Agripedia

ऊसामध्ये नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे

Updated on 18 October, 2022 2:20 PM IST

ऊसामध्ये नवीन वाण निर्माण करण्याच्या दृष्टीने तुरा येणे व त्यावर बीजधारणा होणे या प्रक्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण शेतक-यांच्या शेतावर ऊसाला तुरा येणे ही बाब मात्र अनिष्ट आहे. तुरा येण्यापूर्वी उभ्या ऊसाला बाणासारखी टोके (ऍरोइंग) दिसू लागतात आणि ऊसाची वाढ थांबते. अशी अवस्था आल्यानंतर तीन महिन्यात ऊस तोडला तर उत्पादन अथवा साखरेवर फारसा विपरीत परिणाम होत नाही. पण तुरा येऊन फुले झडू लागल्यावर ऊसामधल्या रसाची गुणवत्ता ढासळू

लागते. साखरेचे रुपांतर ग्लुकोज व इतर प्राथमिक पदार्थांमध्ये होते.Sugar is converted into glucose and other primary substances. धाग्याचे प्रमाण वाढते.

क्रिषामी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

दशी सुटून ऊस भेंडाळतो. शेंड्याकडील डोळे फुटू लागतात.१. वाण : तुरा येण्याचे प्रमाण अनुवंशिक घटकावर अवलंबून असते. को ७२१९, कोसी ६७१, को ९४०१२ या वाणांमध्ये तुरा लवकर येतो. को ७४०, को ७१२५, को ८०१४, को २६५ मध्ये तुरा उशीरा येतो.ऊसाला तुरा येण्यापूर्वी साधारणपणे ७५ ते ९० दिवस पुष्पांकुर (फ्लोरलबड इनिशियेशन) तयार होते. पुष्पांकुर तयार होण्याची प्रक्रिया प्रामुख्याने दिवसाचा

प्रकाश काळ किती मोठा आहे यावर अवलंबून असते. प्रकाश काळाच्या प्रभावावर दिवसाचे तापमान, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पोषण द्रव्यांची उपलब्धता, पानामधील ऑक्सिजन या संजीवकाचे प्रमाण यांचा मोठा परिणाम होऊ शकतो. ऊस पीक लघु दिवशीय असून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत त्यास तुरा येतो. दिवसाचे तापमान २६ ते २८ अंश से., रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश से., हवेतील आर्द्रता ६५ ते ९०%, दिवसाचा प्रकाश काळ १२.३० तास आणि प्रकाशाची तीव्रता १० ते १२

हजार फूट कँडल असे वातावरण पुष्पांकुर तयार होण्यास अनुकूल असते. असे वातावरण १० ते १२ दिवस सलग राहिल्यास पुढे ७० ते ९० दिवसांत तुरा येतो. कोयंबतूर (११N) येथे अशी परिस्थिती जुलैच्या दुस-या आठवड्यापासून ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यापर्यंत असू शकते. बिजापूर येथे (१७N) ऑगस्टच्या दुस-या आठवड्यापासून चौथ्या आठवड्यापर्यंत ही परिस्थिती असते. लखनौ येथे हा काळ सप्टेंबरच्या दुस-या ते चौथ्या आठवड्यात येतो. जसजसे विषुववृत्ताकडे जावे तसतसे पुष्पांकुर तयार होण्याची क्रिया लवकर घडते.

तुरा येण्याच्या क्रियेवर परिणाम करणारे घटक२. पाणथळ परिस्थिती : शेतामध्ये पाणी साठून रहात असेल तर तुरा येण्याचे प्रमाण जास्त राहाते. एरवी तुरा न येणा-या को ६३०४ सारख्या वाणालासुद्धा पाणथळ स्थितीत तुरा येतो.३.पाण्याचा ताण : पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते.४. नत्राची कमतरता : पुष्पांकुर तयार होण्याच्या काळात नायट्रोजनची कमतरता निर्माण झाली तर

मोठ्या प्रमाणात तुरा येतो म्हणून या गावाच्या अक्षांशाप्रमाणे जास्तीत जास्त मोठा दिवस येण्याच्या वेळेला २५% वाढीव नत्राची मात्रा देवून पुढे पंधरा दिवसांनी थोडा पाण्याचा ताण दिला तर तुरा येण्याचे प्रमाण कमी राहते. साखरेचा उतारा वाढतो. पावसाळी किंवा मिरगी डोस देण्याची काही ठिकाणी पद्धत या दृष्टीने महत्त्वाची आहे.

 

डॉ.बी.एम.जमदग्नी सर M.Sc. (Agri), Ph.D.

वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ, निवृत्त शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

English Summary: Read causes and remedies for sugarcane rot
Published on: 17 October 2022, 02:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)