Agripedia

कष्ट करून शरीराला काहीच होत नाही, पण मानसिक त्रास सुरू झाला,

Updated on 04 November, 2022 7:39 PM IST

कष्ट करून शरीराला काहीच होत नाही, पण मानसिक त्रास सुरू झाला, तर कितीही कसलेले शरीर असले तरी ते खंगल्याशिवाय राहत नाही.शरीराने भक्कम असलेली माणसे मानसिक ताण सहन न झाल्यामुळे व्यसनी होत आहेत.जे पिकवले जातेय ते घर प्रपंचाला पुरत नाही, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्ने, यासाठी कर्ज काढायची वेळ येते. ते वेळेवर फिटले नाही तर आहे ते शेत विकायची वेळ येते आणि हा अपमान सहन होत नसेल तर शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो.

कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी गेल्या सत्तर वर्षात शेतकऱ्यांच्या या अवस्थेत बदल झालेला नाही, हे No matter which party government comes, there has been no change in this condition of farmers in the last seventy years. कदाचित पुढेही होईल

तुमच्या जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झालाय? त्यासाठी करा हे उपाय

 अशी आशा नाही. याला उपाय म्हणजे.शेतकऱ्यांच्या मुलांनी आपली दिशा बदलली पाहिजे.पूर्णपणे शेतीवर अवलंबून राहणे येथून पुढे मूर्खपणा ठरणार आहे.आपली कष्टकऱ्यांची जात आहे, त्यामुळे कष्ट करायला लाजू नका, शेती पूरक व्यवसाय किंवा छोटा-मोठा कोणताही व्यवसाय सुरु करा. आपला स्वतःचा खर्च स्वतः भागवायला शिका, त्याचा भार

आई-वडिलांच्या डोक्यावरून कमी करा. गरजा कमी करा, दिखावा कमी करा, जग काय म्हणेल? या प्रश्नाला कायमची तिलांजली द्या. कोणताच व्यवसाय करायला लाजू नका किंवा कमीपणा मानू नका. आज तीनशे एकर जमीन असणारी माणसे भिकारी झालेली आहेत आणि शेतकऱ्याकडूनच भाजीपाला विकत घेऊन रस्त्यावर विकणारी माणसे चार चाकी गाडीत फिरताहेत.शेतकऱ्यांच्या मुलांनी पिकविलेला माल स्वतः विकायला शिका, मधले व्यापारी, दलाल यांची साखळी स्वतः तोडा. 

जोपर्यंत शेतकऱ्यांची मुले व्यापार हातात घेत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांचे दिवस कोणत्याच कायद्याने बदलणार नाहीत.प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने शेती व्यतिरिक्त किमान शंभर रुपये तरी बाहेर कमवून घरात आणले पाहिजेत, तरच आपले घर आणि मानसन्मान टिकणार आहे.शहरातील लोक आज शेतकऱ्यांना मदत करायला सर्वजण तयार आहेत. त्यांनाही व्यापारी आणि मधले दलाल लुटत आहेत, त्यामुळे नोकरी निमित्त शहरात गेलेला आपला बांधव आपल्या स्वागतासाठी तयार आहे. 

English Summary: Read what farmers' children should do today!
Published on: 04 November 2022, 04:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)