Agripedia

रांगडा हंगामासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बी पेरून रोपांची पुर्नलागवड ऑक्टोबर

Updated on 04 August, 2022 8:40 PM IST

रांगडा हंगामासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बी पेरून रोपांची पुर्नलागवड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी. काढणी जानेवारी-फेब्रुवारी या महिन्यात होते. ज्या शेतकऱ्यांना खरीपात पाण्याअभावी लागवड करता येत नाही आणि ज्यांच्या विहिरीतील पाणी जेमतेम फेब्रुवारी-मार्चपर्यंतच पुरते, त्यामुळे रब्बी (उन्हाळ)

कांदा करता येत नसल्याने रांगडा कांद्याची लागवड करावी.As onion cannot be grown, creeping onion should be planted.रब्बी हंगामातील किंवा खरिपातील जातींचे स्वतः घरी अशास्त्रीय पद्धतीने तयार केलेले बी वापरून रांगडा हंगामात लागवड केली तर डेंगळे वाढण्याची शक्‍यता जास्त असते. लागवडीकरिता डेंगळे न येणारी,जोड कांद्यांचे प्रमाण कमी असणारी आणि गरज भासल्यास निदान दोन ते तीन महिने कांद्याची

साठवण करण्यास योग्य जातीची निवड करावी. रांगडा हंगामासाठी बसवंत ७८०, एन २-४-१, ॲग्रिफाउंड लाइट रेड, फुले समर्थ, भीमा सुपर, भीमा रेड, भीमा राज, भीमा शक्ती, भीमा शुभ्रा या सुधारित जातींची लागवड करावी. एन २-४-१, ॲग्रिफाउंड लाइट रेड या जातीमध्ये रांगडा हंगामात वातावरणानुसार डेंगळे येण्याचे प्रमाण असू शकते.

टोमॅटोरोग नियंत्रण - लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘अल्टरनेरीया सोलॅनी’उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा इन्फेस्टन्स’फळसड (बक आय रॉट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासीटीका’एकात्मिक व्यवस्थापन - पिकाची फेरपालट करावी.बियाणे प्रमाणित व निरोगी असावे.

थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.रोपवाटिकेत मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.लागवडीवेळी एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावे.पुनर्लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून नंतरच लावावीत.झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे,

पाने गोळा करून जमिनीत गाडावीत अथवा जाळून नष्ट करावीत.रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रतिलिटर पाणी)मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मि.लि.उशीरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी)मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम

English Summary: Read the important agricultural advice of onion-garlic, tomato crops, the benefit will be big
Published on: 04 August 2022, 08:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)