मित्रहो शिक्षणाशीवाय शेती करणे शक्य नाही. कारण शेती क्षेत्राचे नाव मागे राहण्यनाचे एकमेव कारण म्हणजे न शिकलेले शेती करतात आणि शिकलेले नोकरी, परंतु शिपाईच्या नोकरीपासून ते कंपन्यामध्ये हार्डवर्कींगच्या कामापर्यंत 50टक्के नोकर्या अशा आहेत जिथे शिक्षणाची आवश्यकता नाही. म्हणून न शिकलेले बाहेर आणि शिकलेले शेतीत पाहिजे. परंतु जो शिकला तो नोकरी आणि न शिकलेला शेती आणि इथूनच शेती या क्षेत्राला ग्रहन लागले. मित्रांनो शिक्षणाशीवाय शेती शक्य नाही . शेती सारखी दूसरी कोणतीही नोकरी नाही हे लक्षात घ्या. कारण कोणत्याही नोकरीला बाॅस असतो, येथे आपनच आपले बाॅस आहोत.
वर्षातले 365 दिवस आपलेच असतात आणि नोकरीमध्ये फक्त रविवार आपले असतात.कोणत्याही नोकरीमध्ये आपल्या जागेवर मजूर लाऊन काम केले जाऊ शकत नाही. परंतु शेतीमध्ये आपण मजूर लाऊन काम करून घेउ शकतो. नोकरीमध्ये आपण मजूर असतो कोणताही निर्णय घेणे आपल्या हातात नसते हे लक्षात घ्या. मनुष्याला जगण्यासाठी जे अन्न लागतं ते फक्त मातीतच पिकतं,आणि त्याला पिकवणारे आहोत आपण.म्हणून शेतकऱ्याचे शिक्षण अवश्यक आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही देशात तथा महाराष्ट्रात सुमारे ६० ते ६५ टक्के लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत.
ग्रामीण भागातील लोकांची उपजिविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील सुमारे ६७ लाख शेतकरी कुटुंबांकडे फक्त एक हेक्टर एवढे जमिनीचे क्षेत्र आहे. चाळीस लाख शेतकरी कुटुंबांकडे एक ते दोन हेक्टर इतकेच जमिनीचे क्षेत्र आहे. दोन ते चार हेक्टर एवढे क्षेत्र असणारे सुमारे २२ लाख शेतकरी आहेत. सात लाख शेतकऱ्यांकडे ४ ते १० हेक्टर क्षेत्र असून, १० हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणारे अत्यंत अल्प शेतकरी आहेत. यापैकी बरेचसे क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे खात्रीशीर उत्पादन मिळण्याची श्वाश्वती नसते. मर्यादित जमिनीचे क्षेत्र उपलब्ध असल्याने
Published on: 03 April 2022, 04:58 IST