Agripedia

प्रथमतः अन्नद्रव्याची कमतरता व रोगांचा प्रादुर्भाव

Updated on 25 July, 2022 12:21 PM IST

प्रथमतः अन्नद्रव्याची कमतरता व रोगांचा प्रादुर्भाव या दोन्हीतील फरक समजून घेणे इथे क्रमप्राप्त ठरते, कारण जर नक्की समस्या काय आहे हे समजलं नाही तर योग्य उपचार करणे कठीण जातं. विविध पिकांच्या निरोगी सर्वांग वाढीसाठी अन्नद्रव्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. मुख्य अन्नद्रव्ये, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांना जमीन, खते व फवारणीच्या माध्यमातून भेटत असतात. पिकांच्या वाढीमध्ये एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता झाली कि योग्य ती फवारणी न झाल्यास आर्थिक नुकसानासोबत उत्पन्नामध्ये घट झाल्याची आपण पाहत असतो. अशा विविध प्रकारचे उत्पन्नातील

नुकसान टाळण्यासाठी पिकांवर अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कोणत्या व कशा प्रकारची लक्षणे दिसतात हे आपणास माहिती असणे अत्यंत आवश्यक असते जेणेकरून आपण त्यावर चुकीच्या उपाययोजना टाळून योग्य वेळेस आवश्यक फवारणी व खत व्यवस्थापन करून होणारे संभाव्य नुकसान टाळता येते. विविध अन्नद्रव्यांचे पिकांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे:1) नत्र (नायट्रोजन) - झाडांची खालची पाने पिवळी पडून पानांच्या कडा करपल्यासारख्या दिसून पाने सुकतात व झाडाची वाढ थांबते.फळे व फुले कमी प्रमाणात लागतात.2) स्फुरद (फॉस्फरस) - पानांवर जांभळट व निळसर ठिपके दिसतात,शिरा हिरव्यागार होऊन पाठीमागील बाजूने पाने तपकिरी होतात. झाडाची खोडे बारीक राहतात व देठची वाढ व्यवस्थित होत नाही. 

3) पालाश (पोटॅश) - फळांची वाढ सक्षमपणे होत नाही फळे वेडीवाकडी होतात.पानांच्या कडा तांबड्या पडून पानांवर पिवळे ठिपके दिसतात. पाने शेंडयाकडून जळत फांदीच्या बाजूकडे येतात.The leaves burn from the crown to the side of the branch. 4) कॅल्शियम - नवीन शेंडयाची वाढ होत नाही,शेंडयावरील पाने सुकतात व फुल फळगळ होते, पाने वेडीवाकडी होतात. 4)बोरॉन - वरच्या बाजूची पाने चुरगळयासारखे दिसतात. झाडाची कोवळी पाने पांढरी पडून गळतात तसेच हरितद्रव्याचे प्रमाण देठापासून कमी होत टोकाकडे जाते. फळांवर तांबडे ठिपके पडून भेगा पडतात.5) मॅग्नेशिअम - पाने पिवळी पडून पानांसोबत देठ व शिरांचा हिरवा भाग कमी होऊन पाने पातळ बनून सुकतात, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.

6) गंधक - मुळांची वाढ होत नाही परिणामी अन्नद्रव्ये पानांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे पाने पिवळी पडुन वळतात.7)लोह- पानांतील शिरा हिरव्या होतात व पानांतील हिरवेपणा कमी होतो व पाने पिवळी पडतात.8) जस्त - पाने तपकिरी व जांभळ्या रंगाची दिसतात, पाने आकसतात व गळून पडतात व खोड वाळते.9) मँगनीज - प्रथम शिरा हिरव्या व पानाचा भाग पिवळा पडून कालांतराने पाने जाळीसारखे व पांढरट होऊन गळतात.10) तांबे - झाडाच्या शेंड्याची वाढ थांबून, हरितद्रवे बनवण्याची क्रिया मंदावून पाने गळतात.11) सल्फर - पाने पिवळी पडतात,शेंडयाकडील पाने सुकतात. 12) मोलिब्लेडम - पानांवर तपकिरी ठिपके दिसतात व पानांच्या शिरा हिरव्या दिसून पाठीमागील बाजूस चिकट द्रव स्त्रवतो.13) फेरस (आयर्न ) - पाने पांढरी पडतात. 14) कॉपर - पाने सुकून गळून पडतात.

English Summary: Read the identification of nutrient deficiencies in crops!
Published on: 25 July 2022, 12:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)