बीजप्रक्रियेसाठी वापरल्या जात असलेल्या नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांमुळे सुरवातीच्या अवस्थेतील किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. मात्र गोगलगायींमध्ये त्याचे अंश राहतात. गोगलगायींचे भक्षक असलेल्या भुंगेऱ्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन त्यांची संख्या वेगाने कमी होते. त्यामुळे अंतिमतः पिकांच्या उत्पादनामध्ये पाच टक्केपर्यंत घट येत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पेन स्टेट आणि युनिव्हर्सिटी ऑफ साउथ फ्लोरिडा येथील संशोधकांनी काढला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष "जर्नल ऑफ ऍप्लाईड इकॉलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.जगभरामध्ये पीक संरक्षणात नियोनिकोटीनॉईड्स गटातील कीडनाशकांचा वापर विस्तृत प्रमाणात होतो. त्यातही बीजप्रक्रियद्वारे या गटातील कीडनाशकांचा वापर पीकवाढीच्या सुरवातीच्या
काळात येणाऱ्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केला जातो. या कीडनाशकांचा परागीकरण करणाऱ्या कीटकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे विविध संशोधनांतून पुढे येत आहे. या कीटकांचा खाद्यासाठी वापर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढत असल्याचे जॉन टूकर यांनी सांगितले. ते म्हणाले, की मध्य ऍटलांटिक येथील शून्य मशागत शेतीमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बीजप्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या नियोनिकोटीनॉईड्स गटातील कीटकनाशकांचा गोगलगायीवर (ते कीटक वर्गातील नसल्याने) फारसा परिणाम होत नाही. मात्र त्यांच्या शरीरात राहणाऱ्या अंशामुळे त्यांच्या भक्षक असलेल्या किडींवर विपरीत परिणाम होतो. नैसर्गिक शत्रूची कार्यक्षमता व संख्या कमी झाल्याने नियोनिकोटीनॉईड कीडनाशकांचा वापर अप्रत्यक्षरीत्या गोगलगायींच्या संख्या वाढीसाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. भक्षक कीटकांच्या कार्यक्षमतेमुळे गोगलगायींच्या संख्येवर नियंत्रण राहण्यास मदत होते.
प्रयोगशाळेमध्ये कोणतीही बीजप्रक्रिया न केलेल्या, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेल्या आणि बुरशीनाशक आणि थायोमेथोक्झाम या कीडनाशकाची प्रक्रिया केलेल्या तीन प्रकारच्या सोयाबीन बियांच्या संपर्कात गोगलगायींना ठेवण्यात आले. त्यानंतर गोगलगायींच्या वजन आणि अन्य वाढीच्या स्थितींचे निरीक्षण करण्यात आले.The weight and other growth conditions of the snails were then monitored. तसेच त्यांच्या मरतुकीचे प्रमाण मोजण्यात आले.त्यनंतर संशोधकांनी या गोगलगायींचे भक्षक असलेल्या भुंगेऱ्यांना या गोगलगाय खाद्याच्या स्वरूपामध्ये पुरविण्यात आल्या. त्या खाल्ल्यानंतर भुंगेऱ्यामध्ये होणाऱ्या विष लक्षणांचे निरीक्षण करण्यात आले.प्रक्षेत्रावरील प्रयोग 2एका वेगळ्या प्रयोगात प्रत्यक्ष प्रक्षेत्रामध्ये संशोधकांनी 10 गुंठे क्षेत्रामध्ये बीजप्रक्रिया केलेल्या आणि न केलेल्या सोयाबीनची लागवड केली. त्यामध्ये पिकांची वाढ, गोगलगायींची आणि त्यांच्या भक्षकांची संख्या यांची निरीक्षणे घेण्यात आली.
तसेच या क्षेत्रातील मातीच्या नमुन्यांची, पाने, देठ व अन्य अवशेषांची तपासणी करून त्यातील नियोनिकोटीनॉईड अवशेषांच्या प्रमाण मिळविण्यात आले. त्याच प्रमाणे गोगलगायी आणि भुंगेऱ्यातील कीडनाशकांचे प्रमाणही मोजण्यात आले.असे आहेत निष्कर्षगोगलगायींमध्ये जमा झालेल्या कीडनाशकांचे अंश पुढे त्यांचे भक्षक असलेल्या भुंगेऱ्यांमध्ये जातात. त्या विषारी घटकांमुळे भुंगेरे अकार्यक्षम होण्यासोबतच, त्यांच्या मरतु कीचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा अधिक होते.नियोनिकोटीनॉईड कीडनाशकाची बीजप्रक्रिया केल्याने भक्षक असलेल्या भुंगेऱ्यांच्या व अन्य कीटकांच्या कार्यक्षमतेमध्ये घट होते. त्याचा परिणाम गोगलगायींची संख्या वाढण्यामध्ये होतो.गोगलगायींच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनची घनता 19 टक्के, तर उत्पादनामध्ये 5 टक्केपर्यंत घट होत असल्याचे स्पष्ट झाले.हे निष्कर्ष छोट्या प्रक्षेत्रावरील आहेत. त्याबाबत मोठ्या क्षेत्रावर अधिक अभ्यास होण्याची गरज आहे.
Published on: 25 July 2022, 12:47 IST