Agripedia

आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्यात समावेश असलेल्या घटकांचा झाडाच्या कुठल्या भागावर उत्पादनाच्या दृष्टीने परिणाम होतो,

Updated on 05 July, 2022 1:46 PM IST

आज आपण सूक्ष्म अन्नद्रव्यात समावेश असलेल्या घटकांचा झाडाच्या कुठल्या भागावर उत्पादनाच्या दृष्टीने परिणाम होतो, किंवा तो घटक त्या झाडाच्या कोणत्या भागावर विशेष कार्यशील असतो ते पाहणार आहोत.झाडाचे प्रामुख्याने 6भाग पडतात 1) मूळ 2)खोड 3)पान 4)फुल 5)फळ 6)बी हे भाग झाडाचे असतात त्या वर सूक्ष्म अन्नद्रव्याचा तील घटकांचा काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत 1): मुळ: लोह मुळा साठी आवश्यक असलेला घटकऑक्सिजन मुळा पर्यंत पोहोचवण्याचे काम लोह ( फेरस) करत असतो

झिंक मुळांची योग्य प्रमाणात वाढ करण्याचे काम करतोमॅंगनीज हा घटक नायट्रोजन या घटकाचा चयापचय क्रियेद्वारे द्वारे वहन करण्याचे काम करतोयासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य त्यातील हे तिन्ही घटक झाडाच्या मुळा साठी आवश्यक असतात2):खोड:झिंक हा घटक झाडाच्या खोडातील प्रोटीन वाढविण्यास मदत त् करतो.लोह लोहा घटक झाडाच्या खोडाची वाढ करणेस मदत करतो हे दोन्ही सूक्ष्म अन्नद्रव्य तील घटक झाडाच्या खोडावर विशेष क्रियाशील असतातकोपर हा घटक खोडातील पेशीभित्तिका( सेल) मजबुतीकरण करून खोडास ताकद देण्याचे काम करतो

3)पान - मॅंगनीज कोपर व लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य तील तिन्ही घटक झाडाच्या पानातील क्लोरोफिल निर्माण करण्याची ची प्रक्रिया करतात4)फुल - मॉलिब्डेनम हा घटक झाडातील पराग निर्मिती करणे (सेट) स्थिर करणे हे कामे करतोकॉपर हा घटक पराग विल्टींग कमी मी करतोबोरॉन हा घटक झाडाच्या फुलातील पराग कणांची निर्मिती करतो5)फळ - झिंक हा घटक फळातील कार्बोहाइड्रेड निर्मिती करतो. बोरन बोरॉन हा घटक फळाचे सेटिंग किंवा फळ स्थिर करण्याचे काम करतो व फळात साखर गोडवा निर्मिती करणे व फळ पकवते कडे नेण्याचे काम हा घटक करीत असतो. कोपर हा घटक फळाचा स्वाद सुगंध यांची ची निर्मिती करीत असतो

6)बियाणे/बी - बोरान हा घटक बियाण्याची रचना करणे स्ट्रक्चर करण्याचे काम करतो यास झिंक हा घटक सुद्धा मदत करतोयासाठी शेतकरी बंधुंनी सूक्ष्म अन्नद्रव्य वापर करताना कापसाच्या अवस्थे प्रमाणे उदा कापसाला फुल येण्याच्या नंतर आपण जर बोरांचा उपयोग केला तर कापसाच्या पराग धरणाची निर्मिती होऊन ते तयार झालेले फळ कैरी सेटिंग स्थिर करून पकवते कळे नेण्याचे व बी बनवण्याचे काम बोरान करतो त्यासाठी या घटकास योग्य अवस्थेत फवारणीद्वारे किंवा ड्रीपद्वारे दिले असता योग्य परिणाम दिसून येतात तसेच अन्य अन्नघटक झाडाच्या अवस्थे प्रमाणे द्यावे त्यामुळे आपले उत्पादन वाढण्यास मदत होईल

 

प्रा दिलीप शिंदे सर

9822308252

English Summary: Read and use the advice on micronutrients in cotton
Published on: 05 July 2022, 01:46 IST