Agripedia

शेतकरी मित्रांनो,आपली पूर्वहंगामी कापुस लागवड झाली असेल किंवा बरेच जण येत्या मासूनच्या पावसाच्या पाण्यावर करणार असतील.

Updated on 30 June, 2022 11:53 AM IST

शेतकरी मित्रांनो,आपली पूर्वहंगामी कापुस लागवड झाली असेल किंवा बरेच जण येत्या मासूनच्या पावसाच्या पाण्यावर करणार असतील. आपण सर्वजण जाणतातच की कापसाला कीड संरक्षणासाठी बराच खर्च येत असतो, त्यासाठी महत्वाचे,चांगल्या कापुस उत्पादना साठी *कापुस पीक संरक्षण* महत्वाचे आहे. पण फक्त रासायनिक किटकनाशकांनीच कीड नियंत्रण होत नाही, यासाठी काही जैविक/सेंद्रिय औषधांचा उपयोग केला जातो. यासाठी आपण निमार्क घरी तयार करू शकतो. त्यासाठी आपल्या बांधावर तसेच रस्त्यावर अनेक निंब (कडूलिंबाची ) झाडे असतात. 

याच्या निंबोळया आता पक्व होऊन जमीनीवर पडत आहेत त्या आपणास फक्त गोळा करुन सुकवून ठेवायच्या आहेत. त्याचा वापर निमार्क तयार करण्यासाठी करता येईल.या वाळलेल्या निंबोळ्यापासून निमार्क तयार करण्यासाठी-1 किलो निंबोळया घ्याव्या व घरगुती वापराचे मिक्सरमध्ये थोडे पाणी टाकुन फिरवुन चांगली पेस्ट तयार करावी.व ती पेस्ट 10 लीटर पाण्यात टाकावी,त्यात 100 ग्रॅम वाशिंग पावडर टाकावी व चांगले ढवळून हयावे.आपण ज्याही काही रासायनीक किट्कनाशकांचा फवारणीसाठी वापर करणार त्यात हे घरगुती निमार्क विभागून/ मिसळून फवारणीसाठी वापरले तरी चालते. 

निमार्क चे फायदे1) यामुळे रासायनिक किटकनाशकाची क्रियाशीलता वाढते.2) यामुळे दोन फवारणीतील अंतर वाढते.3) निमार्क हे अॅन्टी रिपेलंट म्हणून काम करते. म्हणजे ते किटकांना परतविते यामुळे कीटक पिकावर हल्ला/अॅटॅक करत नाही.4) निमार्क हे अॅन्टीफिडंट म्हणूनही काम करते.म्हणजे ते कीटकांना पीक खाण्यापासुन परावृत्त करते/रोखते.निमार्क हे कीटकांना नपुंसक बनविते यामुळे कीटकांची पुढाची पिढी तयार होत नाही यामुळे आपले पीक सुरक्षित राहते.यसाठी आपल्या घराजवळील,शेताजवळीलअल्प मोली बहुगुनीनिंबोळी वापरा व आपला उत्पादन खर्च कमी करा आणि उत्पादनही वाढवा.महत्वाचे म्हणजे, हे निंबोळी अर्क प्रत्येक फवारणीत नक्की वापरा.

आपण सर्वजण जाणतातच की कापसाला कीड संरक्षणासाठी बराच खर्च येत असतो, त्यासाठी महत्वाचे,चांगल्या कापुस उत्पादना साठी *कापुस पीक संरक्षण* महत्वाचे आहे. पण फक्त रासायनिक किटकनाशकांनीच कीड नियंत्रण होत नाही, यासाठी काही जैविक/सेंद्रिय औषधांचा उपयोग केला जातो.यासाठी आपण निमार्क घरी तयार करू शकतो. त्यासाठी आपल्या बांधावर तसेच रस्त्यावर अनेक निंब (कडूलिंबाची ) झाडे असतात. याच्या निंबोळया आता पक्व होऊन जमीनीवर पडत आहेत त्या आपणास फक्त गोळा करुन सुकवून ठेवायच्या आहेत. त्याचा वापर निमार्क तयार करण्यासाठी करता येईल.

 

प्रा.दिलीप शिंदे सर

9822305282

English Summary: Read important agricultural advice of neem extract
Published on: 30 June 2022, 11:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)