पावसामुळे जर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असेल तर विमा कंपनीला 72 तासांच्या आत तक्रार दाखल करावयाच्या पद्धती.१. क्रॉप इन्शुरन्स ॲप वर ऑनलाईन तक्रार करने..हे खुप सोपं आहे व प्ले स्टोअर वर अॅप
उपलब्ध आहे..ॲप ने ऑनलाइन तक्रार केल्यानंतर त्याचा डॉकेट आयडी नंबर येत असतो ,After filing the complaint online through the app, the docket ID number is available. तो लिहून ठेवावा.२ विमा कंपनीच्या टोल फ्री नंबर वर फोनवर तक्रार करावी. तेव्हा तक्रार क्रमांक येतो.(टोल फ्री नंबर हा विमा पावतीवर असतो) ३.विमा कंपनीच्या ईमेलवर तक्रार करणे . याची
सुध्दा रिप्लाय मिळतो.हा सर्वात सोपा मार्ग.यानंतर कृषी विभागात किंवा विमा कंपनीला कुठेही अर्ज द्यायची गरज नाही. ऑनलाइन तक्रार दाखल केल्यानंतर कागदपत्र घेऊन कार्यालयात यायची गरज नाही.. हे शेतकऱ्यांना समजावून सांगावे..
(ऑफलाइन अर्ज कोनी द्यावा- ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन क्लेम करता येत नाही, किंवा टोल फ्री नंबर वर फोन नाही लागला, किंवा ईमेलवर जर तक्रार नाही करता आली तरच तरच ऑफलाईन अर्ज पाऊस पडल्याच्या 72 तासात विमा कंपनीच्या कार्यालयात द्यावा. नसता देऊ नये.)
Published on: 21 October 2022, 07:39 IST