Agripedia

लाल्या हा कोणत्याही जिवाणू अथवा विषाणूजन्य

Updated on 09 August, 2022 8:58 PM IST

लाल्या हा कोणत्याही जिवाणू अथवा विषाणूजन्य रोग नसुन अन्नद्रव्यांचे कमतरतेमुळे दिसुन येणारी शरीरविकृती आहे.लाल्या होण्याची कारणे आपण पाहुया1) उच्च उत्पादकता असलेल्या संकरीत बीटी कापसाची लागवड हलक्या जमीनीवर केल्यास अन्नद्रव्य कमतरता होते, त्यामुळे लाल्या विकृती दिसते.2 ) कापसाची लागवड पानथळ / चिभळ जमीनीत

केल्यास ( आजचे परीस्थीतीप्रमाणे महाराष्ट्रात पावसाचे अती पाण्यामुळे जमीनी पानथळ ( अतीपाणी ) झाल्या आहेत त्यामुळे ) झाडांना अन्न द्रव्ये घेण्यास अडथळा निर्मान होतो यामुळे पाने लाल होऊन झाडाची वाढ खुंटते.The leaves turn red and the growth of the plant is stunted.3 ) सर्वसाधारण परीस्थीतिमळे फुले येणे ते बोंडे तयार होण्याच्या कालावधीत नत्राची कमतरता झाल्यास लाल्याची लक्षणे दिसतात.

4 ) बीटी ' संकरीत कापुस पिकास शिपारशी प्रमाणे खते न दिल्यास हि विकृती दिसते.5) स्फुरद / पालाश हि खते कापुस पिकास बेसलडोस न दिल्यास उशीरा दिल्यास ती खते पिकास योग्य वेळी उपलब्ध होत नाही यामुळे झाड वरील पाती फुल यांचे पोषण करणेसाठी खालील पानातील अन्न द्रव्य वापरते त्यामुळे खालची पाने लाल होतात.

6) मॅग्नेशिअम सल्फेटची कमतरता हि लाल्याचे एक कारण आहे.7)रात्री व दिवसाचे तापमानात मोठा फरक पडल्यास.8) सलग अनेक वर्षएकाच जमीनीवर कापसाचे पीक घेणे.9 ) मोठया प्रमाणावर रस शोषक प्राधुर्रभाव (अटॅक ) झाल्यास या एका पेक्षा अनेक औषधे स्ट्रॉग फवारल्याने / हलक्या प्रतीचे (कॉस्टीक )स्टिकर वापरल्याने.कापुस वरील लाल्या विकृती वर उपाय1) खते शिफारशी प्रमाणे दया.

2 ) पानथळ / चिफळजमीनीत कापसाची लागवड करू नये.3) कापुस पीकास 70 दिवसा नंतर रासायणीक खतांचा डोस देतांना युरीयाऐवजी अमोनीयम सल्फेट वापरावे कींवा युरिया बरोबर 3 किलो गंधक ( सल्फर ) एकरी वापरावे.4 ) एकरी 10 किलो मॅग्नेशिअम सल्फेट जमीनीतुन दयावे किंवा 1% फवारणीतुन फवारावे.5 ) सिंथेटिक पायरेथ्राड चा वापर कमीत कमी करावा.

6) ० : 5 %ची फेरस सल्फेट ( लोह) फवारणी करावी किंवा जमीनीतुन एकरी 5 किलो दयावे.7 ) 2 % डि ए पी ची फवारणी करावयाची असेल तर प्रथम आपले शेतात फवारणीसाठी लागणारे पाणी नुसार उदा .आपल्याला 400 लिटर पाणी ( 2बॅरल / टाकी ) लागत असेल तर 6 किलो डि ए पी घ्यावे व ते 40 लीटर पाण्यात 24 तास भिजु द्यावे व नंतर ( गोमुत्रा ) सारखे पाणी वस्त्र गाळ करून 40 लिटर

पाण्यात मिसळून स्वतंत्र फवारावे.आजचे महाराष्ट्रातील परीस्थीती नुसार अती पाणी आहे यामुळे झाडास अन्न ग्रहण ( उचल )करणेस अडचन येत आहे व त्यात रस शोषक किडी मोठया प्रमाणावर आहेत यामुळे लाल्या विकृती येवु शकते, या उपाययोजना करुन आपले होणारे नुकसान टाळता येवु शकते, हि विकृती झाल्यानंतर उपाय नसतो.

 

श्री शिंदे सर

भगवती सिड्स,चोपडा

9822308252

English Summary: Remedies for red blight (not disease) on cotton crop
Published on: 09 August 2022, 08:58 IST