Agripedia

कपाशी हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक आहे. कपाशीची लागवड महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस होत असल्याने कपाशी पिकावर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तसेच प्रमुख समस्या म्हणजे कपाशीवर बोंड आणि पाते परिपक्व झाल्यानंतर साधारणता कपाशी लाल व्हायला सुरुवात होते. कपाशीची पाने लाल पडल्यामुळे ते सुकतात आणि गळून जातात. साधारणता या दिवसांमध्ये ही समस्या प्रकर्षाने उद्भवते. या लेखात आपण त्याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 27 September, 2021 2:55 PM IST

कपाशीची पाने लाल पडणे व उपाय योजना

 कपाशीचे पाने लाल पडण्यामागे दोन प्रामुख्याने कारणे असतात. पहिलं म्हणजे कपाशीच्या रोपाची शारीरिक अवस्था आणि पर्यावरणाची स्थिती  यामध्ये अडथळा येणे आणि पिकामध्ये मुख्य आणि सूक्ष्म पोषण द्रव्यांची कमतरता हे होय आणि दुसरे म्हणजे जॅसीडच्या विरुद्ध समाधानकारक कारवाईनाही झाली तर कपाशीची पाने लाल आणि ठिसूळ पडतात. तसेच रात्रीचे तापमान 21 डिग्री सेल्सिअसच्या खाली घसरले तर पानेलाल पडण्याची प्रक्रिया वेगात चालू होते.पानेलाल पडण्याच्या क्रियांमध्ये सुरुवातीला पानांचे कडा पिवळ्या  रंगाच्या होतात आणि नंतर शिरांमधील जागा लाल होते आणि शेवटी पानेगळून पडतात. या मध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे की एकदा पानलाल पडले तर ते पुन्हा हिरवे होत नाही. त्यासाठी आवश्यक उपाययोजना आज एक उपाय आहे.

या समस्येवर उपाय योजना

  • जेसीडसारखे शोषक कीटकांच्या नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांचा वेळोवेळी वापर करावा.
  • नत्राचे जास्तीचे डोस देऊन रोपांना पुरेशा नायट्रोजनाचा पुरवठा करावा.
  • दर दहा दिवसांनी एक ते दीड टक्के युरियाची दोन ते तीन वेळा फवारणी करावी.
  • यामध्ये युरिया ऐवजी डीएपी दोन टक्के देखील फवारू शकतात.
  • पिकांमधील मॅग्नेशिअमची कमतरता दूर करण्यासाठी  आठवड्यातून एकदा एक ते दोन टक्के मॅग्नेशिअम सल्फेट फवारावे.
  • पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. जमिनीतील ओलावा कमी झाला आहे असे वाटल्यास लगेच पाणी द्यावे.
  • महत्त्वाचे म्हणजे पाणी देताना ते एका ठिकाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. कारण असे पाणी साचल्यामुळे मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक पिकासाठी असमर्थ बनतात.
  • आवश्यक वाटल्यास अस्कॉर्बिक अॅसिड 500 पीपीएम + पीएमए दहा पीपीएम फवारावे.
English Summary: red leaves disease on cotton crop management
Published on: 27 September 2021, 02:55 IST