या समस्यांची कारणे, उपाय काय आहेत ते जाणून घेऊयात.
कांद्यावर रोग येण्याचे कारण काय
१) लागवड करतांना पात कापून लागवड केली जाते, सततच्या पावसाळी वातावरणामुळे, ढगाळ वातावरणामुळे कापलेल्या पातित पावसाचे पाणी गेले की पातीचा तो भाग हळूहळू सडत जाउन शेवटी त्यावर बुरशी येते व रोप मरते.
२) शेतकरी लागवड केलेल्या कांद्याला किंवा रोपाला रासायनिक खते देतात, ते खत मुळीजवळ पडल्याने किंवा २ पातींच्या बेचक्यात पडल्यामुळे पात सडते, रोप मरते (त्यासाठी कांदा लागवड करण्यापूर्वीच एकरी ४ बॅग सुपरफॉस्फेट १ बॅग पालाश देऊनच लागवड करावी, कांदा लागवड केल्यावर १५ दिवस कोणतेच रासायनिक खत किंवा युरिया देऊ नये त्याऐवजी ट्रायकोझाईम जी (T2) एकरी २० किलो फोकून द्यावे.)
३)शेतकरी कांदा लागवड केल्यावर किंवा रोपाला युरियाचा अतिरिक्त वापर करतात त्यामुळे रोपांच्या माना लांब होतात, त्यामुळे पातीला पीळ पडतो.
४) कांद्याच्या पातीच्या बेचक्यात मावा किंवा थ्रीप्स सारख्य किडीनी खरडल्यामुळे स्कॉरचिंग होते, पाती वाकड्या झाल्यामुळे वाढ खुंटते.इ. महाराष्ट्रात कांद्याची रोपे टाकल्यानंतर लागवडीनंतर सातत्याने आद्रतायुक्त हवामान, पाऊस, धुके/ धुवारी/धुईमूळे कांद्यावर रोगांचे प्रमाण वाढले त्यामुळे शेकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. मागच्या वर्षी १८ मार्चला झालेल्या वादळी पावसामुळे बियाण्याची प्रत व उत्पन्न कमी आले, त्यामुळे कांदा बियाण्याचे भाव ३००० च्या पुढे गेले २/२, ३/३ वेळा बी पेरावे लागले. शेतकऱ्यांना कांद्याचे दोन पैसे मिळू लागताच, केंद्र सरकारने निर्यातबंदीचे हत्यार उपसले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
कांदा उपाय
१)कांद्याची लागवड करताना रोपांची मुळी किमान २० मिनिटं कार्बेनडीझम सारख्या बुरशी नाशकात बुडवून वावी, रुटबुस्टरची ट्रीटमेंट करावी.
२) रोपाला आणि लागवड केलेल्या पिकाला १ महिना युरिया देऊ नये, अन्न द्रव्याच्या कमतरतेमुळे कांद्याची साईडची मुळी वाढ होते पण मधली मुळी न वाढल्यामुळे रोपाला अन्न द्रव्ये ग्रहण करता येत नाहीत, त्यासाठी हायकार्ब, ह्युमिक ऍसिड, चिलेटेड सूक्ष्म अन्न द्रव्यांची ड्रेंचिंग करावी जी रोपे पिळ पडल्यामुळे खराब झाली आहेत ते उपटून त्याजागी नवीन रोप लाऊन गॅप फिलिंग करावे. हुमनी असल्यास हुमनासुर किंवा भस्मासुर ग्रन्युअल्स एकरी १० किलो खतात मिक्स करून टाकावे.
३) ज्यांची लागवड १ महिन्यांपूर्वी झाली आहे त्यांनी किटक नाशकसोबत मायको सी सी १५ लिटर पंपाला ५/७ मिली वापरून वाढ नियंत्रणात ठेवावी.
४) ज्यांनी ठिबकवर लागवड केली आहे त्यांनी एकरी २५० मिली ह्युमिक ऍसिड आणि ५०० ग्रॅम चिलेटेड मिक्स मायक्रो न्यूट्रिमेंट ५०० मिली सोडावे.
विनोद धोंगडे नैनपुर
ता सिंदेवाहि जिल्हा चंद्रपूर
Published on: 30 October 2021, 05:06 IST