1. कृषीपीडिया

अशा पद्धतीने करा हुमनी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

KJ Staff
KJ Staff


गेल्या काही वर्षापासून हुमणीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. यावर्षी सुद्धा हुमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने अहमदनगर, बुलढाणा, कोल्हापूर, धुळे, सांगली आणि इतरही जिल्ह्यात हुमणीचा प्रादुर्भाव दरवर्षी आढळून येतो. हुमणीचे सर्वाधिक नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होते. हुमणी अळी खरिपात ऊस, भुईमूग, ज्वारी तर रब्बी हंगामात हरभरा, गहू  व फळझाडे तसेच भाजीपाला पिके यासारख्या पिकांवर होत असतो.

कसे ओळखाल हुमणीला

हुमणीला इंग्रजीमध्ये व्हाईट ग्रब असे नाव आहे तर शास्त्रीय नाव  होलेटोट्राचिया सेरॅटा असून याचे प्रौढ भुंगेरे लाल व तपकिरी रंगाचे आढळतात. त्याची लांबी २५ ते ३० मिलिमीटर पर्यंत असते. शरीरावरील भाग मजबूत असतो आणि तो पांढरट पिवळसर रंगाचा असतो. त्यांचे डोळे लाल रंगाचे दिसून येतात. या अळीची लांबी साधारण ३० ते ३५ मी मी असतो तर या अळींचा आकार C सी या इंग्रजी अक्षराप्रमाणे आकार असतो.

जीवनक्रम

मान्सूनपूर्व पाऊस झाला की, प्रौढ भुंगेरे नर व मादी जमिनीतून बाहेर येतात. नर व मादी व रात्रीच्या वेळेस निंब, बाभूळ, बोर या झाडावर मिलन करतात. मिलन झालेली माशी चार ते पाच ठिकाणी जमिनीमध्ये आठ ते दहा सेंटिमीटर खोल जागेत आठ ते दहा अंडी एका ठिकाणी देतात. ही अंडी नऊ ते दहा दिवसात उबविण्यास सुरुवात होऊन त्यातून अळी बाहेर पडते.  हुमनी अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोश आणि शेवटी प्रौढ या चार अवस्थांमध्ये पूर्ण होत असतो.  या चार अवस्थांपैकी अळी अवस्था पिकाच्या मुळांवर आपले जीवनक्रम पूर्ण करत असते.  त्यामुळे ही अवस्था सर्वात नुकसानकारक मानली जाते.   एकात्मिक पद्धतीने हुमनी अळीचे व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन ही काळाची गरज आहे कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.

पारंपारिक पद्धत

 या पद्धतीमध्ये एप्रिल-मे महिन्यात खोल नांगरट करून घ्यावी त्यामुळे जमिनीमध्ये असलेली कोषावस्था  व  अळी अवस्था जमिनीवर येऊन त्याचे नैसर्गिक शत्रू जसे की पक्षी, साप त्यांना खाऊन घेतात.  त्याचबरोबर सूर्यप्रकाशामुळे ही अळी अवस्था मरण पावते.

यांत्रिक पद्धत

यामध्ये रात्रीच्या वेळेस जेव्हा प्रौढ भुंगेरे विविध झाडावर मिलन करत असतात.  तेव्हा झाडे हलवून त्यांना खाली पाडून रॉकेल मध्ये टाकून नष्ट करावी.

 जैविक पद्धत

यामध्ये मेटाराझियम अॅनेसोफिली या बुरशीजन्य कीटकनाशकाचा प्रती हेक्‍टरी २० किलो वापरावे.  या बुरशीमुळे अळीला निळा मस्करडाईन हा रोग होतो व अळी नष्ट होते.

रासायनिक पद्धत

१)भुंगेरे नियंत्रणासाठी ५०० ग्रॅम कार्बारिल ५० डब्ल्यूटीओ चे २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)पेरणीपूर्वी १७ मिली प्रति १० किलो बियाण्यास क्लोरोपायरिफॉस  या कीटकनाशकाची बीजप्रक्रिया करावी.

३) पेरणीपूर्वी जमिनीवर दहा किलो फोरेट १० G किंवा ३३ किलो कार्बफुरॉन टाकावे.

 अशा पद्धतीने जर शेतकरी बंधूनी हुमनी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन केले, तर आपण हुमनीवर मात करू शकतो.

 

 

लेखक 

प्रा. शिवशंकर काकडे  (सहाय्यक प्राध्यापक, कृषी कीटकशास्त्र विभाग, 

विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम)  मोबाईल - 9960686182

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters