आंबा हे फळपीक भारतात सर्व प्रकारच्या हवामानात व जमिनीत चांगले येते. परंतु आंब्याचा बहार अनियमितपणे येणे या समस्येमुळे शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असते. झाडाचे वय वाढत गेल्यानंतर बहार येण्यामध्ये अनियमितता आढळून येते. जुन्या आंब्याच्या झाडा मध्ये हा प्रकार प्रकर्षाने जाणवतो. या लेखामध्ये आपण आंब्याचा बहार अनियमितपणे येण्यामागची कारणे व उपाय याचा विचार करणार आहोत.
आंब्याचा अनियमित बहार येण्यामागची प्रमुख कारणे
- हवामान- हवामानात प्रचंड प्रमाणात असलेली तफावत व प्रतिकूल हवामान यामुळे आंब्याच्या झाडाला फुले व फळे येत नाहीतकिंवा आलेल्या फुलांचा फळांचा नाश होतो. तसेच धुकेवातावरणातील कमी आर्द्रता व सोसाट्याचा वारा असेल तरपाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. ढगाळ हवामान व जास्तीचा पाऊस असेल तर फुलोरा च्या वेळेस नुकसान होते.
- मशागत- आंब्याच्या झाडाची जर व्यवस्थित मशागत केली नाही किंवा आवश्यक खत किंवा पाणी दिले नाही तर ही समस्या जाणवते.
- झाडावर असलेली फळांची संख्या- आंब्याच्या झाडावर जर मध्यम पिक असेल तर फळझाडांना नियमितपणे बहर येण्यास मदत होते.
- लागवडीसाठी निवडलेल्या जाती- आंब्याच्या काही जाती ह्या दरवर्षी फळे न धरता एक वर्षाआड फळे धरतात. जसे की, हापुस, लंगडा, केशर, नागिन इत्यादी जाती
या समस्येवर उपाययोजना
- नियमित पणे बहार येणाऱ्या जातींची लागवड- आंबा लागवड करताना नियमितपणे ज्या जातींमध्ये बहार येईल या जातींची निवड करावी. उदा. बारामासी, नीलम, तोतापुरी इत्यादी.
- झाडावरील मोहोर काढणे- झाडाच्या फूटी वरून फुलांचा मोहर काढतात त्या फूटींना पुढच्या वर्षी फळे येतात. प्रयोगाअंती असे दिसले आहे की ऑन वर्षात 50 टक्के मोहोर काढून सुद्धा त्या वर्षी काहीहीनुकसान न होता पुढच्या वर्षीही चांगले पीक मिळते. जातीपरत्वे याचे कमी-अधिक प्रमाणात परिणाम मिळतात.
- झाडांची छाटणी- आंब्याच्या झाडावर नवीन फूट वर्षभर येत असते. विशेषता हाती ऑक्टोबर ते मार्च महिन्यात जास्त येते व याच फुटीवर पुढच्या वर्षी फळधारणा होत असते. त्याकरता जुने आंब्याच्या झाडांची ऑगस्टमध्ये छाटणी करावी त्यामुळे झाडांची जोमदार वाढ सुरू होते व पुढील वर्षी जानेवारी महिन्यात मोहोर येतो व फळे लागतात.
- संजीवकांचा वापर- आंब्याचा बहार नियमित यावा यासाठी इथ्रेल,अलार, सायकोसील, पोटॅशियम नायट्रेट इत्यादी संजीवके वापरणे फायद्याचे असते. त्याची मदत आंब्याचा बहार नियमितपणे येण्यास होते.
- इथेफॉनदोनशे पीपीएम+0.1 टक्का द्रावणाची आंब्याच्या पानावर फवारणी केली असता आंब्याची झाडे फुलोरा निपजणे यास पचण्यास उपयुक्त होतात.
- संकरित जातींची निवड – डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेली रत्ना, भारतीय कृषी संशोधन संस्था, दिल्ली यांनी विकसित केलेली आम्रपाली व मल्लिका या जाती वर्षभर फळे देतात. या जाती पडताळून पाहणे आवश्यक आहे.
- खते – आंब्याच्या झाडांना दरवर्षी नियमितपणेखतेद्यावे. खतामुळे अन्नद्रव्यांचा साठा योग्य होऊन फळधारनेस मदत होते.
Published on: 12 September 2021, 10:13 IST