कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात. ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते. पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरला,
आज सकाळी छत्रपती शिवाजी ग्राउंड वरुण फेरफटका मारून बस स्टँड जवळील एका हॉटेल वर चहा घेतला, आणि सहज म्हणून आशीर्वाद मेडिकल समोर उभा होतो, कालच्या पावसाने बस स्टँड परिसरात चिखल आणि रस्त्याने येणारे जाणारे, त्यात दसाऱ्या निमित्त झेंडूच्या फुलांचे रोडवरच दुकाने थाटली होती, झेंडूच्या फुलांचा मंद सुगंध चोहीकडे दरवळत होता, सकाळच्या कोवळ्या सूर्य किरणाने फुलं मोहक दिसत होते, इतक्यात एक लोडींग अॅपे सावजी किराणा समोर उभा राहिला, गाडीत टवटवीत फुलांनी भर गच्च गोण्या होत्या, त्या अॅपेतून साधारण पन्नास ते साठीतील दीन व्यक्ती उतरले, वृद्धाकाळाकडे झुकलेले, मळकट कपडे, पण गंभीर चेहरे असलेले, दारिद्र्य ज्यांच्या पाचवीला पुजलेली,
आपण ज्यांना अन्नदाता म्हणतो अशी दोन शेतकरी बाहेर उतरले, किराणा दुकान दाराशी विनवणी केली, किराणा दुकानदार भला माणूस, दुकान समोर एका बाजूला दुकान लावण्याची परवानगी दिली, दुकान लावण्यास जागा मिळाली याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता, तो आनंद तसाच जसा पाऊस पडल्यावर पेरणी आटपून घरी आल्यानंतर, प्रश्न पडतो पाऊस येईल का,? निसर्ग साथ देईल का.? असाच चिंतामय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता बस प्रश्न व चिंता वेगळी, फुल विकल्या जातील का,? फुलांना भाव मिळेल का,? शेतात सोयाबीन उभी आहे तो तर वेगळाच तान, स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता, घाई घाईत भरा भर फुलांच्या गोण्या काढल्या आणि ताडपत्री वर टाकून बसले,
येणारे जाणारे लोक टवटवीत मोहक फुल पाहून आकर्षित होत होते, काही बहाद्दर गाडीवरून चौकश्या करून निघून जायचे, काही ग्राहक भाव विचारायचे, त्यांचे व्यापाराचा गंध नसणारे निर्मळ मनाचे आपल्याच भाषेत उत्तर देत, घ्या साहेब फुलं छान हाय, चाळीस रुपये किलो दिले,
सात रुपयाची चहा पासून पिझ्झा बर्गर पर्यंत भाव न करता गुपचूप घेणारे फेसबुक वर जय जवान जय किसान चे नारे देणारे आज पन्नास ला दोन किलो फूल मागताना मी पाहिले, त्यांचे मनात सलनारे उत्तर असायचे साहेब फार लांबून आलो गाडी करून, नाही परवडणार, तरी ग्राहक घास घुस करायचा, साठ सत्तर जसे जमेल त्या भावाने देत होते, काही दीड शहाणे तर म्हणायचे आज च्या दिवस मान आहे, उद्या कोण घेणार, खायची वस्तू थोडीच आहे, बाजारात खूप फुलं आलेत विकून टाका, घरी नेऊन काय करणार, असे एक ना अनेक प्रश्न करून त्यांचं मनोबल खच्चीकरण करत होते, इतकं सगळं फक्त 30 रुपये किलो फुलांसाठी, आभाळात कधी सूर्य तापत होता तर कधी ढग जमत होते, उभ्या सोयाबीन ची चिंता स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती, फुलं मापत टाकतांना कधी कधी कपाळावरच घामाचे थेंब फुलात टपकत होते, तीच फुलं आज कोणाच्या उंबरठ्यावर, कोणाच्या नवीन वाहनावर, तर काही देवाच्या चरणात पडणार, मला एक प्रश्न पडला खरंच देव असेल तर हे पुण्य कोणाच्या पदरात पडेल.? रक्त आटवून घाम गाळून फुलबाग बहरवणाऱ्या शेतकऱ्याच्या, का 5 रुपयांसाठी किरकिर करणाऱ्या भक्ताच्या.?
न राहवून मी गेलो जवळ, विचारपूस केली, त्यांनी मोठ्या आदराने बाजूला बसा सांगितलं, मेहकर जवळ एक छोटंसं गाव तिथले राहणार आहोत, वीस गुंठे जमिनीत साडे तीन रुपयाचं एक नग भावाने झेंडूची 850 रोप लावली, फवारणी खर्च चार हजार आला, फुलं तोडायला सहा मजूर खर्च 1800, गावाहून चिखली अॅपेत आणायचा खर्च तेराशे, माल निघाला साडेतीन क्विंटल खर्च आला साडेनऊ हजार, पूर्ण फुलं विकून पण पैसे बनतील का याची चिंता , स्वतःची मेहनत धरून तर सौ के साठच,,,
मला आज पर्यंत चांगल्या चांगल्या च्या प्रश्नाची उत्तरं देणारा मी आज निशब्द होऊन ऐकत होतो, इतके आसमानी व सुलतानी ( सरकारचे शेतकरी विरोधी धोरण मग ती सरकार कोणतीही असो) संकट झेलणारा या परस्तितीत पण चहा पाणी विचारतो, मला पण लक्षात आले यांनी सकाळ पासून चहा घेतलीच नव्हती, मी एका चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेऊन आलो त्यांच्या जवळ बसून चहा घेतला, दर वर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जाणारा हा शेतकरी राजा दुःखाचं डोंगर डोक्यावर असून पण ताठ जिद्दीने उभा होता, त्याच्या हिंमतीला मी मनोमन त्रिवार मुजरा करीत होतो, बळी राजा तुला तुझ्या मेहनतीला मानाचा मुजरा, प्रेमाचा सलाम.
लेखक - पत्रकार ,शेख मुख्तार
7057911311
Published on: 08 October 2021, 04:49 IST