Agripedia

संगणक परीचालकांची तालुका समन्वयकास पदावरुण कमी करण्याची जि. प. उपमुख्यअधिकारी व गटविकास अधिकारी चिखली यांच्याकडे मागणी.

Updated on 02 December, 2021 7:55 PM IST

चिखली पंचायत समिती सभागृहा बाहेर ठिय्या देत संगणक परीचालक संघटनेची मागणी.

चिखली - पंचायत समितीचे तालुका समन्वयक श्री. अनिल निंबोरे यांच्याकडुन तालुक्यातील संगणक परीचालक यांना पैशाची मागणी होत असल्याने व उध्दट पणाची वागणुक देत मानसिक छळ होत असल्यामुळे तालुक्यातील संगणक परीचालक यांचा संयमाचा बांध तुटला असुन त्या तालुका समन्वयक यांना कामावरुण कमी करण्यात यावे, संगणक परीचालक यांच्याकडुन घेतलेली रक्कम परत करण्यात यावी अशी मागणी संगणक परीचालक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर दांदडे, उपाध्यक्ष सुनिल जवंजाळ, सचिव शेषराव म्हस्के जिं. सचिव सचिन झालटे याच्यासह तालुक्यातील सर्व संगणक परीचालकांकडुन दि 01/12/2021 रोजी चिखली पंचायत समिती सभागृहाबाहेर ठिय्या देत निवेदनाव्दारे जि. प. उपमुख्यअधिकारी बुलढाणा,गट विकास अधिकारी चिखली यांच्याकडे करण्यात आली आहे.

तालुक्यातील संगणक परीचालक सन 2011 पासुन चिखली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या विविध ग्रामपंचायत मध्ये संगणक परीचालक या पदावर अत्यंत चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.या कामाची दखल म्हणुन अनेकवेळा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागचा पुरस्कारही संगणक परीचालक यांनी मिळवला आहे.चांगल्या प्रकारचे काम तालुक्यात होतांना दिसत असतांना देखील पंचायत समिती तालुका समन्वयक श्री. अनिल निंबोरे यांच्याकडुन कामामध्ये त्रृटी असल्याचे दाखवुन वारंवार त्रास दिला जात आहे.यापुर्वी संगणक परीचालक यांच्याकडुन अनेकवेळा त्यांना समजवण्याचा प्रयत्न देखील केला

परंतु त्यांचा स्वभाव जैसे थे असुन महिला,पुरुष यांना उध्दटपणाची वागणुक व शिविगाळ पं स. सभागृहा मध्ये झाली आहे. त्यांनी अनेक वेळा संगणक परिचालक यांच्या कडून पैशाची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास पगारास रोख लावण्याचे काम ते करतात यांच्या आर्थीक व माणसीक छळाला कंटाळुन अनेकांनी पद सोडले आहे.याचा सुद्धा त्यांनी गैरफायदा घेतला असुन त्याच जागेवर नविन व्यक्तीस नियमबाह्य भरती प्रक्रीया घेत पदावर घेतले आहे.त्या व्यक्तीकडून सुद्धा पैसे त्यांनी घेतले आहेत.त्यांनी अनेकांकडुन झालेल्या पगारातुन प्रत्येकी १०००रु २०००रु ३०००रु घेतल्याचे त्यांच्या अकाउंट स्टेटमेट व आमच्या फोन पे अकाउंट व्दारे स्पष्ट होईल सर्व संगणक परीचालक काम चांगले असतांना त्यांना सहकार्य करण्याचा उद्देश न ठेवता गटविकास अधिकारी यांना चुकीची व दिशाभुल करणारी माहिती देऊन अनेक संगणक परीचालक यांना फोन करुण त्या व्यक्तीकडुन सुद्धा आर्थीक मागणी केल्याचे सुद्धा प्रकार उघड झाले आहेत.

आम्ही त्यांच्या या त्रास दायक वृत्तीला कंटाळलो असुन आमच्यातील काहिंना ते आत्महत्येस प्रवृत्त करीत आहेत.असे देखील तक्रारीत नमुद केले असुन चिखली पंचायत समिती तालुका समन्वयक श्री अनिल निंबोरे यांना या पदावरुण कमी करण्यात यावे व त्या जागेवरती नविन व्यक्तीस नियुक्ती देण्यात यावी,अशी मागणी चिखली तालुक्यातील सर्व संगणक परीचालक संघटनेच्या वतीने चिखली पंचायत समिती सभागृहा बाहेर ठिय्या देत करण्यात आली आहे.तर सदर मागण्यांची पुर्तता ४ दिवसात न झाल्यास चिखली तालुक्यातील सर्व संगणक परीचालक व जिल्हा संगणक परीचालक संघटनेच्या वतीने जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संगणक परिचालक संघटनाचे जिल्हा अध्यक्ष निलेशजी खुपसे यांनी या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. यावेळी भागवत पवार ,शरद घोलप, रोशन चव्हाण, रामेश्वर अंभोरे ,अनिता परिहार ,शारदा पवार,शोभा सोनवणे,अश्विनी जाधव,कविता तुपकर ,प्रवीण साळवे,सविता पवार ,कमलेश धांडे ,अम्रापली इंगळे ,गणेश गायकवाड ,भारत जाधव ,सागर लोखंडे,गजानन मोरे,योगेश सुरडकर ,

विवेक खेन्ते,अनिल मुंडे,शरद पवार,संतोष धनावत,भागवत कऱ्हाडे,भारत जाधव,अक्षय घुबे,अमोल जगताप,दत्तात्रय जावळे,नितीन धंधर, शेख नेइम शेख इब्राहीम,ज्ञानेश्वर वाकळे,शुभम साळवे,शुभम मिसाळ,दत्तात्रय भुतेकर,शरद इंगळे,पवनकुमार जाधव,राजेंद्र इंगळे,रविंद्र बळप,राजू खिलारे,समाधान गिते,मंगेश वानखेडे,पपेश पडघान,ज्ञानेश्वर बकाल,गजानन पिठले,श्रीकृष्ण तिडके,समाधान पाटणे,गजानन पवार,दिलीप वाघ,बद्री अंभोरे.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Reduce the post of Chikhali taluka coordinator who incited suicide by financial robbery and harassment.
Published on: 02 December 2021, 07:55 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)