लॉट किंवा जागा असेल तर किमान दोन तीन महिन्यातून जागेचे परीक्षण करावे. त्यासंबंधी उतारे काढत राहावे. 

 ५. शहरात राहत असल्याने गावी लक्ष देणे शक्य होत नसेल तर किमान २ वर्षातून एकदा साधी मोजणी करावी म्हणजे लगतचे किंवा उपद्रवी व्यक्तींना सूचना जाते कि, या व्यक्तीचे लक्ष आहे. 

६. जर यदा कदाचित अतिक्रमण झालेच तर लगेचच त्या विरोधात तक्रार द्यावी अशी तक्रार प्रथम गावातील तक्रार निवारण समिती, पोलीस स्टेशन, कोर्ट अशा क्रमाने दिली तर ती योग्य ठरेल.

English Summary: Responsibility to prevent encroachment on privately owned land
Published on: 01 February 2022, 07:46 IST