दशपर्णी अर्क कसा बनवावा:-
या शब्दांमध्येच अर्थ आहे की दहा प्रकारच्या पानांचा अर्क होय.
कडुलिंबाचा पाला(छोटी पाने फांद्यांसह),करंजाची पाने (छोटी पाने फांद्यांसह),सिताफळ पाला,एरंडाची पाने,टणटणी,बेलाची पाने,पपईची पाने,रूईची पाने, निरगुडीची पाने,गुळवेलाची पाने प्रत्येकी 2 किलो
वरील झाडांची पाने उपलब्ध न झाल्यास
तुळशिची पाने,पेरूची पाने,आंब्याची पाने,पळसाची पाने,कन्हेराची पाने,कारल्याची पाने,शेवग्याची पाने,मोहाची पाने,बाभुळाची पाने,आघाड्याची पाने,चिंचेची पाने या झाडांची पाने वापरू शकतो.
इ.पाने करावीत. यामध्ये कडूलिंब,करंजी,गुळवेल, सीताफळ या झाडांचा पाला समाविष्ट असणे अतीआवश्यक आहे.
इतर साहित्य:-
1.पाणी 200 लिटर
2.देशी गायीचे शेण 2 किलो
3.गोमूत्र 10 लिटर
शक्य असल्यास हे सुद्धा वापरावे.
आले चटणी:-500 ग्राम
हळद पावडर:-200ग्राम
तंबाखू:-1किलो
पहिल्यांदा 200 लिटर पाण्यामध्ये देशी गायीचे शेण व गोमूत्र टाकून घ्यावे.उपलब्ध असल्यास त्यामध्ये आले चटणी,हळद पावडर,तंबाखू सुद्धा वापरू शकतो. हे मिश्रण एकत्रित करून,चांगले ढवळावे. 24 तासानंतर 10 प्रकारच्या झाडांचा पाला चेचून या द्रावणात टाकावा. हे मिश्रन सावलीमध्ये 30 ते 40 दिवस आंबवत ठेवावे.
40 दिवसानंतर द्रावण ढवळून वस्त्र गाळ करून घ्यावे. गाळून घेतलेला अर्क सावलीत साठवून ठेवावा. हा अर्क 6 महिन्यापर्यंत साठवून ठेवू शकतो,वापरू शकतो.
वापरण्याचे प्रमाण:-
अर्धा लिटरअर्क /प्रति पंप(16 लिटर)
दशपर्णी अर्क वापरण्याचे फायदे:-
दशपर्णी अर्क फवारणी मुळे लहान अळ्या,रसशोषक कीड,कीडींची अंडी अवस्थेचे निर्मूलन होते.
उग्र वासामुळे किडी पिकामध्ये अंडी देण्यापासून परावृत्त होता.
सर्व पिकावर हा अर्क प्रभावी असल्याने रासायनिक कीटकनाशकांवर वेगळा खर्च करावा लागत नाही.जरी आवश्यकता भासल्यास त्याचे प्रमाण खुप कमी असेल.
रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी झाल्याने पिकावर किटनाशकांचे अंश राहत नाहीत.
मित्रकिडीचे संवर्धन होऊन नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होण्यास वाव मिळतो.
पर्यावरणपूरक कीड नियंत्रण झाल्याने सकस व विषमुक्त भाजीपाला उत्पादित होतो. व शेतीमालास सेंद्रिय म्हणून उत्तम दरही मिळू शकतो.
संकलन - IPM school, शशिकांत वाघ,जळगाव,औदुंबर जाधव,माळशिरस, मिलिंद जि गोदे,अचलपूर
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 02 October 2021, 06:40 IST