प्रादुर्भावीत पिके:- हरभरा,तूर,सोयाबीन,कापूस,
टोमॅटो,वाटाणा,मक्का,मिरची,भेंडी,द्राक्षे,तंबाखू,भुईमूग
सोयाबीन-तुरीमधील शेंगा पोखरणारी अळी, कापसावरील हिरवी बोंड अळी म्हणजेच हरभऱ्यातील घाटे अळी होय.
जीवनचक्र:-सामान्यत: इतर किडींप्रमाणे ही कीड सुद्धा पतंग-अंडी-अळी-कोष आणि पुन्हा पतंग या चार अवस्थेतून आपले जीवनचक्र पूर्ण करते.पतंग राखाडी दुधी रंगाचा असतो.मादी पतंग यजमान पिकाच्या पानाखालील बाजूस अंडी देते.मादी एकावेळी 200 ते 250 अंडी तसेच संपुर्ण जीवनात 1000 ते 1200 अंडी देते.अंडी हिरवट-पिवळसर दिसतात. 4-5 दिवसात त्यातून अळी बाहेर येते.सुरवात अळी पिकाच्या कोवळ्या भागास खायला सुरवात करते.15 ते 21दिवसात अळी पूर्ण वाढते. पूर्ण वाढ झालेली अळी मातीमध्ये किंवा पिकाच्या पालापाचोळ्यात कोषावस्थेत जाते.कोष चॉकलेटी रंगाचा असतो.
7 ते 8 दिवसात त्यामधून पतंग बाहेर पडतो. अश्या प्रकारे 28 ते 40 दिवसात किडीचे जीवनचक्र पूर्ण होते. एका वर्षात 8 ते 12 पिढ्या जन्माला येतात.
नुकसान:-मुख्यतः किडीची अळी अवस्था पिकाचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरत असते.या अळीस फळ पोखरणारी अळी असे सुद्धा म्हटले जाते.कारण विविध पिकाच्या फळ अवस्थेत ही हल्ला करते.जसे सोयाबीन,तुरीच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत.कापूस बोंड अवस्थेत असताना.टोमॅटो,मिरची च्या फुलोऱ्यापासून फळ पिके पर्यंत तसेच हरभऱ्याची घाटे खाऊन फस्त करते.म्हणूनच ही कीड खूप नुकसानदायक ठरते. यजमान पिकसोबत तनावर पण उपजीविका करत असल्यामुळे ही कीड वर्षभर सक्रिय असते.म्हणूनच या किडीचे नियंत्रण करणे खूप कठीण होते. यासाठीच किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्यासाठी फक्त कीटकनाशके फवारण्याऐवजी एकात्मिक किट व्यवस्थापन पद्धती अवलंबवावे.
पोषक वातावरण:- सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान कीड मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ढगाळ व आद्रतायुक्त वातावरनात कीड झपाट्याने वाढते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन:-
यजमान पिकाचे कीड सहनशील वाण लागवडीसाठी निवडावे.
शेत व बांध नेहमी तनमुक्त ठेवावेत जेणे करून किडीच्या विविध अवस्था जसे अळी-कोष उघडे होऊन पक्ष्यांचे नैसर्गिक भक्ष बनतील.
एकरी 10 ते 15 पक्षी थांबे लावावे.
उन्हाळ्यात जमीन खोल नांगरावी.त्यामुळें किडीची विविध अवस्था बाहेर येऊन नष्ट होतील.
या किडीसाठी पिकामध्ये एकरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावे. तसेच किडीची कीड किती प्रमाणात आहे हे देखील समजेल.
पिकाच्या कायिक वाढ अवस्थेत दिसणारी अळी अवस्था चिरडून नष्ट करावी.
सुरवातीस निम तेल,निंबोळी अर्क,दशपर्णी अर्क यासारख्या जैविक किटनाशकांचा आधार घेऊन फवारणी करावी.किडीचे अंडीपुंज-लहान अळ्या नष्ट होतील.
पारंपरिक,जैविक आणि यांत्रिक वापरून सुद्धा किडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या पुढे जातेय अस जाणवल्यासच रासायनिक कीटकनाशकांचा आधार घ्यावा.
जसे:-Indoxicarb 0.0075%,Profenophos+cypermethrin.
कोणतेही किटनाशक फवारताना लेबल क्लेम नक्की तपासा.
- संदीप पाटील,जळगाव
महेश कदम,हातकणंगले
प्रतिक येवले,नाशिक
प्रमोद मुसमाडे,अहमदनगर
संकलन - IPM school
Published on: 04 October 2021, 10:14 IST