हरबरा खालची पाने काही ठिकाणी लाल पिवळे होत आहेत, ती मर रोगाची सुरवात असू शकते,
लाल पिवळी पाने झालेली झाडे व हिरवी काही झाडे उपटून मूळ तपासल्यास लाल पिवळी पाने झालेल्या झाडांना पांढरी मुळे कमी असल्यास किंवा मूळ तोडल्यास त्यात लाल रेष दिसल्यास नक्की मर रोगाची सुरवात आहे.
मर रोगाला काही काळासाठी बुरशीनाशकांची फवारणी केल्यास थांबवता येते पण ते कायमचा उपाय नाही, Thiephenoiet methiel ( पिक्साल किंवा रोको किंवा अलिएट 20 ते 25 ग्राम प्रति पंप वापरून एका एकरात कमीत कमी 150 लिटर पाणी वापरावे, फवारणी करतांना मोठे थेंब किंवा झाड चिंब होईल असे फवारावे कारण हा रोग मुळांचा आहे औषध मूळ पर्यंत पोहचले तरच फायदा होतो.
ज्यांना सिंचन करण्याची व्यवस्था आहे ते पाणी देण्यापूर्वी चांगल्या गुणवत्तेच ट्रायकोडर्मा एकरी 2 किलो ओलसर माती /शेणखत मध्ये मिसळून एक एकरात फेकून पाणी द्यावे.
पण पानांवर बारीक ठिपके असल्यास तो पानावरील तांबेरा असू शकतो याची श्यक्यता कमी आहे तरी तसे आढळल्यास tubiconazole + sulphur ( हरू) बुरशीनाशकाची फवारणी करू शकता.
यावर्षीच्या एकंदरीत वातावरणामुळे मर रोग सगळीकडे कमी ज्यास्त प्रमाणात आढळत आहे, 10 % पेक्षा कमी असल्यास फार चिंता करू नये.
लाल पिवळी पाने झालेली झाडे व हिरवी काही झाडे उपटून मूळ तपासल्यास लाल पिवळी पाने झालेल्या झाडांना पांढरी मुळे कमी असल्यास किंवा मूळ तोडल्यास त्यात लाल रेष दिसल्यास नक्की मर रोगाची सुरवात आहे.
सिंचनाची व्यवस्था असली तरी हरबर्याला ज्यास्त किंवा साचेल असे पाणी देऊ नये त्यामुळे मर रोग वाढतो
Published on: 22 January 2022, 10:59 IST