Agripedia

आपल्या शेतात बीटी कापसाच्या शेतात बोन्ड अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे

Updated on 27 July, 2022 2:06 PM IST

आपल्या शेतात बीटी कापसाच्या शेतात बोन्ड अळीने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे, असा बाऊ आता केला जाईल.(कीडनाशकांची मोठ्या प्रमाणात विक्री करण्यासाठी) तुमच्या शेतात चांगले निरीक्षण केल्यास असे दिसून येईल की ,जी नॉन बीटी ची कापसाची झाडे तुमच्या शेतात आहेत त्यावरच अळी असेल बीटीच्या झाडावरहि असेल पण बीटीच्या झाडात अळी प्रतिबंधक जीन्स असल्यामुळे पान, फुल झाडाचे काहीही तिने खाल्ले तरी ती मरेल ,कारण 85/90 दिवसापर्यंत बीटीचे जीन्स प्रतिकार क्षम असतात.बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे व इको पेस्ट लाईट ट्रॅप हवे असल्यास संपर्क 9503537577 या नंबर वर साधावा.गुलाबी बोन्डअळीचे पतंग जे एक पतंग किमान अंदाजे १८० ते २०० अंडी घालते. त्याचे नियंत्रण करण्यासाठी किंवा त्याचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे. हे जाणुन घेण्यासाठी कामगंध सापळे

कपाशीच्या झाडाच्या दीड ते दोन फुट उंचीवर एकरी 5 ते 6 , शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावावे. पण कामगंध सापल्यामुळे सेंद्री अळी नियंत्रित होईलच असे नाही .But trapping the odor does not necessarily control the vermin.हे पतंग पाऊस पडल्यावर कोषातून बाहेर येतात व त्यांचे आयूर्मान 2 महिने असते, त्या 2 महिन्याच्या वेळेत ज्या अमावश्या येतात त्या त्या वेळी ते अंडी घालतात.आपण कापूस लागवड केल्यानंतर मशागत करतो व जमिनीत गाडल्या गेलेले कोष पुन्हा बाहेर येतात, व ते पुढे 2 महिने , असे चक्र चालूच राहते, हे पतंग 1 ते दीड किलोमीटर पर्यन्त उडू शकतात, आणि कापसाचे जे पीक लुसलुशीत दिसते त्यावर अंडी घालतात. यावर्षी 22/23 जूनला पाऊस पडून पेरण्या झाल्या , व आयुर्माणाच्या हिशोबाने ते पतंग मरून गेले काहींना पक्षांनी खाल्ले, 13 जून ते आज पर्यंत जंगलात खायला काहीच नव्हते , पक्षांनी खाल्ल्यामुळे पतंगाची संख्या कमी झाली , शेतकऱ्यांनी फवारे मारले त्यातही ते नाहीसे झाले. क्वचित ठिकाणी आता बोंडअळी दिसू लागली आहे, तुम्ही तुमच्या कापसाचे निरीक्षण करा,नॉन बीटीच्याच झाडावर ही अळी सापडेल, त्यासाठी घाबरून जाण्याचे कारण नाही.

मित्रानो या उद्याच्या अमावस्ये नंतर येणारा अळीचा अटॅक सौम्य असणार आहे घाबरून जाऊ नका. तद्न्य व्यक्तीचा सल्ला घ्या, मार्ग निश्चितच निघेल.अमावश्या आणि अळीमित्रानो, कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावश्या सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात, हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात {ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान जास्त असेल , तर 4 दिवसात हि उबवतात} त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते, ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वाळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकली तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते, कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच

पूर्ण होते, अळी ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहिती पडत नाही की कैरीत अळी आहे ते. आणि म्हणूनच या अळी ला कोणतेही किळनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी ,ती जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.मित्रानो आपण ह्या अळीला मारू शकत नाही, हिच्यावर नियंत्रण करायचे असेल तर , अमावस्येच्या 2 दिवसांनी अंडीनाशक फवारणी करणे, किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारून.सेंद्रीवर अळी वर उपायअळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्तेतील अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात. अमावस्ये नंतर चे 4 दिवस त्यासाठी महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किळनाशक फवारणी केली तर 80 ते 90% सेंद्री अळी चे नियंत्रण करू शकतो.उपाय - अमावस्येच्या 2 दिवसांनी खालील फवारणी करावी.प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे.

{1}नीम अर्क 30 ते 40 मिली ,सिलिकॉन स्टिकर 5 मिली इमामेकटींन बेंझोईत 7 ग्रॅमकिंवा प्रोफेनोफोस 30 मिली.अळी असेल तरच वरील फवारणी करा,अळी नसेल तर करू नका, 20 जुलै ते 1 सप्टेंबर हा काळ रसशोषक किडींचा असेल, त्यासाठी येणाऱ्या काळात रसशोषक किडींसाठीच फवारणी करा. माझ्यामते पूर्व मोसमी लागवडीच्या कापसावर 1/2% अळी असेल तरी वरील फवारणी करू नका , कारण ह्या आमवश्येचा अळीचा अटॅक अगदी सौम्य असेल. बोगस कृषी सल्लागागारांच्या सांगण्यावरून किंवा कीड नाशक कंपन्यांच्या भपकेबाज जाहिरातीला बळी पडू नका.टीप कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पानगळ होते.हा माझा अनुभव आहे.बोन्ड अळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे व इको पेस्ट

लाईट ट्रॅप हवे असल्यास संपर्क 9503537577 या नंबर वर साधावा.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या दोन्ही आमावस्या सांभाळा ,कापसाचे उत्पन्न चांगले येईल हे खात्रीने सांगतो.

 

प्रा.दिलीप शिंदे

भगवती सिड्स ,चोपडा, जिल्हा जळगाव

9822308252

English Summary: Read the relation and remedy of Amavasya and Bondali
Published on: 27 July 2022, 02:06 IST