Agripedia

शेतीव्यवसायात काळानुरूप बदल केले जात आहेत, आता शेतकरी बांधव फक्त पारंपरिक पिकांचीच लागवड करत नाहीत, तर मागणी असलेल्या भाजीपाला पिकांची व नकदी पिकांची देखील लागवड करतात. आणि अशाच कडीत आता शेतकरी बांधव वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड करताना दिसत आहेत, सध्या ब्रॉकोली, लाल भेंडी, तसेच लाल पत्ता कोबी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे

Updated on 12 December, 2021 10:27 AM IST

शेतीव्यवसायात काळानुरूप बदल केले जात आहेत, आता शेतकरी बांधव फक्त पारंपरिक पिकांचीच लागवड करत नाहीत, तर मागणी असलेल्या भाजीपाला पिकांची व नकदी पिकांची देखील लागवड करतात. आणि अशाच कडीत आता शेतकरी बांधव वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड करताना दिसत आहेत, सध्या ब्रॉकोली, लाल भेंडी, तसेच लाल पत्ता कोबी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे

पण हे पीक शेतकरी बांधवांसाठी अजूनही अनोळखी आहे, म्हणून याची लागवड कशी करतात, कोणत्या हंगामात करतात, कोणते खते वापरावे याविषयीं संपूर्ण माहिती आज कृषि जागरण आपणास सांगणार आहे चला तर मग जाणुन घेऊया लाल कोबी लागवडीविषयी.

 लाल कोबी हि मानवी शरीरासाठी उत्तम असल्यामुळे अनेक लोक याचे सेवन करतात, डॉक्टर देखील याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. लाल कोबीमध्ये फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि विविध प्रकारचे पोषक घटक असतात.  तसेच थायमिन, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, यासारखे खनिज यात आढळतात जे की शरीरासाठी आवश्यक आहेत. लाल कोबीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फायबर, व्हिटॅमिन बी हे व्हिटॅमिन देखील मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे याचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी लाभप्रद असल्याचे सांगितले जाते. म्हणुन लाल कोबीची मागणी हि दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे सध्या लाल कोबी पिकांची लागवड करून अनेक शेतकरी बांधव चांगली मोठी कमाई करत आहेत.

लाल कोबी लागवड करताना ह्या गोष्टींची काळजी घ्या

लाल कोबी लागवडीसाठी हलकी चिकणमाती असलेली जमीन सर्वात योग्य असल्याचे कृषि वैज्ञानिक नमूद करतात.  शेतकरी मित्रांनो जर आपल्याला लाल कोबी लागवड करायची असेल तर, जमिनीचे अर्थात मातीचे pH मूल्य अर्थात सामू हा 6 ते 7 च्या दरम्यान असावा असे सांगितलं जाते. तसेच लाल कोबीला जास्त तापमान सहन होत नाही म्हणुन याच्या लागवडीसाठी आवश्यक तापमान 20 ते 30 अंशांच्या दरम्यान चांगले असल्याचे मानले जाते.

 केव्हा करणार लागवड

लाल कोबी पिकातून चांगले उत्पादन प्राप्त करण्यासाठी याच्या चांगल्या सुधारित वाणांची लागवड करण्याचा सल्ला अनेक कृषि क्षेत्रातील जाणकार व्यक्ती देतात. या पिकाला जास्त तापमान मानवत नाही म्हणुन याची लागवड हि सप्टेंबर ते नोव्हेंबर ह्या काळात करावे असे सांगितले जाते.

असे असले तरी यावर्षी पाऊस हा चांगलाच लांबला होता त्यामुळे आता देखील लाल कोबी लागवड करता येऊ शकते, मात्र लागवड करण्याआधी कृषि विशेषज्ञचा सल्ला महत्वाचा ठरेलं.

 खत व्यवस्थापन

लाल कोबी लागवड केल्या नंतर हलके पाणी द्यावे जेणेकरून जमिनीत ओलावा राहील. लाल कोबीच्या चांगल्या उत्पादणासाठी खताचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. म्हणुन लाल कोबीचे शेत तयार करताना चांगल्या क्वालिटीचे जुने कुजलेले शेणखत 10 ते 12 टन प्रति हेक्टर हे प्रमाण ठेऊन शेतात टाकावे. तसेच जमिनीतील आवश्यकतेनुसार नत्र, स्फुरद आणि पालाश लावावे यासाठी कृषि वैज्ञानिक यांचा सल्ला घ्यावा.

English Summary: red cauliflower get more profit to farmer and know management
Published on: 12 December 2021, 10:27 IST