Agripedia

महाराष्ट्र मध्ये कापूस पिकाचे क्षेत्र 28 लाख हेक्ट र वरून 42 लाख हेक्टोरपर्यंत वाढले आहे. यामध्ये बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू लागवडीखालील असते. उरलेल्या बागायती क्षेत्रामध्ये कापूस पिकाचे फरदड घेण्यात येते. या लेखामध्ये आपण कपाशीचे फरदड आणि बोंड अळी यांचा परस्पर संबंध समजून घेणार आहोत.

Updated on 19 October, 2021 1:02 PM IST

 महाराष्ट्र मध्ये कापूस पिकाचे क्षेत्र 28 लाख हेक्‍टर वरून 42 लाख हेक्‍टरपर्यंत वाढले आहे. यामध्ये बहुतांश क्षेत्र हे कोरडवाहू लागवडीखालील असते. उरलेल्या बागायती क्षेत्रामध्ये कापूस पिकाचे फरदड घेण्यात येते. या लेखामध्ये आपण कपाशीचे फरदड आणि बोंड अळी यांचा परस्पर संबंध समजून घेणार आहोत.

कपाशीचे फरदड आणि बोंडअळी यांचा परस्पर संबंध

  • कपाशीच्या दीर्घ काळ वाढणाऱ्या संकरित वाणांची लागवड होते या संकरित वाहनांवर गुलाबी बोंड आळी च्या जास्त पिढ्यापूर्ण होतात.परिणामी या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो.
  • वेगवेगळ्या कपाशीच्या संकरित वाणांची लागवड झाल्याने त्यांचा फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा असतो. गुलाबी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत अन्न पुरवठा होत असल्याने व जीवन क्रम एकमेकात मिसळल्याने त्यांच्या संख्येत वाढ होते.
  • प्रदीर्घ काळापर्यंत कच्चा कपाशीची जिनिंग मध्ये आणि व्यापारी संकुलात साठवण केली जाते. त्यामुळे गुलाबी बोंड आळी आगामी हंगामात  येण्या साठी पोषक वातावरण तयार होते.
  • हंगामपूर्व लागवड केलेल्या म्हणजेच एप्रिल व मेमध्ये लागवड केलेल्या कपाशीमध्ये फुले येण्याचा काळ हा जून जुलै महिन्यात असतो. त्यामुळे लवकर बोंड आळीचा प्रादुर्भाव होतो. तसेच मागील हंगामातील कपाशीवरील बोंड आळी चा जीवनक्रम हा एकाच वेळी सोबत येतो. पर्यायाने गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो.त्यांच्यामध्ये प्रतिकारक्षमता वाढत आहे.
  • गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यत आहे हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ते नोव्हेंबर मध्ये होतो. यावेळी डिसेंबर महिन्यात कपाशीच्या पराठ्या किंवा वाळलेल्या खुरकूट्या मध्ये कोष अवस्थेत जाते. नोव्हेंबर नंतरही शेतात पाणी देऊन पिक ठेवल्याने शेंदरी बोंड अळीचा वाढीला आणखी चालना मिळते.
  • बोंड आळी मध्ये बीटी प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होऊ नये यासाठी बीटी जनुक विरहित कपाशीच्या रेफ्युजी ओळी लावण्याची शिफारस केली जाते. मात्र अनेक शेतकरी रेफ्युजी बियाण्याची लागवड करत नाहीत हे चुकीचे आहे.
  • कपाशी पिकावर येणाऱ्या प्रमुख बोंड आळी यांपैकी हिरवी बोंड आळी,ठीपक्यांची बोंड आळी, शेंदरी बोंड आळी आणि तंबाखूची पाने खाणारी आळी यापैकी फक्त शेंदरी बोंड आळी चा जीवनक्रम कापूस पिकावर पूर्ण होतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये मागच्या तीन ते चार वर्षात क्राय प्रथिना विरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण झालेली दिसून येत आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या बहुतांश संकरित वानांवर शेंदरी बोंड आळीचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात दिसून येत आहे.
  • सुरुवातीच्या काळात रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफास,फीप्रोनील  किंवा ऍसिफेट यासारख्या कीटकनाशकांचा वापर अधिक प्रमाणात झाला. या किटकनाशकाचा तीन ते चार वेळा वापर केल्यास झाडांची कायिक वाढ झाल्याने फांद्याचे अधिक वाढ होते.
  • फुले व बोंडे यांचे प्रमाण कमी होते. या रासायनिक कीटकनाशकांचा एकत्रित वापर केल्याने फुले लपेटून आळीचा प्रादुर्भाव हिरव्या व फुटलेल्या बोंडामध्ये आढळून येतो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कृत्रिम व वनस्पतीजन्य किटकनाशकांची ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी केली. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर ही मर्यादित केला अशा ठिकाणी बोंडे एकाच वेळीफुटून आली. परिणामी शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी झाला.
  • कापूस पिकावर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे त्यामुळे फरदड  घेणे टाळावे.
English Summary: relation beetween cotton crop and orange worm
Published on: 19 October 2021, 01:02 IST