आपले कपाशीचे पीक 70/75 दिवसांचे असतांना झाडांना 12 ते 15 फळ फांद्या आलेल्या असतात,अशावेळी शेंड्याकडील 4/5 फांद्या सोडून झाडांवरील इतर फांद्यांखालील जूने मोठे पान तोडून घ्यावीत.जास्तीत जास्त 8 ते 10 पाने एकआड एक अशा पद्धतीने ,एका झाडाची पाने काढून टाकावीत,पाने शेतातच पडू द्यावीत.त्याचे खत होते. या पद्धतीमुळे उत्पादनात निव्वळ 15/20% पर्यंत वाढ होऊ शकते.
संपूर्ण झाड मोकळे होत असल्यामुळे जून्या पानांखाली लपून बसणा-या कीडींपासून व रोगांपासून संरक्षण होते त्याच बरोबर संपूर्ण खोड व फांद्या सूर्यप्रकाशात आल्यामुळे प्रकाश सौंसलेशनाची क्रिया वाढते, झाड मोठ्या प्रमाणात अन्न ग्रहण करते,The tree consumes a large amount of food, त्यामुळे कापूस पिकाला पाती आणि बोंडे लागण्याचे प्रमाणही वाढते, पर्यायाने उत्पन्नात वाढ होते.कपाशीमध्ये संजीवकांचा वापर करणे महत्वाचे आहे.आपली कापूस लागवड अंतर 5X1 फूट किंवा जास्त असल्यास व कापूस 4 / साडेचार फूट उंच झाला असल्यास माय्कोसिसि फवारणी लागवडीपासून 70/75 दिवसांनी 15 लिटर पाण्यात दीड मिली या प्रमाणात करावी.
यानंतर पीक 80/90 दिवसांचे असतांना पुन्हा दीड मिली. माय्कोसिसि ची फवारणी करावी, हे संजीवक यापेक्षा जास्त वापरू नये, माय्कोसिसि ऐवजी चमत्कार अनुक्रमे 30आणि 40 मिली वापरू शकतात.कपाशी मधे गुलाबी बोंड अळीमुले गेल्यावर्षी बीटी कपाशीचे सगळ्यात जास्त नुकसान झाले होते.शेतकरी बंधुनो यावर्षी या अळीचा प्रादुर्भाव मान्सून पूर्व कपाशीमध्ये थोड्या प्रमाणात दिसू लागला आहे, यापुढेही सेंद्रीअळी मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे नुकसान करू शकते. वेळीच या कीडींवर नियंत्रण न मिळवल्यास आलेले पीक हातचे जावू शकते,
त्यासाठी वेळेवर आणि योग्य त्याच कीटकनाशकांची फवारणी करणे महत्वाचे आहे. त्यासाठी योग्य अशा मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घ्यावे.आपल्या शेतात शेतकरी बंधूनी दररोज दुपारी तीन नंतर कपाशी पिकांमध्ये फिरून निरिक्षण करावे. निरिक्षण करतांना जर एखादे फुल पिवळे , जांभळे व आत पाकळ्या वळलेले दिसले तर तात्काळ ते तोडावे. अशा फुलाचे तोंड एकदम घट्ट चिकटलेले असते आपण तिलाच *डोमकळी* म्हणतो. या डोंमकळ्यांचा फुलाच्या पाकळ्या वेगळ्या केल्यास अशा फुलांमध्ये गुलाबी बोंडअळ्या आपणास पहावयास मिळतील, तोडलेली फुले तात्काळ नष्ट करावीत.
फवारणी करतांना ट्रिपल निम या निंबोळी अर्काची प्रतिबंधातमक फवारणी करावी. कामगंध सापले लावले असतील आणि त्यात जर 8/10 पतंग सलग तिन दिवस प्रति सापळा किंवा 10 % प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे किंवा एक जिवंत अळी प्रति 10 हिरवी बोंडे/पाते आढळल्यास आर्थिक नुकसान पातळी समजावी व कीटकनाशकांची फवारणी ताबडतोब करावी.*आमवश्या व सेंद्री अळी* ह्या लेखात मी सांगितलेली दुसरी फवारणी करावी,या फवारणीत, प्रोफेनोफॉस ऐवजी क्लोरो पायरीफॉस, नुवान अशा धुरीजन्य कीटकनाशकांची
फवारणी, इमामेकटींन , कोराजन, सायपरमेथ्रीन, डेल्टा मेरेथ्रीन,अल्फामेथ्रीन या अळी नाशकांची फवारणी सांगितलेल्या प्रमाणातच करावी , अन्यथा कापूस पिकावर मोठया प्रमाणात पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो व चिकटा पडू शकतो. कापूस पिकाचे सर्वात जास्त नुकसान अनुक्रमे सेंद्री अळी, थ्रीप्स आणि पांढरी माशी या किटकामुळे होते.त्यासाठी या किडींवर नियंत्रण मिळवणे महत्वाचे आहे.मित्रानो ,आता यापुढे कापूस पीक उंच व मोठे झाल्यामुळे कीटक नाशक फवारणी करताना सुरक्षा बाळगावी,फवारणी करणाऱ्या व्यक्तीस सौरक्षणात्मक किट पुरवावी, जेणे करून विषबाधा
होणार नाही.ऑगस्ट महिन्यातिल आमव्स्ये नंतर च्या 2 फवारणी सेंद्री अळी च्या दृष्टीने अत्यन्त महत्वाच्या आहेत , या वर्षी कापूस उत्पादक पट्ट्यात पाऊसही वेळोवेळी पडत आहे, आणि परतीचा पावसाला या वर्षी 7 ते 10 दिवस विलंबाने सुरुवात होणार आहे त्यामुळे परतीचा पाऊस महाराष्ट्रातून एक आठवडा उशिरा जाईल , आणि हवामान व पाऊस या संबंधी माहिती देणाऱ्या बहुतेक विस्वासार्य तज्ज्ञांनी या वर्षी महाराष्ट्रात परतीचा पाऊस चांगला पडेल असे भाकीत केले आहे, त्यामुळे 15 ऑक्टोबर पर्यंत अधूनमधून पाऊस हजेरी लावेल आणि तो पाऊस कापूस उत्पादनाच्या दृष्टीने अत्यन्त महत्वाचा असेल.
प्रा.श्री दिलीप शिंदे सर
भगवती सिड्स शेती समूह
9822308252
Published on: 20 August 2022, 04:41 IST